माझ्या आयुष्यात मला साहित्य रूपाने साहित्यिकांनी भरभरून दिले आहे,त्यामुळे खरोखरच मी त्यांचा कृतार्थ आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक कृतार्थ संध्याकाळ' या साहित्यिक कार्यक्रमात केले. या साहित्यिक कार्यक्रमात कोमसापतर्फे कवी संमेलन, लोकनेते रामशेठ ठाकूर एक बहुआयामी व्यक्तिमत्व परिसंवाद, सन्मान गौरव, अभिष्टचिंतन संपन्न झाला.
Read More
वेगवेगळ्या समाजमाध्यमांमध्ये काम करताना स्वतःची वेगळी ओळख जपत, सातत्याने नवनिर्मिती करणार्या जितू म्हात्रे यांच्याविषयी...
मराठी चित्रपटसृष्टीसह रंगभूमीच्या आणि साहित्यविश्वाच्या एका शुद्ध आणि सजग वाटचालीला आज विराम मिळाला आहे. श्यामची आई या अजरामर चित्रपटात श्यामची भूमिका साकारून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते, समीक्षक, नाट्यदिग्दर्शक आणि प्राध्यापक माधव वझे यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी सांस्कृतिक विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.