हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीबाबत क्वचितच आपल्याला चांगली बातमी मिळते. वाईट बातम्यांच्या या ओघात, सकारात्मक राहणे कठीणच! परंतु, या दुष्टचक्रातून वाट काढत, मानवाने पर्यावरण सुधारणांच्या दृष्टीने केलेल्या सकारात्मक कामांकडेदेखील लक्ष दिले गेले पाहिजे. याचाच एक भाग म्हणजे, गेल्या महिन्यात वातावरणातील ओझोन थर पुन्हा भरून निघत असल्याचे वृत्त समोर आले. अनेक दशकांच्या ‘रासायनिक ‘फेजआउट्स’ आणि जागतिक सामूहिक कृतीनंतर, 2040 पर्यंत बहुतेक ओझोन थर पूर्णपणे पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आ
Read More
सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करणाऱ्या ओझोनच्या थराला हानी पोहोचू नये, यासाठी जगभर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे. या अनुषंगाने केंद्र सरकार करीत असलेल्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र शासन आपले संपूर्ण योगदान देत आहे. फ्रीज, एसीसारख्या उपकरणांचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे अशा विविध पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण रक्षणासाठी स्वत:पासून सुरुवात करुन हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
वातानुकूलित वस्तू, शीतपेटी, बॉडी स्प्रे यामुळे पर्यावरणाला खूप मोठा धोका पोहोचतो आहे हे वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल मात्र वरील बाबींमुळे पर्यावरणाला खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.