नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
Read More
भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-५३वर लाखनी आणि साकोली दरम्यान मोहघाटाजवळ तेलीनाला येथे मंगळवारी दि. २६ जुलै रोजी सायंकाळी एका भरधाव वाहनाने मादी बिबट्याला धडक दिली. या धडकेत मादी बिबट जखमी होऊन रस्त्यावर पडली होती. या मादी बिबट्याची तपासणी करायला गेले असता तिने लाखनीचे वनरक्षक कृष्णा सानप यांच्यावर हल्ला केला. दरम्यान वनरक्षकाला भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिकच्या पूर्व भागातील उंबरठाण गावात कर्तव्यावर असलेल्या चार वनरक्षकांना दि. ९ मे रोजी रात्रीच्या सुमारास मारहाण करण्यात आली. उंबरपाडा या गावातील ३०-४० जणांनी दगडफेक करत मारहाण केली.
साताऱ्यातील पळसावडे गावात गर्भवती महिला वनरक्षक सिंधू सानप या कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला घडल्याची घटना बुधवारी घडली होती. माजी सरपंचांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी गुरुवारी या माजी सरपंचाला पोलिसांनी अटक केली. दरम्यान वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडसावडे गावाला भेट देऊन त्याठिकाणी रोजगार निर्मितीसाठी वनविभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्याचे नियोजन केले आहे.