(Sandip Raut) 'नेत्यांच्या पुढे -पुढे करणाऱ्यांनाच शिवसेना उबाठा पक्षामध्ये पद दिले जाते, शिवसेना उबाठा पक्षामध्ये एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होतो' असा गंभीर आरोप संदीप राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांचे सख्खे बंधू संदीप राऊत उर्फ आप्पा राऊत यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. यानंतर काही वेळातच ती डिलीट केल्याचं दिसून आले. मात्र संदीप राऊत यांनी केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. संदीप राऊत हे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत.
Read More
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेसुद्धा ज्यांना ’शिवसेनेचा राम’ म्हणत होते, तेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी अखेर शिवसेनेलायांच्यासह ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उध्दव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठण शहरामध्ये जाहिर सभा होत आहे.
अरेss हा एकनाथ शिंदे तुम्हाला हलका वाटला काय...
फडणवीस-शिंदे सरकार येताच ठाकरे सरकारमध्ये रखडलेल्या अनेक गोष्टी धडाडीने कार्यान्वीत व्हायला सुरुवात झाली. अशातच गेली अडीच वर्ष वर्क फ्रॉम होम करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि. १५ जुलै) भायखळा मध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामटेकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत चौकशी करण्यासाठी शिवसेनेच्या शाखेत ते हजर होते. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांना घडलेल्या प्रसंगावरून ठाकरेंनी सुनवले खरे मात्र त्यांच
शहापूरच्या काही शिवसैनिकांसोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी गेले असता, भगवान काळे या शिवसैनिकाचा हृद्य विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. परंतु या बद्दल उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दाखल अथवा विचारपूस केली गेली नाही. मात्र, हि गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच, त्यांनी काळे यांच्या कुटुंबाची फोनवरून चौकशी करून त्यांच्या कुटुंबाला पैश्याची मदत केली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यात वारंवार संघर्ष होत आहेत. मंगळवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी विरोध केला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हे 'राज्याचे भावी मुख्यमंत्री' असे लिहिलेले बॅनर्स लावल्याचे पहायला मिळाले. ९ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर्स लावण्यात आले होते. विशेष म्हणजे या बॅनरबाजीमुळे राज्यात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र त्या बॅनर्सवर आता शिवसैनिकांना स्प्रे मारायची वेळ आली आहे.
महिलांचा कायम आदर करणाऱ्या शिवसेनेच्या काही शिवसैनिकांविरोधात रायगडच्या खारघर पोलीस ठाण्यात सोमवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील आणि खारघरचे माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्याविरोधात एका महिलेने मित्रासोबतचे असलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी तक्रार केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेच्या आवारात काही सुडबुध्दी असलेल्या शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत सोमय्यांच्या हाताला दुखापतही झाली. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“होय, ती ऑडिओ क्लिप माझीच,” असे म्हणत उद्धवजींनी सोडलेला बाण त्यांच्यावरच मुख्यमंत्र्यांनी उलटवला.