balasaheb Thackeray

तारीख ठरली! तब्बल दोन वर्षानंतर धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी होणार,राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणे दिलासा मिळण्याची ठाकरेंना अपेक्षा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून साल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता देण्याचा आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उबाठा गटाने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बुधवार दि. २ जुलै रोजी केली असता, न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.

Read More

नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच अनुभवता येणार 'आफ्रिकन सफारी'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि एनबीसीसीमध्ये सामंजस्य करार. दि. १ जून रोजी नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कंन्ट्रक्शन कार्पोरेशन (एनबीसीसी -India) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला

Read More

बाळासाहेब म्हणाले होते, उद्धव असा वागलास तर पक्ष संपेल... : कालिदास कोळंबकर

मुंबई : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे सगळे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले. अनेक जिल्ह्यांतून उबाठा गट हद्दपार झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना याबाबत आधीच ताकीद दिली होती. बाळासाहेब म्हणाले होते, “उद्धव असा वागलास तर पक्ष संपेल...” बाळासाहेबांचे शब्द खरे ठरले, असा गौप्यस्फोट महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आ. कालिदास कोळंबकर ( Kalidas Kolambkar ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला. “माझ्या चौथ्या टर्मला उमेदवारी देण्यात उद्धव ठाकरेंनी आडकाठी आणली होती,” असेही त्यांनी सांगितले. सलग

Read More

बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेणाऱ्यांवर आता जनतेचा विश्वास नाही!

जनादेशाचा अवमान करून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना त्यांनी बगल दिली. हिंदुत्वाशी बेईमानी केली. एकेकाळी बाळासाहेबांच्या विचारांची धगधगती मशाल देशाने अनुभवली आहे. पण बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतलेली ‘मशाल’ ज्यावेळी पंज्याचा प्रचार करायला लागली त्याचवेळी जनतेचा त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला. आता भारतीयांचा विश्वास देशगौरव, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टीवर आहे, या शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सु

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121