कल्याणात येत्या शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत साई हॉल, वायले नगर, कल्याण पश्चिम येथे रोजगार आपल्या दारी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील तब्बल 4 हजार संधी उपलब्ध होणार आहेत. ज्यामध्ये खासगी क्षेत्रासोबतच शासकीय विभागातीलही निवडक पदांसाठी इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत.
Read More
प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील भव्य मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात दिवाळी साजरी होत आहे. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याणचा ऐतिहासिक भगवा तलाव आज तब्बल 50 हजार दिव्यांनी उजळून निघाल्याचे दिसून आले. कपिल पाटील फाउंडेशन आणि भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात हजारो रामभक्त सहभागी झाले होते.
ऑस्ट्रेलियाने दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या राजधानीतून ऑस्ट्रेलियन आणि परदेशी नागरिकांना १,००० हून अधिक लोकांना बाहेर काढले आहे, असे परराष्ट्र मंत्री मारीस पायने यांनी सोमवारी सांगितले.
कोरोनाने जगभरात थैमान घातले असून आखाती देशातून २६ हजार भारतीयांना मुंबईत आणले जर आहे. महापालिकेतर्फे त्याची राहण्याची व्यवस्था क्वारंटाइनमध्ये करण्यात येणार आहे. देशभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती, कुवेत तसेच ओमानसारख्या आखाती देशात अनेक भारतीय कामानिमित्त आखाती देशांमध्ये वास्तव्यास आहेत. येथील तब्बल २६ हजार भारतीय नागरिक ३१ मार्चपर्यंत मुंबईत दाखल होणार