वेध

नाशिकची सुरक्षा आता रामभरोसे

केवळ दोन दिवसांत नाशिकमधून ४० लाखांपेक्षा जास्त रक्कम लंपास..

दमडी, दम आणि दीदी...

सध्या ममतादीदी बंगालमध्ये 'रिस्क' घेण्याच्या अजिबात मूडमध्ये नाहीत. भाजपशी पंगा घेतल्याचा फटका लोकसभेत त्यांना बसलाच. तीच चूक विधानसभा निवडणुकीपूर्वी दीदी करायच्या मनस्थितीत नाही...

गंमतबाज बाई शेहला

शेहलासारख्या फुटीरतावाद्यांना 'कयामत'च्या दिनी अल्ला अक्कल देईलच, पण तोपर्यंत भारत शासन अशांना नक्कीच ताळ्यावर आणेल, अशी आशा.. आमेन..!..

राण्यांचे बंड

नारायण राणे हे त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत कधीच निवांत राहिले नाहीत. ते कायम अस्वस्थच. या अस्वस्थपणामुळेच त्यांची प्रगतीही झाली. पण, काहीवेळा हाच अस्वस्थपणा त्यांचे वैगुण्यही ठरला. ..

का रे 'दिखावा'?

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कमध्ये एका देशाच्या राजदूताने संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेची ही सर्वात खालच्या स्तरावरची चर्चा असल्याचे म्हटले, ज्यात एक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आलेले नाही...

त्यांना तुरुंगात टाकायचे स्वप्न

सत्तास्वप्न पडत आहेत. सत्ता तर मिळत नाही, पण मनाला काय सांगायचे? जळगावच्या बहिणाबाईने तर म्हटलेच ना की, मन उभ्या पिकातले ढोर आहे. मी तर म्हणेन चोरपण आहे. चोरच काय? चोरावर मोरपण आहे. कसे म्हणता? त्याचे काय? माझा वंचित शोषितांचा पक्ष, मला खासदार निवडून आणायचे होते. सत्तेत रिपब्लिकन पक्षाला आम्ही त्यांचे मतदार चोरणारे वाटलो. पण आम्हा चोरावरही मोर झाला तो ओवैसींचा पक्ष. मी खुद्द माझ्या घरात हरलो, सोलापूरच्या दारातही हरलो...

मदत की वसुली?

भारतात नैसर्गिक आपत्ती आली की, 'सारे भारतीय माझे बांधव आहेत,' हा भाव अनेकांच्या मनात जागृत होत असतो. 'मानवता' नावाचा धर्म यावेळी समाजात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो. तसेच, जागतिक स्तरावरदेखील कोणत्याही देशातील नागरिकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची घटना घडली असता देखील आपली 'वसुधैव कुटुंबकम्' ही धारणा आपण जागृत करत असतो. ..

राणेंचा 'झंझावात'

येत्या शुक्रवारी नारायण राणेंच्या 'झंझावात'या आत्मचरित्राचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून 'झंझावात' हे नाव राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाला तसे अगदी साजेसेच म्हणावे लागेल...

पणतूगिरीची अंधश्रद्धा

एखाद्याला काय जगवते? कुणी म्हणेल ‘ढाई अक्षर प्रेम के.’ पण, छे, काही काही माणसे दोन अक्षरांवरच अख्खी हयात घालवत आहेत. ती दोन अक्षरे आहेत ‘हत्या’ आणि ही अक्षरं उच्चारणारी आणि त्यावर जगणारी व्यक्ती आहे तुषार गांधी. तुषार गांधी कायमच ‘गांधी हत्या’ या विषयावर भाषण करतात..

चिंतातूर जंतू महाराष्ट्रातही

काही नतद्रष्टांच्या मते त्यांचे हे नाटक आहे. कारण कोणे एकेकाळी परप्रांतीयांना क्रूरपणे मारहाण करणारे त्यांचे अनुयायी होते. पण कालांतराने काही महिन्यांपूर्वीच हे महाशय गंगाकिनारी मुलुख असणाऱ्यांच्या संमेलनाला गेले होते. ..

हरपलेले सामाजिक भान...

होळकर पुलाला १०० वर्ष लोटली आहेत. त्यावर मार्गस्थ होणारी वाहने, उभी असणारी वाहने, असंख्य नागरिक यांचा भार आणि खालून वेगवान पाण्याचा प्रवाह यांचा मारा अशा स्थितीत होळकर पूल असताना त्यावर गर्दी करणे, हे एखाद्या दुर्घटनेला आमंत्रण ठरले असते, याचे भान राखणे आवश्यक होते...

हे 'महापौर' की 'महापोर'?

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा एका महिलेचे हात पिरगळतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाल्याने 'हे महापौर की महा'पोर' असाच प्रश्न उपस्थित होतो...

पराभूतांना आमदारकीची स्वप्ने

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यास साधारण एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांची धामधूम जोराने सुरू झाली आहे...

सुळेबाई, तुम्ही आहात कुठे?

काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतेचा नंगानाच चालू असताना फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि गिलानी वगैरेंनी काय दिवे लावले हे तमाम भारतीयांना माहिती आहे. पण, सुळेबाईंना लोकभावनेशी काय देणेघेणे...

पुन्हा 'रिमोट कंट्रोल'?

पंतप्रधानपद इतर नेत्यांना दिल्यानंतरही अनेक महत्त्वाचे निर्णय गांधी घराण्यातील व्यक्तींना विश्वासात घेतल्याशिवाय होत नसल्याने काँग्रेसचे सरकार 'रिमोट कंट्रोल'द्वारे चालत असल्याची टीका व्हायची. ..

वाचव रे देवा, अल्ला, येशू

काही वर्षांपूर्वी नव्हे, तर काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचा 'यंग,' 'चार्मिंग,' 'डॅशिंग' वगैरे अध्यक्ष होऊ घातलेला नेता मीच होतो. 'तसे आमचे ठरले होते.' माझ्यासमोर कुणी उभे राहू शकत होते का?..

संवर्धन आवश्यकच

राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात ऐतिहासिक वास्तू दिमाखाने उभ्या राहत आपला गौरवशाली इतिहास आजमितीस सांगत आहेत. तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमध्येदेखील अनेक पुरातन मंदिरे असून त्यांनादेखील ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे...

विमानभेदी ‘आर-27’

भारताने रशियाकडून ‘एस-400’ ही विमानभेदी क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर अमेरिकेने आक्षेप घेतला होता. अमेरिकेला वाटत होते की, भारताने रशियाच्या ‘एस-400’ प्रणालीऐवजी आपली थाड ही प्रणाली घ्यावी..

शुभेच्छा आणि मौन

सर्व विरोधी पक्ष संपून जातात की काय, अशी राजकीय शक्यता महाराष्ट्रात सध्या वर्तवली जात आहे. भाजप-शिवसेनेच्या सरकारचा कारभार जरी चांगला असला तरी विरोधी पक्षांची एवढी वाताहत होईल, असे कोणालाही वाटले नव्हते...

...अहो राव, यात नवे काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेच्या शिष्टमंडळासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली...

नक्षल्यांचा शहीद आठवडा

गडचिरोलीमधील गोकुळ उर्फ संजू सन्नू मडावी, रतन उर्फ मुन्ना, शैला उर्फ राजे मंगळू हेडो, जरिना उर्फ शांती दानू होयामी, मीना धूर्वा, भिकारी कुंजामीसरिता उर्फ मुक्ती मासा कल्लो या सहा नक्षल्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. सर्वांना पकडण्यासाठी सरकारने लाखोंची बक्षिसे लावली होती. ..

दंडाबरोबर दंडकही हवा!

शहरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे तर ते शहर आपलेसे असते. तसेच, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकानेदेखील हे शहरदेखील आपलेच आहे, असा विचार केला तर अस्वच्छतेचा लवलेशही भारतातील कोणत्याही शहरात दिसणार नाही. ..

त्या २५ करोडमध्ये येतात का?

‘हवे तेव्हा हवे तसे पत्नीला तलाक देणार्‍या लोकांना पाहून इतरांना वाटायचे की काय हे? अल्लातालाच्या साक्षीने काझीने लग्न लावले, वर कबुल कबूल म्हणून संमतीही विचारली तरी या माणसाने त्याच्या पत्नीला केवळ त्याला तसे वाटले म्हणून वार्‍यावर सोडून दिले...

आंध्रतील आरक्षणाची संकल्पपूर्ती

आंध्र प्रदेशचे लोकप्रिय, तरुण मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नुकतेच राज्यातील खाजगी नोकर्‍यांमध्येही ७५ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला...

अभिनंदनातून अहंकाराचा दर्प

भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्थापनेपासूनच स्वतःच्या हिमतीच्या जोरावर पृथ्वीच्या कक्षेबाहेरील विश्वाचा वेध घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने चंद्राच्या दिशेने अंतराळयान प्रक्षेपित केले...

'एनआयए'ने 'करून दाखवले'

'एनआयए'ने 'करून दाखवले'..

राजकुमारांचा अहंकार

राजकुमारांचा अहंकार हे सत्य स्वीकारूच शकत नाहीत. लोकांनी या सामान्यांना का प्रेम द्यावे? का राजसत्ता द्यावी? त्यामुळे ते स्वतःच्या मनाची समजूत घालतात की, लोकांमुळे नाही तर इव्हीएममुळे ही सामान्य घरची माणसं जिंकली आहेत. ..

‘ती’ मजेत आहे!

खरेच ‘ती’ सध्या मजेत आहे. कारण, आपण नकोसे आहोत, आपण मरावे असे आपल्या जवळच्या लोकांना किंवा आपल्या जन्मदात्रीलाच वाटते, हे तिला माहिती नाही. त्यामुळे ‘ती’ मजेत आहे...

इशरत जहाँचं काय चुकलं?

इशरत जहाँ... गुजरातच्या एन्काऊंटरमध्ये मारली गेलेली आणि जिच्या नावे मुंब्र्यात एका 'राष्ट्रवादी' नेत्याने रुग्णवाहिका दौडवली, ही ती युवती नव्हे...

जातपंचायतीची माणूसपंचायत

नुकतीच घडलेली बनासकाठा जिल्ह्यातील दंतीवाडा तालुक्यातील घटना. या तालुक्यातील 12 गावांतील ठाकोर समाजाने निर्णय घेतला आहे की, अविवाहित तरुणींनी मोबाईल वापरू नये. जर त्यांच्याकडे मोबाईल आढळला तर त्यांच्या आईवडिलांना दोषी ठरवण्यात येईल...

महाराष्ट्र काँग्रेसचे 'मामा-भाचे'

नव्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचे मामा असून तांबे हे थोरात यांचे भाचे आहेत...

‘का रे दुरावा?’

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही काँग्रेसमधील शह-काटशहाचे राजकारण थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. पंजाबचे माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी रविवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत त्यात आणखी भर घातली...

कुपोषण विरुद्ध महाराष्ट्र

२०१४ साली महाराष्ट्रामध्ये कुपोषणामुळे मृत्यू पावणाऱ्या बालकांचे प्रमाण १२.६ टक्के होते. ते २०१८ साली ६.४ टक्क्यांवर आले. इतकेच नाही तर गेल्या ४ वर्षांत ४९ हजार कुपोषित बालकांना वाचवण्यात महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या योजनांना यश आले आहे...

’नई सुबह का सूरज’

बाहेरील दहशतवाद आणि अंतर्गत नक्षलवाद ही भारतीय सुरक्षेसमोरील वर्तमानातील दोन मोठी आव्हाने. छत्तीसगढमधील दंतेवाडा, पत्थलगढीपासून ते महाराष्ट्रातील गडचिरोली, एटापल्ली, भामरागड अशी वनवासीबहुल क्षेत्रे प्रामुख्याने या नक्षली कारवायांच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते...

दोष हा कुणाचा?

अवघ्या दीड वर्षांचा दिव्यांश.... बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या इवलुशा पावलांनी घराबाहेर पडला. चार पावलं टाकताच मुख्य रस्त्यापाशी आला. पण, त्याचं पुढचं पाऊल पडलं ते थेट उघड्या गटारात...

इतिहास घडविणाऱ्यांची दखल

जिथे प्रचंड प्रतिकूलतेचा अंधार आहे, अशा ठिकाणी स्वतःच्या आयुष्याचाच होम करत प्रकाशवाटा निर्माण करणारे, पशूसारखे जगत असणाऱ्या धर्मबांधवांचे जगणे माणूसपणाच्या कक्षेत यावे म्हणून स्वतःच्या सगळ्याच भौतिक सुखाला तिलांजली देऊन कार्य करणारे..

कोकणात पक्षांतराचे वारे...

श्रीवर्धनचे आ. अवधूत तटकरे, दापोलीचे आ. संजय कदम, कर्जतचे आ. सुरेश लाड हे तिन्ही 'राष्ट्रवादी' वीर येत्या काळात शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ..

दिखाव्याची दिल्लीवारी

इव्हीएम घोटाळ्यावरुन आपल्या पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फोडण्याच्या नादात आपण लोकशाही व्यवस्थेलाच पायदळी तुडवित आहोत, याचे भानच विरोधकांना राहिलेले नाही. ..

कुणी घर देईल का घर?

मुंबईमध्येच काय, कुठेही घर घेणार्‍या कष्टकरी जनतेला विचारा. त्याच्यासाठी एक घर आयुष्यभर हाडं मोडून, रक्ताचं पाणी करून पै पै जमवलेल्या पैशाचं स्वप्न. खुराड्यासारखं का असेना, स्वतःचं हक्काचं घर असलं की, मुंबईकरांना स्वर्ग गवसल्याचा आनंद होतो. ..

सामाजिक गुंतवणुकीचा अर्थमार्ग

सामाजिक संस्थांसाठीच्या ‘सोशल स्टॉक एक्सचेंज’च्या संकल्पनेवर आगामी काळात भरपूर चर्चा, वादविवाद रंगलेले दिसतील. कारण, याच सामाजिक कामांचा बुरखा पांघरून अनेक स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे मालक आपले खिसे भरण्यात आज धन्यता मानतात. ..

वंचितचे 'संचित' काय ?

'वंचित बहुजन आघाडी' हे नाव गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजत आहे. नावात 'आघाडी' हा शब्द असला तरी हा पद्धतशीर नोंदणीकृत केलेला पक्ष आहे. ..

पर्यटनाला हवी शिस्तीची जोड

पर्यटकांना सुविधा देणे, ही नक्कीच शासनाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांचा जीव वाचविणे हीदेखील शासनाची जबाबदारी आहे का, अशा धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी उन्माद न करता आपल्या जीविताचे रक्षण स्वतःच करणे आणि प्रशासनाच्या सेल्फी बंदीचे स्वागत करणे आवश्यक आहे. मात्र, असे खरेच यंदाच्या मोसमात होणार का, हाच मोठा प्रश्न आहे...

‘पैसा वसूल’

भारतीय संघाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर भारताने या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला, यात शंकाच नाही. ज्या एकमेव सामन्यात भारत पराभूत झाला, त्या इंग्लंडविरुद्धही भारताने चांगली कामगिरी केली...

झायराचा 'अलविदा'

आपल्या संघर्षाबद्दल अनेक निराशाजनक गोष्टीही तिने सांगितल्या. या मानसिक समस्येवर मात करताना, झायराने तिच्यावरील पहिल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल आणि निराशेवर मात करण्याचा प्रयत्न करताना औषधोपचारांद्वारे मदत कशी मिळवली, हे जाहीर केले...

मरणाऱ्या स्त्रियांचे काय?

विक्रोळीतली सत्यघटना. सधन संपन्न घरची १४ वर्षीय मुलगी वारली. घरात भावाला काही कारणामुळे क्षयरोग झाला. जंतूसंसर्गामुळे तिलाही झाला. ..

ममतांची 'कटकट' वाढणार

पश्चिम बंगालचा गड भाजपच्या तोफेने दणाणल्यानंतर ममतादीदी सैरभैर झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भयेने ग्रासल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना जनतेचा लुटलेला पैसा परत देण्याची सुबुद्धी त्यांना सुचली...

भगव्या-हिरव्यापलीकडे...

या लोकांचे नरकापेक्षा भयंकर जगणे आणि त्याहीपेक्षा समाजवादी पक्षालाच मते मिळावीत म्हणून इथल्या लोकांमध्ये पसरवलेले अज्ञान, द्वेष. अबू आझमींनी या गरीब समाजबांधवांबद्दल बोलावे, मग भगवा का हिरवा ही त्यापलीकडची गोष्ट.....

असावी संशोधनमूलक शिक्षणपद्धती

भारतीय शिक्षण पद्धतीचे मॉडेल हे मेकॉलेच्या मॉडेलवर आधारित आहे आणि ते योग्य आहे, हेच आपण मानले आहे. अभ्यासक्रम वगळता काही मोठे बदल आपण आपल्या शिक्षणपद्धतीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केल्याचे दिसून येत नाही...

मुंबईची पार्किंगकोंडी

मुंबईत ठिकठिकाणी विकासकामे पूर्ण होईपर्यंत बॅरिकेट्सजवळ वाहने पार्क करू नयेत, असा आदेश वाहतूक पोलिसांनी काढल्याने वाहने कुठे ठेवायची, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे...

घराणेशाहीचा 'आनंद'

घराणेशाही ही खरंतर भारतीय राजकारणाला आतल्या आत पोखरणारी एक घरगुती कीडच. कारण, घराणेशाहीची ही 'घाणेरडीशाही' पक्षांतर्गत नेतृत्वाबरोबरच संसद-राज्य सभागृहांतील लोकनेतृत्वही आपल्याच हाती एकवटते. परिणामी, इतर मेहनती कार्यकर्ते, नेतृत्वगुण अंगी बाणणारी नेतेमंडळी मात्र पक्षापासून, सत्तेपासून दुरावतात. ..

‘भोगी म्हणूनी स्वीकारा...’

अमेठीमधून ‘अंडे’ मिळवत वायनाडमधून धार्मिक विद्वेषाचा आधार घेत निवडून आलेले ‘राजकुमार.’ त्यांना योग दिनाचा तसा तिटकाराच. ‘राजकुमारां’च्या ‘आलू’पासून ‘सोनाबिना’ला झूठ ठरवणारे काही लोक म्हणतात, ‘राजकुमारांना योग आवडत नाही...

चमकीच्या प्रकोपाचे निष्पाप बळी

सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार तब्बल तीन दिवसांनी बालकांची चौकशी करण्यास आले. इतके अंवेदनशील, पाषाण हृदयाचे सरकार असल्यावर सामान्य जनतेने आपले दुःख कुणाला सांगायचे?..

'ना खाऊंगा, ना खाने दूँगा!'

एकंदर जनतेलाही मोदींचे विचार पटले आहेत. मात्र राहुल गांधी यांनी आज पुन्हा राफेलचा फुसका बार सोडला...

दत्तक शहराचे पालकत्व

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे यासारखा वनवासीबहुल जिल्हा, तसेच नाशिकमधील वनवासीबहुल पाच तालुके यातील होतकरू आणि गुणवान विद्यार्थ्यांना पुणे, मुंबईपेक्षा आता नाशिक हा जवळचा पर्याय उपलब्ध होणार आहे...

प्रगतीबरोबर प्रतिमाही सुधारा!

मुंबईसह महानगर क्षेत्रात महानगरपालिकांच्या मराठी शाळांची चिंतादायक परिस्थिती लक्षात घेता, ही गळती रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध योजना राबविल्या आहेत. ..

ताकीद नको, ताकदच दाखवा!

तपासणी, शोधमोहिमा, रुग्णवाहिका, श्वानपथक, बॉम्बपथक असा सगळा लवाजमा घटनास्थळी दाखल होतो. पण, नंतर या केवळ पोकळ धमक्या असल्याचे लक्षात येते आणि सुरक्षा यंत्रणांचा सगळा वेळ, पैसा, मेहनत खर्ची पडते. नागरिकांचीच गैरसोय होते ती वेगळी!..

मुंबईचे स्पिरीट इथेही दाखवा

पाऊस अनुभवांच्या कडू-गोड आठवणींच्या सागरात भिजवून टाकतो. पण ही अनुभूती मुंबईबाहेरची बरं का. कारण, मुंबईचा पाऊस आठव रे... असे एखाद्या मुंबईकराला म्हणून पाहा...

दोष हा कुणाचा...?

२०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर अजूनही पराभूत मानसिकतेत बुडालेले विरोधक सावरलेले नाहीत. एकीकडे राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्षपद नकोसे झाले, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात सपा-बसपाने वेगळी चूल मांडली...

राष्ट्रवादीची 'भाकरी आणि पीठ'

राष्ट्रवादी काँग्रेसचा विसावा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. (साजरा होण्यापेक्षा 'शोक'च जास्त व्यक्त झाला.) यावेळी राष्ट्रवादीचे नवे 'युवराज' रोहित पवार यांनी क्रांतिकारक अशी फेसबुक पोस्ट केली...

'हरित नाशिक'साठी स्वागतार्ह श्रमदान

यंदाच्या मोसमात नाशिक जिल्ह्याने दुष्काळाच्या झळा सोसल्या आणि यातूनच नाशिक शहराचे पर्यावरण अबाधित राहण्यासाठी आवश्यक असणारी वृक्षराजींची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. नाशिक..

बंद, भाडेवाढ आणि मनस्ताप

लाखो मुंबईकर दैनंदिन प्रवासासाठी रिक्षा-टॅक्सीचा वापर करतात. मुंबईकरांसाठी लोकल, रिक्षा आणि टॅक्सी अत्यंत महत्त्वाची प्रवासाची साधने असल्याने त्यांच्याशिवाय मुंबईकरांचे पानही हलत नाही...

'युवराज' म्हणजे...

ज्या रोगाचं नाव ऐकूनही माणसं मुळापासून कोसळून पडतात, अशा कर्करोगाशी यशस्वीपणे झुंज देऊन हा गडी पुन्हा मैदानात खेळायला उतरला...

टप्पल ते ट्विटर...

ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर द्वेष, उद्विग्नपूर्ण भावनांना वाचा फुटते. पण, अवघ्या काही दिवसांत विरोधाचे हे सूर मावळतात...

चर्चा 'आंध्र पॅटर्न'ची

चंद्राबाबू नायडू यांनी जरी आपल्या कार्यकाळात आंध्रमधील शहरे सुधारली असली तरी डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी आंध्रच्या ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास केल्याचे म्हटले जाते...

डॉ. आ. ह. साळुंखेंचा इतिहास

विज्ञान किंवा समाजशास्त्राची संकल्पना गृहितकांवर आधारित असू शकते. पण, इतिहास गृहितकांवर आधारित नसतो. तो निष्पक्षपणे आणि मनात कोणतीही किल्मिष गृहितक न मांडताच मांडावा लागतो...

अव्वल स्थान टिकविण्याचे आव्हान

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखू सेवन याला प्रतिबंध करण्यासाठी असणाऱ्या (सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा) ‘कोटपा’ कायद्याची अंमलबजावणी नाशिक शहर पोलिसांच्या वतीने काटेकोरपणे करण्यात आली...

शक्ती मिल कंपाऊंड....

बलात्कार करणाऱ्या नराधमांमुळे पीडित मुलीच्या आयुष्याच्या आणि भावविश्वाच्या अक्षरशः चिंधड्या चिंधड्या होतात. तिची काहीही चूक नसताना तिला आयुष्यभर नरकयातना भोगाव्या लागतात. खरे म्हणजे जिवंत असूनही तिला मृतप्राय जगणेच जगावे लागते, एकवेळ हत्या केल्यावर माणूस मरतो आणि इहवादाने त्याचे सगळे सगळे संपते...

मोफत नको, दर्जात्मक सेवा द्या

अण्णांच्या आंदोलनातून सिव्हिल सोसायटी आणि पर्यायी राजकारणाचा वेगळा प्रयोग म्हणून दिल्लीकरांनी केजरीवालांच्या ‘आप’ला बहुमताने सत्तेच्या चाव्या दिल्या. पण, केजरीवालांना ना धड आश्वासनपूर्ती करता आली, ना काही विशेष कामगिरी...

हम बेगाने हो गये!

ब्रिटिशांच्या काळातही काँग्रेसला कोणत्याही संस्थात्मक घटकांनी मदत केली नाही. तरीही त्यावेळी काँग्रेस ब्रिटिशांशी लढली आणि जिंकली. आताचे राज्य त्यावेळच्या ब्रिटिश राजवटीसारखे आहे...

राम नाम तू जप कर देख...

'जय श्रीराम’ची घोषणा देणारे बंगालमध्ये गुन्हेगार आणि गुंड ठरवले जात असतील, तर ती हिंदूंच्या दृष्टीने निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागेल...