जैन इरिगेशनच्या ‘रिसोर्स टु रुट’ या संकल्पनेवर आधारित विविध प्रकल्प जगभरात कंपनीने पूर्ण केले आहेत. ठिबक सिंचनाच्या क्षेत्रात जगभर लौकिक असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ला सिंगातालूर उपसा योजनेअंतर्गत 584 कोटींचा कंत्राट मिळाले आहे. यामुळे अवर्षणप्रवण तीन जिल्ह्यातील 31 हजार 547 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून 10 हजार शेतकर्यांना त्याचा लाभ होणार आहे.
Read More
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्या कवितेतील या ओळींमध्ये ‘शेतकर्याचा जन्मही मातीत झाला. मातीचा दास म्हणून सेवा करतो आणि मृत्यूही मातीतच होतो’ ही जीवनरीत उत्कटतेने व्यक्त होते.
जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलालजी जैन यांच्या स्मृतिनिमित्त ‘भाऊंचा कट्टा’ हा अनोखा उपक्रम जळगावात सुरू झाला आहे. पद्मश्री व रेमन मॅगसेस पुरस्कारप्राप्त डॉ. प्रकाश आमटे यांनाही ‘भाऊ’ या नावाने संबोधलं जातं. योगायोगाने या कट्ट्यावर संवादाचे प्रथमपुष्प डॉ. आमटे दाम्पत्याशी गप्पांमधून गुंफले गेले.
संतांनी सत मार्गाने चालण्यासोबतच परोपकारी होण्याची शिकवण आपणास दिली आहे. संतांच्या ह्याच शिकवणीतून निसर्गाला बाधा होईल, असे मानवी वर्तनसुध्दा पाप असून निसर्ग संवर्धनातूनच परमार्थ साधता येतो, असे निरूपण धरणगाव तालुक्यातील तारडे येथे झालेल्या कीर्तनावेळी हभप ऋषिकेश जोशी यांनी केले.
देवभूमी केरळमध्ये वादळी पावसामुळे निम्म्याहून अधिक राज्याची मोठी हानी झाली असून लाखो लोकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची वानवा निर्माण झाली आहे.
शहरातील अतिशय महत्वाचा आणि गजबजलेला चौक म्हणून शास्त्री टॉवर चौकची ओळख आहे. याठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी होते. चौकातील शास्त्री टॉवरवरील घड्याळ गेल्या अनेक वर्षांपासून बंदावस्थेत होते.
भारतातील सगळ्यात मोठी सिंचन कंपनी आणि शेतीव्यवसायात अग्रेसर जैन उद्योग समूहाची वाघूर-असोदा शाखा कालवा आणि असोदा वितरण दाब पाईप वितरणासह महाराष्ट्रातील आणखी एका ‘फ्युचर रेडी मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट’ साठी निवड करण्यात आली आहे.
जैन इरिगेशन सिस्टीम्स्, भवरलाल ऍण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, गांधी रिसर्च फाउंडेशन व तापी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिनानिमित्त आयोजित जलसप्ताहाची सुरुवात जलदिंडीने झाली.
केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगातून राबवण्यात येणार्या बहुप्रतिक्षित ‘अमृत’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील वाढीव भागाचा समावेश असणार आहे.