वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणीसह सर्व ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्यास प्राधान्य द्यावे. सेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीतच सेवा द्यावी. तसेच वीजहानी कमी करून वीजबिलांच्या वसुलीला आणखी वेग द्यावा असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंगळवारी (दि. २९) कोकण प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
Read More
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या उद्योजकांच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित ‘अर्बन चॅलेंज समिट अँड अर्बन इनोव्हेशन्स अवॉर्ड्स २०२५’ या पुरस्कार सोहळ्यात गुरुवार,दि.२४ रोजी नवी दिल्ली येथे महावितरणचा सन्मान करण्यात आला. महावितरणचे मुख्य अभियंता (वीज खरेदी) संदीप पाटील यांनी कंपनीतर्फे हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
खासगी कंपन्यांना महावितरणच्या कार्यक्षेत्रात वीज वितरण करण्याचा परवाना देण्यास महावितरणचा विरोध आहे. यासंदर्भात महावितरण ने राज्य वीज नियामक आयोगासमोर सुनावणी दरम्यान आपली ठोस भूमिका मांडली यावेळी महावितरणने समांतर वीज वितरण परवान्यास विरोध दर्शवला.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेसाठी राज्यातील सहा जिल्ह्यातील ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. यशस्वी गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांपैकी सहा महिन्यात सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणाऱ्या गावाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
महावितरणच्या नवनवीन उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी तसेच औद्योगिक संघटनांच्या वीज संबंधी समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी दि. १ जुलै २०२५ रोजी महावितरण व पाताळगंगा येथील औद्योगिक ग्राहकांचे प्रतिनिधी एपीएमए (अतिरिक्त पाताळगंगा मॅन्युफॅक्चरिंग संघटना) व पीआरआयए (पाताळगंगा-रसायनी औद्योगिक संघटना) यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्व
राज्यात वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना दामिनी व सचेत ॲपद्वारे दिले जात आहे. कमी परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करण्यात येईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी दिली.
वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'इमेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेमध्ये ५ लाखांचा टप्पा गाठला आहे. या योजनेत सोमवार, दि. ३०जूनपर्यंत सहभागी झालेल्या ५ लाख ३ हजार ७९५ वीजग्राहकांना ६ कोटी ४ लाख ५५ हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
सध्या मान्सून सक्रीय झाला असून पावसाळ्यात ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देण्यासोबतच ग्राहक व कर्मचारी यांच्या विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. कोणत्याही कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी स्वरूपात किंवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करून खंडित विजेचा कालावधी कमीत कमी राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बुधवारी (दि. १८) दिले.
वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
टाटा, बेस्ट, अदानीसोबत आता महावितरणलही हवीय मुंबईत वीज वितरणाची परवानगी
( new electricity connections in Bhandup circle ) राज्यातील जनतेला विविध नागरी सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा २०१५ अंमलात आणला आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे यांनी दिले होते. त्यानुसार, भांडूप परिमंडलात सेवा पंधरवड्यात ४ हजार ४२३ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यासाठी, भांडूप परिमंडल अंतर्गत विविध ठिकाणी ग्राहकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
Road, Farmer, Electricity,
महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने वीज दर निश्चितीचे आदेश दिले असून वीजदरात दहा टक्के घट होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुर्हूर्तावर राज्य सरकारने सर्वसामान्यांना ही गोड बातमी दिली असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी आणि बँक ऑफ बडोदा यांच्यात करार
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्च २०२५पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
मुंबई : “घरांच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती ( Solar Energy ) पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या योजनेत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याला गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारकडून २६० कोटी, ९१ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे,” असे ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
Samajwadi Party संभल : उत्तर प्रदेशातील संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली होती. त्यावेळी बुर्के यांच्या कुटुंबीयांनी संबंदित पथकाला वीज मीटर तपासणीपासून विरोध केला. याप्रकरणी कनिष्ठ अभियंत्याला धमकी दिल्याप्रकरणी एफआरआय लागू करण्यात आलेल्याचे वृत्त आहे. मोठ्या संख्येने पोलीस रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पीएसी कर्मचारीही या पथकासोबत उपस्थित होती असे वृत्त आहे. ही घटना १९ डिसेंबर २०२४ रोजी घडली होती.
ठाणे : ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे ( Railway ) स्थानकाच्या कामात रेल्वेच्या उच्च दाब वीज वाहिनीचा अडथळा होत आहे. तेव्हा, स्थानकाचे काम थांबु नये यासाठी यावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
मुंबई : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ( Abhay Yojana ) ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
Nana Patole विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील वांद्रे येथे महाविकास आघाडीची सभा जाहीर करण्यात आली आहे. ही सभा ६ नोव्हेंबर २०२४ रोज सुरू असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भाषणावेळी तांत्रिक अडथळा निर्माण झाला. यामुळे विधानसभेआधीच नाना पटोले आणि महाविकास आघाडीची बत्ती गुल झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
मुंबई महापालिकेच्या ई विभागातील हिंदू वैकुंठधाम स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीच्या तांत्रिक दुरुस्तीचे आणि परिरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दि. १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी सेवा बंद राहणार आहे. विद्युतदाहिनीशी संबंधित कामे पूर्ण झाल्यानंतर ही विद्युतदाहिनी नागरिकांच्या सेवेत पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मुंबईकरांना तात्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी टाटा पॉवरने संपूर्ण डिजिटलाईज्ड सेवा सुरु करून ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्याच्या प्रक्रियेत क्रांती घडवून आणली आहे. या नव्या प्रक्रियेमुळे आता नवीन वीज जोडणी केवळ ७ दिवसांमध्ये मिळू शकते.
महावितरणने राज्यातील ३ कोटी वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने मुंबईत ८५०० चार्जर सुरू करण्याचे ठरवले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल ( ईव्ही) चार्जिंगसाठी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनी प्रयत्नशील आहे.गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक कारला भारत सरकाने चालना दिली आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी सरकारने कंपन्यांना सबसिडीदेखील दिली होती. परंतु अपुरे चार्जिंग सुविधा हा कळीचा प्रश्न होता. तो सोडवण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीने पुढाकार घेत ८५०० चार्जिंग बांधण्याचे ठरवले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. दरम्यान, शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी सध्या संप स्थगित केला आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला प्रभु श्री रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. सरकार लवकरच ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत देशातील एक कोटी घरांमध्ये रुफटॉप सोलर बसवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदांकरिता केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या एकूण ८०० रिक्त पदांच्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसंदर्भातील तपशील सविस्तर पाहूयात.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा सन २०३५ पर्यंतचा एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
चुकीची वीजदेयके रोखण्यासाठी राज्यभरात लवकरच ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
कल्याण-बदलापूर राज्यमार्गाजवळ महात्मा गांधी विद्यालयाचे प्रांगण तसेच संरक्षण भिंतीलगत रस्त्याच्या कडेला साधारणतः ३५-४० वर्षे जुनी २५ मीटर उंच मनोऱ्यावर डमी अतिउच्चदाब वाहिनी आहे. या वाहिनीतून कसल्याही प्रकारचा विद्युत पुरवठा होत नाही. सदर मनोरे व वाहिनी ही फार जुनी असल्याने धोकादायक बनली आहे. तसेच सदर वाहिनीच्या जवळ मध्य रेल्वेची ठाकुर्ली ते लोणावळा ही अति उच्चदाब वाहिनी या वाहिनीखालून जाते. त्यामुळे शुक्रवार, २४ नोव्हेंबर रोजी ही वाहीनी हटवण्यात येणार असून काही कालावधीसाठी अंबरनाथ व उल्हासनगरच्या कांही भाग
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला (सांघिक सुसंवाद विभाग) पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके जाहीर झाली आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ऍन्ड पीआर, ब्रॅंडिंग, सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) आणि भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी जनसंपर्क विभागाचे कौतुक केले आहे.
'महाराष्ट्र वीज नियामक आयोगां'तर्गत रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगामार्फत यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याभरतीद्वारे, महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई मधील अध्यक्ष, अपक्ष सदस्य पदाच्या १६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
अंधेरी पोलिसांनी हरियाणातून दोन आरोपींना सुमारे दोन लाख रुपयांच्या वीजबिलाच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. हा प्रकार साधारणत: फेब्रुवारी महिन्यातील आहे. यावेळी तक्रारदाराला त्याच्या फोनवर संपर्क साधण्यात आला होता आणि बिल न भरल्यास त्याच्या घराचे वीज कनेक्शन तोडले जाईल असे सांगण्यात आले होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानीचा मुद्दा उपस्थित करत अदानींनी ३२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. अदानीमुळेच वीज महागली, असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "अदानी जी इंडोनेशियामध्ये कोळसा विकत घेतात आणि भारतात त्याचे दर दुप्पट होतात."
Mahatransco (महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी) च्या संचालक (प्रकल्प) या पदाचा कार्यभार सुनील सूर्यवंशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.सूर्यवंशी यांनी पुणे विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.ते पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात १९९४ मध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झाले. तद्दनंतर ते २००६ साली थेट भरतीमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर रूजू झाले. विभागांतर्गत बढतीव्दारे २०१३ मध्ये अधीक्षक अभियंता आणि २०२२ मध्ये मुख्य अभियंता या पदावर रुजू झाले.
महाराष्ट्र शासनाची विद्युत मंडळांपैकी एक असलेली 'महाट्रान्स्को'अंतर्गत भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाट्रान्स्को मधील विविध रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र स्टेट ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MSETCL) ने एक जाहिरात प्रसिध्द केली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. महापारेषणद्वारे करण्यात येणाऱ्या भरतीद्वारे सहाय्यक अभियंता(ट्रान्समिशन), सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) पदांच्या एकूण ३९६ जागा भरल्या जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने संयुक्तपणे देशांतर्गत ऊर्जा व वीज निर्मिती-वितरण क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांचा विशेष अभ्यास करून, त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचा समावेश विशेषत्वाने करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून, ऊर्जा क्षेत्राला उच्च तंत्रज्ञानासह संशोधनाची जोड देऊन देशासाठी म्हणून राष्ट्रीय स्तरावर ’मिशन माहिर’ या उपक्रमाची औपचारिक स्वरुपात सुरुवात करण्यात आली.
नवीन वीज कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात चोवीस तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात कनेक्शन देण्याच्या महावितरणच्या मोहिमेत राज्यात जुलै महिन्यात एकूण ८०६३ वीज ग्राहकांना झटपट कनेक्शन मिळाले . यामध्ये अर्ज केल्याच्या दिवशीच कनेक्शन मिळालेल्या ग्राहकांची संख्या ५१० असून ३७७५ ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर २४ तासात कनेक्शन मिळाले . ग्रामीण भागात ६१६ ग्राहकांना अर्ज केल्यानंतर तातडीने शुल्क भरल्यामुळे ४८ तासात कनेक्शन मिळाले तर ३१६२ ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर ४८ तासात वीज जोडणी मिळाली.
महावितरणकडून ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यासाठी ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे. महावितरणकडून यबाबत आवाहन करण्यात येत असून सुरक्षित व सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार आहेत.
दिल्लीकरांसाठी एक दुखद बातमी आहे. लवकरच दिल्लीत विजेचे दर १० टक्क्यांनी महाग होऊ शकतात. डीईआरसी म्हणजेच दिल्ली विद्युत नियामक आयोगाने वीज खरेदी करारावरील दर वाढवण्यास मान्यता दिली आहे. वीज वितरण कंपनी बीएसईएसने वीज दर वाढवण्यासाठी डीईआरसीकडे अर्ज केला होता, ज्याला डीईआरसीने मंजुरी दिली आहे.
कर्नाटकात २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात मोफत वीज देण्याचे आश्वासन देणाऱ्या सिद्धरामय्या सरकारने कर्नाटकात विजेचे दर वाढवले आहेत. कर्नाटकात वीजबिलात प्रति युनिट २. ८९ रुपये अधिक भरावे लागणार आहेत. जे ग्राहक एका महिन्यात २०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरतात त्यांना हा वाढीव दर लागू होणार आहे. दि. ५ जून रोजी राज्य सरकारने यासंदर्भात आदेशही जारी केले आहेत.
मुंबई : नियुक्त कंत्राटदाराने बेस्टच्या आस्थापनेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्राप्त झालेल्या रकमेतून नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याने मुख्य आस्थापना म्हणून बेस्टने महिन्याभरात ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.
फडणवीस शिंदे सरकारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. सततची नापिकी आणि अस्मानी संकटाने नाडलेल्या शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला असून त्यांना दिवसा आणि रात्री वीज कशी उपलब्ध करून देता येईल यावर रामबाण उपाय शोधून काढला आहे. शेती पंपांना अखंडित आणि कायमस्वरूपी विजेचा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळणार अस
पावसाचा लहरीपणा तसा सर्वश्रूत. हल्लीतर एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव मिळतो. निसर्गाच्या याच लहरीपणामुळे मात्र सर्वसामान्यांचे गणित कोलमडते, ज्याचा विचार फारसा कुणी करत नाही. हल्ली राज्याच्या अनेक भागांत अवकाळीचा फटका बसत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले रब्बी पीक तसेच द्राक्ष आणि आंबा उत्पादकांचेही नुकसान झाले. निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी मदतीवर विसंबून असलेला, जगाला अन्नबळ देणारा बळीराजा यामुळे अशक्त झाला. एकीकडे पावसाळ्यात दुष्काळाचा अनुभव येत असतो, तर उन्हाळ्यात अवकाळीमुळे शेतकरी हैराण.
दक्षिण आफ्रिकेला भेडसावणार्या सर्वांत मोठ्या समस्या म्हणजे गरिबी, बेरोजगारी आणि विजटंचाई. सध्यादेखील हा देश वीजसंकटाचा सामना करत असून या देशाला वीजसंकटाचा इतका गंभीर फटका बसला आहे की, केपटाऊनमध्ये झालेल्या भाषणादरम्यान देशाचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी देशात ओढवलेल्या विजेच्या संकटाबाबत माहिती देत ही ‘राष्ट्रीय आपत्ती‘ असल्याची घोषणा केली. यापूर्वी ‘कोविड’च्या काळात अशाप्रकारची ‘राष्ट्रीय आपत्ती‘ घोषित करण्यात आली होती. त्यानंतर केवळ दहा महिन्यांत ही परिस्थिती ओढावली आहे.
राज्यातील शेतकर्यांना वीजबिल माफ करण्याच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे.
सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे