भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर संजय राऊतांचा चांगलाच जळफळाट झाल्याचे पाहायला मिळाले. भास्कर जाधवांच्या नाराजीच्या चर्चांवर सुनील राऊतांनासुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. म्हणून आम्ही रडत बसलो का? असा सवाल संजय राऊतांनी केला.
Read More
(Sanjay Raut) उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या घराजवळ रेकी केल्याचा आरोप फोल ठरला असुन 'ते' दोघे मोबाईल टॉवर रेंज चाचणी करीत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. ठाण्यातील कापूरबावडी परिसरातून ताब्यात घेतलेल्या या व्यक्तींनी आपल्या कामाबाबत सर्व पुरावे पोलिसांना दिले असल्याने उबाठाच्या आरोपांची हवाच निघाली आहे.
(Suvarna Karanje)“आमदार म्हणून सुनील राऊत यांनी कामे केली नाहीत, हा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. ज्यावेळी या मतदारसंघाचे मतदार बदल घडवतील आणि आमदार म्हणून मला विधानसभेत पाठवतील, त्याच वेळेला भोंगा, दादागिरी संपणार आहे,” असा घणाघात विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद...
( Sunil Raut ) विक्रोळी मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सुनील राऊत शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांची कत्तल करायला कसाई पाठवणार असून निवडणूक आयोगाने रक्षण करावे, असे म्हात्रे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपले भाऊ मंत्री का झाले नाहीत हे ठाकरेंना विचारा. आमदार सुनील राऊत दोनवेळा कोट शिवून तयार होते, त्याचं काय झालं? असा सवाल भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांना केला आहे. खासदार नारायण राणेंवर राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
एकीकडे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असताना, ईशान्य मुंबईत उबाठा गटाकडून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रकार सोमवार, दि. २० मे रोजी उघडकीस आला. ईव्हीएम मशिनवरील नेमके कोणते बटन दाबावे, याचे प्रात्यक्षिक मतदान केंद्राबाहेर डमी मतदान यंत्राद्वारे उबाठा गटाकडून सुरू होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
घाटकोपर दुर्घटनेतील होर्डींग मालकाचा आणि संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांचा काय संबंध आहे? असा सवाल भाजप आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच याबाबत चौकशी करुन संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
राहूल गांधी लवकरच मुंबईत दाखल होणार असून ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत. अशातच उबाठा गटाचे नेते संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांचे राहूल गांधींच्या स्वागताचे एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटले. मुलुंडमध्ये राऊत यांच्याविरोधात निदर्शने करताना त्यांचा राष्ट्रवादीची अंतर्वस्त्र घातलेले बॅनर झळकवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाची अंडरविअर घालतात हे तपासायला हवे. असं राऊत म्हणाले होते. यानंतर लागलेल्या ह्या बॅनर्सवर सुनील राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊतांचे बंधु, आमदार सुनील राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मला याआधी शंभर कोटींची ऑफर होती आणि आज सुद्धा मला ऑफर आहे. कारण मी स्वतः आमदार आहेतच पण माझा ब्रँड संजय राऊत माझ्यामागे असल्यामुळे मला देखील शंभर कोटींची ऑफर आहे. असं सुनील राऊत म्हणाले आहेत. अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. शंभर कोटी घेऊन माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही, असंही सुनील राऊत म्हणालेत.
संजय राऊत धमकीप्रकरणी दि. १५ जून रोजी मयुर शिंदेंना अटक केली आहे. राऊतांनी स्वतां:ची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. मयूर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत धमकी प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस तपासात मयूर शिंदेने हा बनाव रचल्याचे उघडकीस आले. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांनी स्वता:हून बनाव रचल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, "राऊतांना धमकी देण्याची अक्कल गँगस्टरला कुठली येतयं"
खोटं बोलणं राऊतांच्या रक्तातच आहे, असं आ. नितेश राणे यांनी म्हटलं आहे. राऊत धमकी प्रकरणात मयुर शिंदेला अटक करण्यात आली आहे. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय आहे. राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी मयुर शिंदे याने धमकीचा कट रचला होता. या संपूर्ण प्रकरणावर आता नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी नगरसेविका सुवर्णा कारंजे यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. सुनील राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत सुवर्णा कारंजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सुवर्णा कारंजे यांनी विनायक राऊतांमुळे पक्ष सोडत असल्याचे सांगितले.
ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मयूर शिंदे याला अटक केली आहे. मयूर शिंदे यांच्या अटकेनंतर दिवसभर राजकिय नेत्याकडून वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत असताना शिवसेनेचे समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करत पोलखोल केली आहे. कथित धमकी प्रकरणात अटक केलेला मयूर शिंदे हा ठाण्यातील राष्ट्रवादीच्या एकमेव सज्जन मानत असलेल्या नेत्यासोबतचे संबंध काय ? तर मयूर शिंदे यांचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड याच्यासोबत फोट
ठाकरे गटातील नेते आणि खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुनील राऊत यांच्या फोनवर ऑडिओ क्लिपद्वारे ही धमकी आली आहे. सकाळचा ९ भोंगा बंद करा. असे ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. बंदुकीने गोळ्या घालू असे धमकीमध्ये म्हटले आहे.
मुंबई : पत्राचाळ प्रकरणी महिन्याभरापासून जेलीची हवा खात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळावा यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत अक्शन मोड मध्ये आले आहेत. दिल्लीला जाण्यापूर्वी सुनील राऊतांनी मातोश्रीला भेट दिली होती. त्यामुळे सुनील राऊत हे दिल्लीत ईडीच्या वकिलांना भेटणार असून भाजपच्या बड्या नेत्यांनी या प्रकरणी मध्यस्ती करावी, असे प्रयत्न करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : शिवसेना पक्ष हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. त्यांनी हा पक्ष कसा बांधला? किती कष्ट करून पक्ष बांधला? हे सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी ज्यांनी शिवसेना पक्ष सोडला आहे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची हाय लागली आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी केले आहे.
धाकटे 'राऊत' म्हणतात, मुख्यमंत्री पुन्हा ठाकरेच!
सुनील भाऊ स्वतःच्या प्रभागात लक्ष द्या
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्रीपद मिळालं.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर रविवारी ईडीकडून कारवाई सुरु झाली. ईडीकडून संजय राऊतांना ताब्यात घेण्यात आले आहे. येथून त्यांची पुढची चौकशी सुरु होईल. यातच अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक सूचक विधान केले आहे
"मातोश्रीशी छेडछाड करू नका २० फूट खाली गाढले जाल. अमरावतीचे बंटी - बबली" अशा शब्दात अनेकदा राणा दाम्पत्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. मात्र "कोण रवी राणा? काय लायकी त्याची? आधी घर सांभाळा" अशी वक्तव्य करत सुनील राऊत देखील आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसत आहे.
शिंदे गट , भाजप यांच्यावर सातत्याने तोंडसुख घेण्यात मग्न असणारे आणि महाविकास आघाडीचे स्वयंघोषित प्रवक्ते शिवसेना नेते संजय राऊत त्यांचा तकलादू शूरपणा त्यांच्याच अंगलट आला आहे
गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर ईडीने ताब्यात घेतले आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली केली आहे
गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात १ हजार ३४ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर रविवारी सकाळी ईडीची धाड पडली. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशी नंतर ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतले आहे
पत्राचाळ प्रकरणातील हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत ईडीच्या ताब्यात गेल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिंतेत पडले असणार की आता आपला एकमेव मुलाखतकार तर गेला आता मुलाखत घेणार कोण ? अशी बोचरी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुहूर्ताचा दिवस ठरला. तीन पक्ष एकत्र येत सरकार स्थापन होत असल्याने नाराजी आणि कुरबूर सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे.
संजय राऊत यांचे नाराज बंधू सुनील राऊत यांना काहीतरी जबाबदारी देऊ, अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारामुळे सर्वाधिक नाराजी शिवसेनेत दिसून आली आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीमंडळ विस्तारात स्थान अपेक्षित होते. मात्र, ते न मिळाल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर आदित्य ठाकरे यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांच्याकडे काहीतरी जबाबदारी देऊ, अशा शब्दांत प्रतिक्रीया दिल्याने शिवसेनेतील नाराजीचा सुर आणखी वाढण्याची चिन्