प्रसिद्ध सिरिअल अनुपमाच्या सेटला पहाटे आग लागली आहे
मुंबई मधील गोरेगाव फिल्मसिटी म्हणजेच दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये अनुपमाच्या सेटला भीषण आग लागली आहे
पहाटे ७ वाजता शुटिंग सुरू होणार होती मात्र ५ वाजता आग लागल्यामुळे ती रद्द करण्यात आली
आग लागल्यानंतर एआयसीडब्ल्यूए ने त्यांच्या X अकाउंटवर कोणतीही जिवीत हानी झालेली नाही असे सांगितले
अनुपमा सेट जळून खाक झाला असला तरी शेजारील अनेक सेट्स आगीतून थोडक्यात बचावले आहेत
अनुपमा मधील प्रमुख नायिका रूपाली गांगुली यांची या घटने बाबत प्रतिक्रिया दिलेली नाही