बालहक्क कायदा: उपेक्षित वास्तव
प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा किंवा त्याच्या जीवन उभारणीचा पाया म्हणजे त्याचे बालपण होय. पण, प्रत्येकाच्या वाट्याला हे सुखाचे, आनंदाचे बालपण येत असे नाही. आजही समाजात स्त्रीभ्रूणहत्या, बालकामगार, बालविवाह आदी समस्यांचे पेव फुटलेले दिसते. या समस्यांवर मात करायची असेल, तर जात, धर्म, वर्ग, वर्ण, लिंग, भाषा यांचा विचार न करता, प्रत्येक बालकाला सर्वांगीण विकासाचा हक्क प्राप्त व्हायला हवा आणि सुखी, समृद्ध जीवन जगता यावे, या हेतूने सजग अशी संविधानिक कलमांची निर्मिती करण्यात आली आहे...