छत्तीसगड मधील पथरिया गावात धर्मांतरणाचा एक प्रकार समोर आला आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक १, यदुनानंद नगरमधील एका घरात प्रार्थना सभेद्वारे धर्मांतर केले जात होते.
Read More
पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ आणि माहीम स्थानकांदरम्यान दि.०९-१० ऑगस्टच्या मध्यरात्री रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, रविवार,दि.१० ऑगस्ट रोजी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि विद्याविहार दरम्यान सकाळी १०:५५ ते ३:५५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक राहील. हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी-चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० आणि अप हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते संध्याकाळी ४:१० पर्यंत ब्लॉक राहणार आहे.
जर बँकेत तुमचे काही काम असेल तर आजच करुन घ्या. कारण उद्या शनिवार दि. २८ जून रोजी बँका बंद राहणार आहेत त्याचबरोबर २९ जूनला देखील रविवार आहे. त्यामुळे सलग दोन दिवस बँक बंद राहणार असल्याने बँकेत जाऊन करायची कामांमध्ये अडथळा निर्माण होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, दि. 1 जून रोजी नाशिक दौर्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत होणार्या बैठकीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान होणार्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. यावेळी कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करण्याच्या उद्देशाने सिंहस्थ प्राधिकरणातील अधिकारी व सदस्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर पेशवेकाळापासून वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करणारे वैष्णव व शैव आखाड्यांचे प्रमुख कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने प्रथमच नाशिकमध्ये एकत्र येणार आहेत.
मध्य रेल्वे दि. ०५ जानेवारी रोजी आपल्या उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेणारा आहे. याकाळात माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत आणि नेरुळ/बेलापूर-उरण पोर्ट लाईन वगळता पनवेल - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल, अशी माहिती मध्यरेल्वेने दिली आहे.
रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी, तसेच देखभाल-दुरूस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवार, दि. 27 जुलै रोजी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवार, दि. 28 जुलै रोजी दिवसा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. दरम्यान, ब्लॉक कालावधीत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी / वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत अप हार्बर मार्ग आणि सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेतर्फे मुंबई विभागात रविवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवर शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सिग्नल यंत्रणा, रेल्वेमार्ग, ओव्हर हेड वायरच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दरम्यान, या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी फिरायचा प्लान बनविणाऱ्यांनो सावधान कारण, तुम्हाला मेगाब्लॉकचा सामना करावा लागू शकतो.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने उद्या तिन्ही रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे
मेष : षड्रिपूंचे दहन करावे काम क्रोधादी षड्रिपूंचे दहन होळी पौर्णिमेनिमित्त करावे. धनस्थानी मंगळ, राहू असल्याने आर्थिक बाबतीत जागरूक राहावे. धनचिंता राहील. जामीन कोणास राहू नका. यांत्रिक क्षेत्रात, विधी क्षेत्रात अनुकूलता राहील. कौटुंबिक जीवनात सामंजस्याने राहावे. कलेतून अर्थार्जन घडेल. महिलांनी स्वमताग्रह टाळावा. विद्यार्थ्यांना धनचिंता राहील.
दुरुस्ती आणि डागडुजीच्या विविध कामांसाठी उद्या (21 मार्च) मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे
रविवारी १४ मार्च रोजी मध्य रेल्वे आणि मुंबई विभागात मेगा ब्लॉक राहणार आहे. रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.
जे जीवाची बाजी लावून अन्याय अत्याचार दहशतवाद, भ्रष्टाचाराविरोधात लिहितात, बोलतात. त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मौल्यवान आहे. त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने ३ मे या ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिना’चे महत्त्व मोठेच आहे.
नाशिकमधील ‘रविवार कारंजा’ हा महापलिकेच्या लेखी अज्ञातवासात आहे काय, अशीच शंका या कारंज्याचे आताचे रूप पाहून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून हा कारंजा बंद आहे. यातील पाणीदेखील आहे तसेच आहे. कारंजाच बंद असल्याने पाणी प्रवाही नाही. त्यामुळे हा कारंजा म्हणजे सध्या दूषित पाण्याचे साचलेले डबके झाला आहे.
श्रीलंकेच्या भूमीवर इस्लाम आणि ख्रिश्चन हे परके धर्म नकोत असा या सिंहली बौद्ध समुदायाचे म्हणणे आहे. यातूनच 'बोदू बल सेना' ही कट्टर सिंहली बुद्धांची लढाऊ आणि आक्रमक संघटना उदयास येऊन या संघर्षांला व्यापकता निर्माण झाली.
श्रीलंका बौद्धधर्मीय जरी असला तरी तो अहिंसावादी देश नाही. तामिळी दहशतवाद्यांविरुद्ध त्यांनी जी लढाई दिली, ती अहिंसक नव्हती. दहशतवाद अहिंसेच्या तत्त्वाने संपणारा नाही. ‘इसिस’चा हा नवा दहशतवाद श्रीलंका कसा संपवेल, हे बघावे लागेल.रामायणातील श्रीलंका आपल्या सर्वांना माहीत असते.
ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरली आहे. आठ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली असून यात जवळपास १५० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून भारत श्रीलंकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली.
दरवर्षाप्रमाणे यंदाही एसडी-सीड्मार्फत (सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना) उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणार्या श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती वितरण सोहळा रविवारी छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात होणार आहे, अशी माहिती गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी दिली.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे उद्या रविवारी रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे.
आज दुपारपासूनच शहराला काळ्या ढगांनी घेरले होते.