बांगलादेशच्या मुसलमानांचा इमान काय वर्णावा? दि. ५ फेब्रुवारी रोजी हे ‘२४ रिव्होल्युशनरी स्टुडंट-जनता’ संघटनेचे कट्टरपंथी बांगलादेशाचे संस्थापक वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या घरात घुसले. त्यांनी ते घर तोडले, फोडले, उद्ध्वस्त केले आणि जाळून त्याची राख केली. कृतघ्न, स्वार्थी आणि नीतिहीन अशीही बांगलादेशी कट्टरपंथी पिलावळ!
Read More
ढाका : बांगलादेशातून शेख हसीना यांना हद्दपार करुन मोहम्मद यूनुस ( Unus ) सरकारचा मोर्चा आता राष्ट्रपिता मुजीबुर रहमान यांच्याकडे वळलेला दिसून येतोय. राष्ट्रपिता मुजीबुर रहमान यांच्या सर्व निशाण्या मिटवण्याकडे यूनुस सरकारचा कल आहे. इस्लामी कट्टरपंथी आणि पाकिस्तानच्या विचारधारेवर चालत यूनुस सरकारने आता बांग्लादेश चलनावरुन बंगबंधु मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी जुलै महिन्यातील सत्तापालटाची छायाचित्रे नोटांवर छापली जातील. याआधीही बंगबंधु यांचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न
बांगलादेशातील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या उत्सब कुमार ज्ञान या विद्यार्थ्याला ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून कट्टरपंथींनी बेदम मारहाण केली. उत्सबने सोशल मीडिया ग्रुपवर प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट शेअर केली आणि नंतर ती डिलीट केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
बांगलादेशात शेख हसिना आता पाचव्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. ’भारतमित्र’ म्हणून ओळखल्या जाणार्या, शेख हसिना यांचेच सरकार पुन्हा सत्तेवर येणे, ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे. बांगलादेशाने भारताच्या अन्य शेजारी राष्ट्रांप्रमाणे आपल्या देशात चीनला वाव दिलेला नाही, हा भारताच्या राजनैतिक मुत्सद्देगिरीचा विजय मानला पाहिजे. तसेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तुलनेत बांगलादेशात हिंदूंवर होणार्या अन्यायाचे प्रमाणही कमी आहे.
भारताप्रमाणेच बांगलादेशातसुद्धा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतात निवडणुका जवळ येताच, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. पण, बांगलादेशमध्ये सरकार आणि विरोधक एकमेकांवर चक्क गोळीबार करत असल्याच्या घटनाही अलीकडेच घडल्या आहेत. बांगलादेशमध्ये २००९ पासून सत्तेत असलेली ‘अवामी लीग’ आणि खालिदा झिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’मध्ये हिंसक संघर्ष उफाळून आला आहे. बांगलादेशमधील अशांततेचा परिणाम भारतावर होतो. त्यामुळे बांगलादेशमधील घडामोडींवर भारतही लक्ष ठेवून आहे.