संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित बहुचर्चित, महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा शुभारंभ चित्रपटातील 'राजं संभाजी' या गाण्याच्या नृत्याने झाला. मावळ्यांच्या या उत्स्फूर्त सादरीकरणाने एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. हा भव्य चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या
Read More
संदीप रघुनाथराव मोहिते-पाटील प्रस्तुत व उर्विता प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील बहुप्रतीक्षित टायटल सॉंग ‘राजं संभाजी’ आता रसिकांच्या भेटीस आले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. हे गाणं नंदेश उमप यांनी गायले असून मोहित कुलकर्णी यांचे संगीत आहे व गाण्याचे गीतकार हृषिकेश झांबरे आहेत.
बहुप्रतिक्षित छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हिंदीतील ऐतिहासिक चित्रपट छावा या वर्षाच्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाच्या सेटवरुन कलाकारांच्या लूकचे फोटो देखील व्हायरल झाले होते. याशिवाय स्त्री २ च्या शो आधी देखील छावा या चित्रपटाची झलक व्हायरल झाली होती. पण आता अधिकृत टीझर भेटीला आला आहे.
अभिनेता विकी कौशलचा पहिला ऐतिहासिक चित्रपट छावा लवकरच भेटीला येणार आहे. पण चित्रपटाच्या अधिकृत टीझर, ट्रेलर प्रदर्शनापुर्वीच छावा चित्रपटाचा टीझर लीक झाला आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमधील विकीचा लूक व्हायरल झाला होता. त्यानंतर आता 'छावा' चा टीझर लीक झाल्यामुळे चर्चा सुरु झाली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'स्त्री २' चित्रपटाच्या आधी 'छावा' सिनेमाचा टीझर दाखवला जात आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास सांगणारा ऐतिहासिक चित्रपट 'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने प्रदर्शनाच्या ४ दिवसांत समाधानकारक कमाई केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट तयार करण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी खांद्यावर घेतले आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास शिवराज अष्टकातून ते प्रेक्षकांसमोर मांडत आहेतच. परंतु, आजवर छत्रपती संभाजी महाराजांनी जो पराक्रम आणि इतिहास घडवून ठेवला त्याला योग्य न्याय कोणत्याच माध्यमातून दिले गेले नाही आणि आजच्या तरुणांना छत्रपती संभाजी महाराजांनी कमी वयात किती पराक्रम केले होते हे समजावे आणि त्यातून आजच्या तरुणांनी नैराश्यकडे न झुकता धै
छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर भव्य पद्धतीने साकारण्याचा विडा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी घेतला आहे. ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिकपटातून छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन उलगडणार आहे. या चित्रपटात अभिनेता भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. चित्रपट प्रमोशनच्या निमित्ताने ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची टीम माध्यम प्रतिनिधींसह रायगडावर गेली होती. त्यावेळी भूषण पाटील सोबत महाएमटीबीने संवाद साधला असता, “छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपात पाहिल्यावर स्वत
बहुप्रतिक्षित ‘छत्रपती संभाजी’ चित्रपट गेली अनेक वर्ष रखडला आहे. २६ जानेवारी १०१४ रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकल्यामुळे नियोजित तारखेला प्रदर्शित होऊ शकला नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश दुलगज यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली. सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शनाची तारीख उलटून गेली तरीही प्रमाणपत्र दिले नसल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, अखेर अथक परिश्रमांनंतर मराठीत छत्रपती संभाजी हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छत्रपती संभाजी' चित्रपट काही कारणास्तव रखडला होता. मात्र, आता या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. धैर्याने आणि शौर्याने लढा देणाऱ्या या महान वीराचा इतिहास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट २६ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.