(Meenatai Thackeray Statue) मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील(शिवाजी पार्क) मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती घेण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) तत्काळ शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
Read More
करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते, असे म्हणतात. याचा अर्थ काही गोष्टी केल्या, तरी नुकसान होते आणि नाही केल्या तरीही नुकसान होते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि महाविकास आघाडी या त्रिकुटाची सध्या अशीच काहीशी चलबिचल अवस्था! विशेषतः उद्धव ठाकरे तर अलीकडे फारच सैरभैर झालेले दिसतात. मनसे की मविआ, असा गहन प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ते सतत धडपडत आहेत. मग कधी ‘शिवतीर्था’वर बैठका, तर कधी ‘मातोश्री’वर बंद दाराआड चर्चा असे सगळे सुरू आहे.
उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे बुधवार, १० सप्टेंबर रोजी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत खा. संजय राऊत आणि आ. अनिल परब हेदेखील उपस्थित असल्याचे समजते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. विशेषत: बेस्ट कामगार पतपेढीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात दिवसभर या भेटीची चर्चा रंगली होती.
(Mumbai BEST Election Results) मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'ची निवडणूक सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पार पडली. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निकालाने ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला २१ पैकी एकही जागा जिंकण्यात यश आलेले नाही. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची कन्या आणि भाजपच्या खासदार कंगना राणावत यांच्या शिर्डी आणि शनी शिंगणापूर दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या दौऱ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, विशेषतः अशा वेळी, जेव्हा मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू असताना शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यावर आपली कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. त्यावेळी शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत आणि शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तिच्यावर जोरदार टीका केली होती. बीएमसीनेजेंव्हा की तिच्या कार्यालय
अर्बन नक्षलवाद्यांसारखे वागाल तर तुम्हाला अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलांसारखे वागत नाहीत, त्यामुळे तुम्हाला अटक करण्याचे कारण नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले. शनिवारी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शनिवार, २६ जुलै रोजी मनसेत ९ नव्या विभाग अध्यक्षांच्या नियूक्त्या करण्यात आल्या असून अनेक जागांवर फेरबदलही करण्यात आले आहेत.
मराठी भाषेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हिंदी विषयाचा खरा शकुनीमामा कोण ते समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे, असा सल्ला मंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिला आहे. राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. शनिवार, १९ जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा. त्याठिकाणी आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही, असा पलटवार मंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केला आहे. राज ठाकरेंनी हिंदी सक्तीबाबत केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
(Manoj Tiwari On Raj Thackeray) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदीच्या मुद्यावरून वाद चांगलाच पेटला आहे. मिरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून सभा घेतली. या सभेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरुन अभिनेता, भाजप खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. "राज ठाकरे यांच्यासोबत जो जाईल तोही संपणार", असे खासदार तिवारी यांनी थेट राज ठाकरे यांचे नाव घेऊन म्हटले आहे
(Nishikant Dubey On Raj Thackeray) मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांना आव्हान दिले होते. शुक्रवारी राज ठाकरे यांनी मिरा भाईंदर येथे सभा झाली. यावेळी त्यांनी निशिकांत दुबे यांच्यावर तोफ डागली. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे.
आज अशा लोकांना जर माफ केले गेले तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे नेते राज ठाकरे यांनी दिली आहे. गुरुवारी विधानभवनात झालेल्या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला.
(Raj Thackeray) राज्यात सुरु असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान पाहायला मिळाले. दरम्यान, गुरुवारी १७ जुलैला विधीमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये 'काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?' असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, राज ठाकरेंनी यावर खुलासा करत संताप व्यक्त केला आहे. युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का? असा सवाल त्यांनी केला आहे.
राज ठाकरेंवर अवलंबून असलेले पक्ष त्यांच्यासोबत युती करण्यासाठी उतावीळ झाले आहेत, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी उबाठा गटावर केली आहे. बुधवार, १६ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
(Uddhav Thackeray Saamana Interview) उबाठा खासदार संजय राऊत यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर टीझर पोस्ट करुन माहिती दिली आहे. १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार, असेही या टीझरमधून सांगितले जात आहे.
राज्यात सर्वत्र ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवार, १५ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
(Raj Thackeray on MNS-UBT Alliance) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात एकत्र आल्यावर राजकीय वर्तुळात आता मनसे आणि उबाठाच्या युतीच्या चर्चेने जोर धरला. मात्र दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. एकीकडे उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचे बोलत असले तरी राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वरळी येथील जाहीर सभेतील कथित भडकाऊ भाषणावरून त्यांच्या विरुद्ध पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.ॲड. नित्यानंद शर्मा, ॲड. पंकज कुमार मिश्रा आणि ॲड. आशिष राय यांनी संयुक्तपणे ही तक्रार केली असून, राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमान्वये कारवाईची मागणी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. अॅड. नित्यानंद शर्मा, अॅड. पंकज कुमार मिश्रा आणि अॅड. आशिष राय यांनी ही तक्रार केली आहे. वरळीतील विजयी रॅलीमध्ये राज ठाकरेनी भडकाऊ भाषण केल्याचे आरोप केले आहेत. महाराष्ट्रात रहात असलेल्या परराज्यातील नागरिकांवर हल्ले केले जात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला असून यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडून टाका, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे.
गिरणी कामगारांच्या आंदोलनातून अनेक लोकांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरमहाविकास आघाडीचे काय होणार? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात असतानाच आता संजय राऊतांनी इंडी आघाडी आणि मविआ संदर्भात सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आले आहे.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी हिंदी सक्तीविरोधातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही भूमिका अडचणीची ठरू शकते, ही बाब ध्यानात घेऊन उबाठाने स्टॅलिनच्या हिंदीविरोधी तीव्र टीकेपासून स्वतःला वेगळे केले आहे. 'आमचा विरोध हा हिंदीला नाही, तर केवळ प्राथमिक शिक्षणात हिंदीच्या सक्तीला आहे,'असे स्पष्टीकरण खा.संजय राऊत यांनी दिले आहे.
(Kangana Ranaut) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी - हिंदी भाषेवरुन राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. सरकारकडून हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही जीआर रद्द केले. यानंतर ५ जुलै मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचा विजयी मेळावा मुंबईत पार पडला. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरुन आता अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मिरा-भाईंदरमध्ये गुजराती व्यापाऱ्याला मारहाण प्रकरणावर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच मत व्यक्त केलं आहे. समोरच्याला मारताना तो गुजराती निघाला, त्याला करायचं काय? त्याच्या कपाळावर गुजराती आहे, असं लिहीलं होतं का?, सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. वाद झाला त्यात तो गुजराती निघाला, म्हणून सगळेच काही वाईट नाहीत, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. अजून तर काही केलचं नाही, असं म्हणत राज यांनी मिरा-भाईंदरच्या घटनेबद्दल वक्तव्य केलं आहे.
तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर शनिवार, ५ जुलै रोजी ठाकरे बंधूंनी वरळीतील डोम सभागृहात विजयी मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर उबाठा आणि मनसेच्या वतीने शनिवार, ५ जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या यूतीसंदर्भात एक मोठे विधान केले आहे. एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असे ते म्हणाले आहेत.
पुढे काय काय गोष्ट घडतील याची कल्पना नाही. परंतू, मराठीसाठीची ही एकजूट कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे स्वप्न पुन्हा साकारावे, अशी अपेक्षा बाळगतो, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. शनिवार, ५ जुलै रोजी वरळीतील डोम सभागृहात आयोजित ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते.
म मराठीचा नाही, तो सत्तेचाच, असा घणाघात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. शनिवार, ५ जुलै रोजी वरळीतील डोम सभागृहात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा आयोजित केला होता. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंब 'तहात' जिंकण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
नुकताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडला. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. शनिवार, ५ जुलै रोजी त्यांनी पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी वरळीच्या डोम मैदानात झालेला मेळावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. या मेळाव्याला भाकपचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, माकपचे अजित नवले, रासपचे महादेव जानकर, विनोद निकोले आणि भालचंद्र मुणगेकर यांनी हजेरी लावली. मात्र, काँग्रेसने या मेळाव्यापासून जाणीवपूर्वक अंतर राखले. राज ठाकरेंच्या याआधीच्या आक्रमक भूमिकेमुळे बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याची भीती काँग्रे
उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ठाकरे बंधूंनी शनिवार, ५ जुलै रोजी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ठाकरे बंधू एकत्र येणाचा सोहळा अखेर संपन्न झाला. या मेळ्याव्यात २० वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्यानंतर पक्षकार्यकर्त्यांसह नेतेही भावूक झाले होते. दोन्ही ठाकरेंसाठी मंचावर केवळ दोनच खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. इतर कुठल्याही मान्यवरांना मंचावर स्थान नव्हते. याच कारणास्तव शरद पवारांनी आपल्या नियोजित दौऱ्यांचे कारण देत या सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला की काय, अशी शंका उपस्थित होते.
(Sushil Kedia) गेल्या महिन्याभरापासून मुंबईसह राज्यात सुरु असलेल्या मराठी - हिंदी भाषेच्या वादात केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावरुन आव्हान दिले आहे. केडिया यांनी राज ठाकरे यांना एक्सवर टॅग करत 'आपण मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा' अशी पोस्ट केली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा जरूर घ्यावा. आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ४ जुलै रोजी लगावला.
त्रिभाषा सूत्रावरून उगाचचा गोंधळ घालणाऱ्या ठाकरे बंधूंना अखेर एकत्र येण्यासाठी कारण मिळालं. सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर दोघांनीही 'विजयी सभा' जाहीर केली, जणू काही हा लढा त्यांनीच उभारला होता! ५ जुलै रोजी वरळीच्या डोम मैदानावर ही सभा होणार आहे. पण या तथाकथित एकजुटीला ना मराठी भाषेचं भान आहे, ना मराठी माणसाच्या भविष्याची चिंता. फक्त एकत्र येण्याचं निमित्त हवं होतं, ते मिळालं इतकंच. बरं, इतकं करूनही आतल्या गोटात सध्या गोंधळ आहे तो ‘शेवटी भाषण कोण करणार?’ या मुद्द्यावर! राज ठाकरे हे प्रभावी भाषणांसाठी ओळखले
एवढे प्रेम उतू येत आहे तर उद्धव ठाकरे मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देतील का? असा खोचक सवाल खासदार नारायण राणे यांनी बुधवार, २ जुलै रोजी केला. विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या यूतीबाबत भाष्य केले.
राज ठाकरेंनी शिवसेनेत यावे, असे उद्धव ठाकरे कधीच म्हणू शकत नाही. कारण राज ठाकरे शिवसेनेत आल्यास तेच प्रमुख राहतील, असे विधान खासदार नारायण राणे यांनी बुधवार, २ जुलै रोजी केले. विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या यूतीबाबत भाष्य केले.
राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी येत्या ५ जुलै रोजी विजयी रॅलीचे आयोजन केले आहे. दरम्यान, आता या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आहे. आवाज मराठीचा, वाजत गाजत या, आम्ही वाट बघतोय, असे या पत्रिकेत म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनीच राज ठाकरेंना पक्षाबाहेर जाण्यास प्रवृत्त केले. शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरेच पूर्ण जबाबदार आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना नारायण राणे यांनी मंगळवार, १ जुलै रोजी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला.
(Raj Thackeray) हिंदी सक्तीचे जीआर रद्द झाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी दि. ३० जूनला पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच मोर्चा रद्द झाला असला तरी ५ जुलैला विजयी मेळावा होणार असल्याचे सांगितले तसेच या मेळाव्याला पक्षीय लेबल न लावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्यासंबंधीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यानंतर आता येत्या ५ जुलै रोजी ठाकरे बंधूचा एकत्रित विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही याबाबतची माहिती दिली.
उद्धव ठाकरेंचा उजवा हात असलेल्या व्यक्तीनेच पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी तो अहवाल स्विकारला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रवींद्र चव्हाण यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी आहेत. राज्यात मराठी ही अनिवार्य असून हिंदी भाषेची सक्ती नाही. त्यामुळे जो कुणी यावर राजकारण करेल त्याला आम्ही राजकीय उत्तर देऊ, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. येत्या ५ जुलै रोजी हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत एकत्रित मोर्चा काढणार आहेत. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
कुणीही सांगेल म्हणून मोर्चात सहभागी होता येत नाही. त्यांचा मुद्दा जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या हिंदी सक्ती विरोधातील मोर्चात सहभागी होण्याबाबत त्यांनी हे विधान केले.