जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा अखेरचा डाव टाकला आहे. पण, आजच्या समाजमाध्यमांच्या काळात असत्य फार काळ लपून राहू शकत नाही, हे ममतादीदींनी लक्षात घ्यावे.
Read More
मागेच त्यांच्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, अंगावर डास बसला, तर त्याला ते उडवू शकत नव्हते, तरीसुद्धा त्यांना त्यांच्या उजव्या की डाव्या हाताने ब्रॅण्ड मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की, ते अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी पिपाणी का वाजवली नाही? हा काय प्रश्न आहे का? तसेही त्यांना पिपाणी वाजवण्याची गरजच काय? त्यांच्यासोबत तुतारीवाले काका होते ना? तुतारी असताना पिपाणी वाजवण्याची गरजच काय? तर अशीही ब्रॅण्ड मुलाखत येणार आहे बरं का? आम्ही काही जळत नाही, उलट आम्ही खूश आहोत, लोकांचे पुन्हा एकदा ब्रॅण्ड मनोर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुण्यातील विशेष खासदार/आमदार न्यायालयात आपण 'निर्दोष' असल्याचे सांगितले.
वायनाडमध्ये तुम्ही जिंकलात तेव्हा मतांची चोरी झाली नाही का? असा सवाल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केला आहे. राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकीवर केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नकारात्मकता पसरविण्याच्या धोरणामुळे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला कोणीही गांभीर्याने घेत नाही; असा टोला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते नुकतेच दिल्लीला गेले. नियोजित वेळेनुसार बैठकही पार पडली. मात्र, प्रत्यक्षात हाती काय लागले? केवळ छायाचित्रे आणि आंतरिक नाराजी! ना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे भेटले, ना राहुल गांधींशी थेट संवाद झाला. उपस्थित होते केवळ प्रभारी रमेश चेन्निथला आणि नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ! हीच बैठक मुंबईत झाली असती, तर वेळ, पैसा आणि मनस्ताप वाचला असता, अशी खंत अनेक नेत्यांनी व्यक्त केली.
मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकारांचा उपयोग करा, असा खोचक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. गुरुवार, २६ जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
- खा. रवीशंकर प्रसाद; इंदिरा गांधींनी खुर्ची वाचवण्यासाठी देशावर आणीबाणी लादली “महाराष्ट्रातील निवडणुकीविषयी अफवा पसरवणाऱ्या काँग्रेसने आधी आपला काळा इतिहास आठवून पहावा. राहुल गांधी यांनी त्यांच्या आजी इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून जे पाप केले त्याबद्दल देशाची माफी मागावी,” असा घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खा. रवीशंकर प्रसाद यांनी बुधवारी केला.
काँग्रेस काय किंवा वंचित बहुजन आघाडी काय, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर, त्यातून बोध घेण्याऐवजी पराभवाचे खापर ‘ईव्हीएम’सहित निवडणूक आयोगावर फोडून मोकळे झाले. राहुल गांधींनी केवळ समाजमाध्यमांवर अफवांचे बाजार भरवले. पण, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी हा विषय न्यायालयात नेऊन हसे करून घेतले. महाराष्ट्रातील मतमोजणी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा त्यांचा दावा न्यायालयाने स्पष्ट शब्दांत फेटाळलाच; शिवाय पुराव्यांअभावी हे आरोप टिकू शकत नाहीत, हेही ठामपणे सांगितले. आता या निर्णयावरही विरोधकांनी नाराजी व्यक्त
शोषित-वंचित समाजाचे आपणच मसिहा म्हणत, मिरवणार्या चंद्रशेखर आझाद उर्फ रावणाविरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केली. तिच्या तक्रारीची दखल ‘राष्ट्रीय महिला आयोगा’नेही घेतली. सावित्रीची लेक असणार्या मुलीवर अत्याचार झाला, तरीसुद्धा तमाम विरोधी पक्ष तोंडात मूग गिळून बसला आहे. ‘पिछडा समाज’, ‘अगडा समाज’ वगैरे म्हणणारे राहुल गांधी आणि त्यांचे समविचारी तरी गप्प आहेत. खरे तर हिंदू समाज, धर्म यांवर अविरत गरळ ओकणारा चंद्रशेखर फक्त नावानेच ‘रावण’ नाही, तर खरोखरचाच दुर्जन ‘रावण’ आहे, असे दिसते.
महाराष्ट्रातील अपमानास्पद पराभवनंतर तुमचे दुःख दिवसेंदिवस वाढत आहे हे मी मान्य करतो. पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना केला आहे. राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील टक्केवारीवरून उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मतदारसंख्येत ८ टक्क्यांची वाढ झाली, हे संशयास्पद आहे,” असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. मात्र, त्यांच्या स्वतःच्या वायनाड मतदारसंघात याच काळात ७.७ टक्क्यांनी मतदार वाढले होते. मग वायनाडला लोकशाही आणि नागपुरात चोरी कशी?, असा सवाल उपस्थित करीत भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी जोरदार हल्लाबोल केला.
विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरील त्यांच्या आरोपांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र १२ जून रोजी ईमेलद्वारे पाठवण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवासस्थानीही ते प्राप्त झाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरील त्यांच्या आरोपांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र १२ जून रोजी ईमेलद्वारे पाठवण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवासस्थानीही ते प्राप्त झाले.
राहुल गांधींनी गृहपाठ करावा, असा खोचक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राहुल गांधींनी मेक इन इंडियाबाबत केलेल्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. रविवार, २२ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशई संवाद साधला.
इराणसारख्या आपल्या कट्टर शत्रूदेशाने अण्वस्त्रे विकसित करु नये, म्हणून आताच नाही तर गेल्या काही दशकांपासून इस्रायलने आक्रमकपणे रणनीती अवलंबली. आजही इस्रायलने तितक्याच त्वेषाने इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी सर्व ताकद एकवटलेली दिसते. परंतु, दुर्दैवाने पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती प्रक्रियेला कायमस्वरुपी अंकुश लावण्यात भारताचे तत्कालीन काँग्रेसी नेतृत्व अपयशी ठरले. पण, त्याच काँग्रेसी नेतृत्वाचे राजकीय उत्तराधिकारी असलेले राहुल गांधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याच्या बात
विशेष प्रतिनिधी विद्यमान काँग्रेस नेतृत्वासोबत आपले मतभेद आहेत, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी गुरुवारी दिली आहे. विशेष म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य थरूर यांनी त्यासाठी निवडले.
काँग्रेस पक्ष किती लोकशाहीवादी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आणि मुक्त राजकीय विचारधारेला समर्पित वगैरे आहे, याचे गोडवे त्याच पक्षाचे भाट मंडळी नित्यनेमाने गात असतात. पण, ज्या क्षणी गांधी परिवारातील कुणाही सदस्यावर पक्षांतर्गत टीका-टिप्पणी केली जाते, तेव्हा याच काँग्रेसमधील लोकशाही, अभिव्यक्ती वगैरे क्षणार्धात श्वास सोडते. कारण, टीकाकाराला या पक्षात कदापि स्थान नाही. याचाच नुकताच प्रत्यय काँग्रेसचे माजी आमदार आणि खासदार राहिलेल्या लक्ष्मण सिंह यांच्या निलंबनाच्या आदेशातून आला.
तुमच्यासारखे देशद्रोही माणसं भारतात असल्यामुळेच पाकिस्तानचं फावतंय, असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते नाना पटोलेंवर केला आहे. नाना पटोलेंनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांनी पटोलेंना खडेबोल सुनावले.
राहुल गांधींसोबत वाद करण्यासाठी माझी गरजच नाही. ते आमचा कार्यकर्तासुद्धा करू शकतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवार, १० जून रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
- पुराव्यांसह खोडून काढले सर्व आरोप - ज्या 3 वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच 3 वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख - लेखाची सुरुवात गडचिरोली दौर्यापासून
राहुलजी, २००९ ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो, असे म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट मतदारांची आकडेवारी जाहीर करून राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखावर बावनकुळेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
घराणेशाहीच्या मस्तीत असलेला हा शहजादा जनतेची ताकत विसरला आहे, असा हल्लाबोल भाजपने राहुल गांधींवर केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात लिहिलेल्या लेखानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
जोपर्यंत राहुल गांधी पराभवाच्या गडद छायेतून निघत नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष वाढू शकत नाही, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीवर लिहिलेल्या लेखावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
रोज खोटे बोलले की, लोकांना खरे वाटते असे राहुल गांधींना वाटत असल्यामुळे ते सातत्याने त्याच त्या गोष्टी बोलतात, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणूकांवर घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांचे पानिपत झाले आहे. त्यामुळे गिरे तो भी टांग उपर असा हा प्रकार आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर केली आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणूकीवर घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.
(ECI Slams Rahul Gandhi’s Allegations on Maharashtra Polls as Baseless) काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'मॅच फिक्सिंग महाराष्ट्र' या नावाने लिहिलेल्या लेखात, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार भाजपाकडून गैरप्रकार करण्यात आल्याचे आरोप केले. राहुल गांधींच्या या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाने सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, त्यांचे आरोप कायद्याचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दोन तासांत ६५ लाख मतदारांनी मतदान केल्याचा संशय व्यक्त करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने या आरोपांची मुद्देसूद माहिती देत, स्पष्ट शब्दांत खंडन केले असून, "निवडणूक यंत्रणा कायद्याच्या चौकटीत आणि पूर्ण पारदर्शकतेने काम करते. अपयश पचवता न आल्याने काही नेते निवडणूक आयोगाची प्रतिमा मलीन करत आहेत," अशी टिपण्णी केली आहे.
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि त्याचे ९३ हजार सैनिक यांना भारताने पाकिस्तानला परत केले. त्याला ‘शरणागती’ म्हणतात. चिनी कम्युनिस्ट पार्टीबरोबर केलेला गुप्त समझोता, हे काँग्रेसच्या आणखी एका शरणागतीचे ताजे उदाहरण. त्यामुळे मोदींनी पाकिस्तानलाच नव्हे, तर अमेरिकेलाच शरणागती पत्करायला लावली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यात भारतीय सैन्याची बदनामी करणारी विधाने करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट नाही, अशा शब्दात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी खडसावून अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना मानहानीच्या खटल्यात दिलासा देण्यास नकार दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'नरेंदर - सरेंडर ' या विधानावर भाजप आता आक्रमक झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या सरकारांनी इतिहासात शरणागती पत्करली आहे.
विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर मागे थेट हल्लाबोल केला. एवढेच नव्हे, तर तांबे यांनी थेट काँग्रेस नेत्यांनाही आव्हान दिले. "मी छातीठोकपणे सांगतो, राहुल गांधी काँग्रेस नेत्यांना भेटत नाही. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने अगदी प्रदेशाध्यक्षांसह एक तासाच्या आत वेळ घेऊन राहुल गांधींची भेट घेऊन दाखवावी. ते नाही तर फोनवर बोलून दाखवावे. राहुल गांधी कधीच भेटीसाठी उपलब्ध नसतात. पंजाबमध्ये ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असताना मी संपर्क केला असता त
विशेष प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल चाईबासा येथील खासदार-आमदार विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटला आव्हान देणारी याचिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंड उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटल्यात सात्यकी सावरकर यांची मातृवंशावळ तपासण्याची विनंती करणारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अर्ज पुणे येथील विशेष आमदार – खासदार (एमपी/एमएलए) न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे खटल्यास वेगळे वळण देण्यासाठी नथुराम गोडसेचा आधार घेण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.
‘डरो मत...’ अशी डायलॉगबाजी काँग्रेस नेते राहुल गांधी टी-शर्ट घालून आणि दंड फुगवून नेहमी करत असतात. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर धादांत खोटे आरोप करणार्या राहुल गांधींनाच आपल्या डायलॉगचा विसर पडला असावा. त्यामुळेच न्यायालयीन कारवाईद्वारे राहुल गांधींना जेरीस आणणार्या सात्यकी सावरकर यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांना अखेर नथुरामचा आधार घ्यावा लागणे, हा गांधी विचारांचा पराभवच आहे.
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा धमकीवजा इशारा उबाठा गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडी आल्याचे बोलले जात आहे.
वावा! मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय, आता भाजप महायुतीविरोधात भाषणे करून मुंबईकरांना भडकवण्याची नामी संधी आहे. हो तर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत ना? नेहमीप्रमाणे शहरात कमी अधिक भागांत पाणी भरले. काय करावे? काय म्हणता; जुलै 2005 साली मुंबईत महापूर आला, तेव्हा आजोबांना सोडून माझे बाबा उद्धव ठाकरे, आई आणि आम्ही मुलं हॉटेलला राहायला गेलो होतो. आताही तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणत आम्ही उबाठा कुटुंबाने, हॉटेलमध्ये राहायला जावे? हं त्याची गरजच नाही. मातोश्री एकनंतर दोन काय उगाच बांधले आम्ही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायूतीतच लढायच्या ही भाजपची भूमिका आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शनिवार, २४ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
विशेष प्रतिनिधी भाजप नेते अमित मालवीय यांनी समाजमाध्यमांवर राहुल गांधींचे दोन पोस्टर्स शेअर केले आहेत. त्यामध्ये राहुल गांधी आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिफ मुनीर यांचे चेहरे एकत्र करून दोघांची विचारधारा एकच असल्याचे म्हटले आहे.
Rahul Gandhi demanded a special session of Parliament on the Pahalgam attack and the war as well as the ceasefire चला, तयारीला लागले पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ‘संविधान बचाव’ म्हणत, जनतेत भ्रमनिर्मिती केली होती. आता पाकिस्तान आणि युद्धबंदी याबद्दल लोकांना काहीही खोटेनाटे सांगत, मोदी आणि भाजप केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू करूया. आमचे दिल्लीचे आका राहुल गांधीसाहेब यांनी पहलगाम हल्ला आणि युद्ध तसेच युद्धबंदी यांवर संसदेचे विशेष सत्र बोलवण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी व
पाहलगाम येथील क्रुर हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या निर्णायक कारवाईला देशातील सर्वच पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. विरोधी पक्षांपैकी काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.), शिवसेना (उ.बा.ठा), आम आदमी पार्टी आणि इतर प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारतीय लष्कर आणि वायुदलाने एकत्रित पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद आणि मुरिदके येथील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले केले.
Rahul Gandhi statement Lord Shri Ram a mere mythological character राहुल गांधी यांनी प्रभू श्रीराम यांना केवळ पौराणिक पात्र म्हटल्याने, देशातील कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राहुल गांधी यांचे वक्तव्य ही कुठलीही तात्कालिक चूक नसून, ती काँग्रेसच्या आजवरच्या दीर्घकालीन हिंदूविरोधी दृष्टिकोनाची पुराव्याने सिद्ध होणारी साखळी आहे.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे भारत आणि युनायटेड किंग्डमचे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका (पीआयएल) अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने सोमवारी फेटाळली आहे.
राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका र्यक्रमामध्ये काँग्रेसने 80 च्या दशकात केलेल्या चुकां कबुल केल्या आहेत. यामध्ये ऑपरेशन ब्ल्यु स्टारपासून, शीख दंगलीचा देखील समावेश आहे. राहुल गांधींचा बदलेला हा पवित्रा, भारत सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या घोषणेचा परिपाक आहे, हे नक्की...
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जेवढी चर्चा सध्या भारत-पाकिस्तान दरम्यानच्या संभाव्य युद्धसंघर्षाची, तेवढेच वादविवाद सध्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरुनही राजकीय पक्षांपासून ते अगदी सामाजिक पातळीवरही सुरु दिसते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केंद्र सरकारने जाहीर केलेला जातजनगणनेचा निर्णय त्यांचा विजय वाटत असला तरी, वास्तव हेच की, काँग्रेस सरकारच्या प्रदीर्घ कार्यकाळात जातीय जनगणना देशात पार पडली नाही आणि 2011 साली यासाठीचे जे जातींचे सदोष सर्वेक्षण करण्यात आले, त्याचे आकडेही समोर आले नाही. प
नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महत्त्वाचा निर्णय घेतला की, पुढे होणारी जनगणना ही ‘जात फॅक्टर’ मध्यवर्ती ठेवून करण्यात येईल. त्यावरुन लगोगल काही माध्यमांचे डोळे वटारणेदेखील सुरू झाले. अगदी विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, “आमच्या दबावगटामुळे सरकारने हा निर्णय घेतला.” कोणी म्हणाले, “हा सरकारचाच निर्णय असून, योग्य वेळ येताच तो आम्ही जाहीर केलेला आहे एवढेच!” परंतु, आता एक खरे की, जातीनिहाय जनगणना होणार म्हणजे होणारच! यात दुमत असण्याचे काही कारण नाही. मग मोठमोठे विद
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने दोन्ही नेत्यांना नोटीस बजावली आहे.
Rahul Gandhi should really set up his mohabbat ki dukan in Pakistan now
काँग्रेस पक्ष एकीकडे दहशतवादी हल्ल्याविरोधात केंद्र सरकारसोबत असल्याचे सांगत आहे, त्याचवेळी अनेक काँग्रेस नेते दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरलेल्यांवर प्रश्न निर्माण करून त्यांचा अपमान करत आहेत; असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी केले आहे.
इतिहास नव्याने लिहिण्याची तुमची खोड जाणार नाहीच पण जमलं तर इतिहास वाचा तरी, असा खोचक टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राहुल गांधींना लगावला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना चांगलेच फटकारले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.