राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची सून वैष्णवी हगवणे हिने मानसिक छळातून आत्महत्या केल्याने राज्यभरात त्यांच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.
Read More
मराठी 'बिग बॉस’ सीझन ५ चा विजेता सुरज चव्हाण सध्या प्रचंड चर्चेत आहे. एकीकडे त्याच्या हक्काच्या घराचं स्वप्न पुर्ण झालं. तर दुसरीकडे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरजला चित्रपटात काम करण्याची संधी देणार हा दिलेला शब्द पुर्ण केला आहे. ‘झापुक झुपूक हा सुरज चव्हाणचा नवा चित्रपट लवकरच येणार असून चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे.
मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. आपल्या हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि हिच इच्छा सूरज चव्हाणने बोलून दाखवली होती. बिग बॉस नंतर बारामतीला गावी पोहोचलेल्या सूरजचं गावात जंगी स्वागत झालं. पण, यादरम्यान काही करून हक्काचं घर बांधायचं हे स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं. मोढवे गावी परतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला भेटीसाठी आमंत्रण दिलं होतं. या दोघांमध्ये भेट झाल्यावर अजित पवारांनी सूरजला लवकरात लव
‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नुकताच संपला. बारामतीच्या सूरज चव्हाणने शब्द दिल्याप्रमाणे ट्रॉफी गावाकडे आणलीच. दरम्यान, या घरात त्याने तयार केलेली नाती आजही कायम आहेत. काही दिवसांपूर्वीच दिवाळीच्या निमित्ताने विजेत्या सूरजच्या मोढवे गावी इरिना, वैभव, धनंजय, जान्हवी किल्लेकर असे सगळे सदस्य त्याला भेटायला गेले होते. यादरम्यान अंकिता वालावलकर आपल्या मानलेल्या भावाची भेट घ्यायला केव्हा जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. अखेर ती भेट झाली आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा सूरज चव्हाण विजेता ठरला. सूरज चव्हाण विजेता झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. प्रेक्षकांना सूरजचा साधेपणा, खरा स्वभाव आणि टास्कमध्ये दिलेलं १०० टक्के योगदान नक्कीच भावलं. सूरजला बिग बॉसमध्ये सहभागी करुन घेण्यास कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदेंचंही योगदान आहे. बिग बॉसनंतरही केदार शिंदे आणि सूरज चव्हाणचं खास नातं बघायला मिळत आहे. नुकतीच केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणची खास भेट घेतली असून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सूरजच्या खांद्यावर हात ठे
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन ६ ऑक्टोबर २०२४ रोजी अवघ्या ७० दिवसांत संपला. सूरज चव्हाणचा गुलीगलत पॅटर्न यंदाच्या सीझनमध्ये गाजला आणि अखेर ट्रॉफी सूरजने बारामतीला नेलीच. तसेच, हे पर्व गाजण्याचं आणखी एक कारण म्हणजे रितेश देशमुख याचं होस्टिंग. पहिल्यांदाच त्याने बिग बॉसचं होस्टिंग केलं होतं. आणि रितेशने 'भाऊचा धक्का' त्याच्या स्टाईलमध्ये नक्कीच उत्तम केला. त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या पुढच्या पर्वाचंही सूत्रसंचालन करणार का? याचं उत्तर रितेशने दिलं आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन संपला. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी या शोचा महाअंतिम सोहळा दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत यांनी अखेरपर्यंत बिग बॉसच्या घरात आपलं स्थान टिकवून ठेवलं. आणि शेवटी या शर्यतीत सूरज चव्हाण विजय ठरला. सूरज चव्हाणने महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांचं मन जिंकत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. सूरज घरात नेहमी ‘आपला पॅटर्न वेगळाय, ही ट्रॉफी मी जिंकणार, मला माझ्या चाहत्यांवर पूर्ण विश्वास आहे’ असं म्हणायच
Bigg Boss Winner Suraj Chavan बिग बॉस मराठीच्या ५ व्या सीझनचा निकाल ६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. या ग्रँड फिनालेमध्ये खेडेगावातील असलेला रिल्सस्टार सूरज चव्हाणला विजयी घोषित केले आहे. तर गायक अभिजीत सावंतला उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे. सूरच्या विजयामागे आई मरी माता होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अगदीच अंतिम टप्प्यात आला आहे. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी या सीझनचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. परंतु, त्याआधी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरातून या सीझनमध्ये बाहेर गेलेल्या सदस्यांनी घरात पुन्हा एन्ट्री घेतली आहे. आजच्या भागात सर्व सदस्यांचे रियुनियन दिसणार असून यात निक्की आणि अरबाज यांची भेट विशेष लक्षवेधी असणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. दरवर्षी घरात शेवटच्या आठवड्यात स्पर्धेत टिकून राहिलेल्या सगळ्या स्पर्धकांना त्यांचा पहिल्या दिवसापासूनच्या ‘बिग बॉस’च्या घरातील त्यांचा संपूर्ण प्रवास दाखवला जातो. मात्र, यावर्षी यामध्ये एक ट्विस्ट आणण्यात आला आहे. यंदा हे सगळे स्पर्धक पहिल्यांदाच आपला प्रवास पाहण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर येणार आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर आणि अंकिता वालावलकर या स्पर्धकांचा प्रवास आपल्य
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा हा शेवटचा आठवडा सुरू असून या अंतिम टप्प्यात पंढरीनाथ कांबळे यांनी घराचा निरोप घेतला. आता घरात केवळ ७ सदस्य राहिले असून घरात आपलं स्थान अधिक पक्क करण्यासाठी प्रत्येकजण आटापिटा करताना दिसत आहेत. आता बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार असून घरात तिकीट टू फिनालेचा टास्क रंगणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील 'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व २८ जुलै २०२४ ला सुरू झाले. १०० दिवसांचा फॉर्मेट असलेल्या या कार्यक्रमाने मात्र यंदा ती अट मोडित काढत केवळ ७० दिवसांचाच खेळ रंगवायचा निर्णय घेतला आहे. आणि जसा फिनाले जवळ येत आहे त्यानुसार टास्क अधिक कठिण केले जात आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात नवा टास्क 'महाचक्रव्युह' पाहायला मिळाला. या टास्क नंतर निक्की तंबोळी रडताना दिसली.
मराठी बिग बॉसचे पाचवे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहेत. यंदाचं सीझन १०० नाही तर ७० दिवसांत संपणार आहे. या शोचा ग्रँड फिनाले जवळ येत चालला असून आता शोचा विजेता कोण असणार, याबाबत एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पर्वाच्या सुरुवातीपासून निक्की तांबोळीलाच विजेती घोषित करा असे प्रेक्षकही म्हणत होते. परंतु, आता एक फोटो व्हायरल होत असून त्यात थेट विजेता कोण असणार हे नाव समोर येत आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन जुलै महिन्यात सुरु झाला होता. या पर्वात अनेक नव्या गोष्टी घडल्या त्यातली पहिली महत्वाची बाब म्हणजे यंदा महेश मांजरेकर नाही तर रितेश देशमुख यांनी शोचं सुत्रसंचालन केलं. आणि आता आणखी एक आजवर कधीही न घडलेला निर्णय बिग बॉसच्या इतिहासात घेण्यात आला आहे. नुकतीच घरात पत्रकार परिषद झाली होती आणि त्यावरुन यंदा सीझन १०० नाही तर ७० दिवसांचा असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मटण खात नाही पण रस्सा चालतो अशी शरद पवार गटाची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे. भाजप नेते समरजित घाटगेंच्या प्रवेशावरून त्यांनी शरद पवार गटावर जोरदार निशाणा साधला.
मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये सध्या गुलीगत धुमाकूळ घालणारा सूरज चव्हाण महाराष्ट्रातील जनतेचं मन नक्कीच जिंकत आहे. आता लवकरच तो चित्रपटात झळकणार असून प्रेक्षकांना अधिक वेड लावणार असंही दिसून येत आहे. सूरज चव्हाण ‘राजाराणी’ या चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसणार आहे.
मराठी बिग बॉसच्या सीझन ५ चा तिसरा आठवडा सुरु आहे. घरातील सदस्यांनी पहिल्याच दिवसापासून घरात कल्ला करायला सुरुवात केली होती, तर काही सदस्य आता हळूहळू आपले रंग आणि ताकद दाखवत आहेत. बिग बॉस देत असलेले एकापेक्षा एक टास्क पूर्ण करण्यात सदस्यांच्या अगदी नाकीनऊ येत आहे. त्यातच दोन टीम पडल्या असून एकमेकांमध्ये हाणामारीपर्यंत भांडणं सुरु झाली आहेत. या सगळ्यात नेहमी शांत असणाऱ्या साध्याभोळ्या सूरजने मात्र आता टास्कवेळी रौद्र रुप धारण केलं आहे.
मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या जोरदार सुरु आहे. प्रत्येक सदस्य एकमेकांच्या नाकीनऊ आणताना पहिल्या दिवसापासून दिसत आहे. सर्वच सदस्य जबरदस्त खेळ खेळून घरात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. टास्कमध्ये बऱ्याचदा भांडणं तर होतातच पण सदस्य नव्या भागात आपल्याला भावुक होताना दिसणार आहेत. बिग बॉसने सदस्यांना फोन घेऊन कुटुंबाशी बोलायला सांगितलं. त्यावेळी सर्वच सदस्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं.
४ जूननंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी केला आहे. तसेच पक्षाच्या वर्धापनदिनी शरद पवार गटातील अनेक नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर हे चमकू नेते आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण यांनी केली आहे. पुणे अपघात प्रकरणात अंधारे आणि धंगेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर आता सुरज चव्हाण यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
आदित्य ठाकरेंचे विश्वासू सहकारी सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवार, दि. २५ जानेवारी त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील 'पीएमएलए' कोर्टात हजर केले असता, न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण अटकेविरोधात हायकोर्टात गेले आहेत. कोरोनाकाळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी १७ जानेवारी रोजी सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर आता ते आपल्या अटकेच्या विरोधात हायकोर्टात गेले आहेत. सूरज चव्हाण यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सत्र न्यायालयाने दिलेले कोठडीचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे. यावर २९ जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सूरज चव्हाण यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवार, १७ जानेवारी रोजी अटक केली. कोरोनाकाळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी ही अटक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ईडीचे अधिकारी गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करणार आहेत.
उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याने ईडी मागे लागली असे वक्तव्य उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले सुरज चव्हाण यांना ईडीने बुधवारी अटक केली. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
जितेंद्र आव्हाडांनी पक्षासाठी काय केले? तुमच्या कार्यशैलीला कंटाळून पालघर आणि ठाण्यातील कार्यकर्ते सोडून गेले. असा पलटवार अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत दिला आहे. "शरद पवारांनी घामाचा एक-एक थेंबच नाही रक्त आटवून पक्ष वाढवला, पक्षाचा विस्तार केला. 2004 मध्ये तोंडातून रक्त वाहत असताना शरद पवार प्रचाराला फिरले. मांडीचे हाड मोडलेले असतानाही त्यांनी पक्षाचे काम थांबवले नाही. याला म्हणतात पक्षासाठी जीव आणि प्राण देणे. अजित पवारांनी आज
कंत्राट नसताना लाईफलाईन कंपनीतर्फे खरेदी करण्यात आलेल्या शंभर कोटींच्या कोविड घोटाळ्या संदर्भात सुजित पाटकरांना अटक करण्यात आली आहे. राऊतांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या पाटकर यांच्यावर कोविड काळात कंत्राट घोटाळा केल्याचा आरोप आहे. निविदा नसतानाही साहित्य खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ईडीतर्फे १९ जुलैच्या रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत डॉ. किशोर बिचुले यांनाही अटक झाली आहे. ते दहिसर कोविड सेंटरचे इनचार्ज होते.
मुंबई महापालिकेने दिलेल्या कोविड काळातील कामांमधील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारावरून ईडीने कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या सुरज चव्हाण यांची ईडीने बुधवारी कसून चौकशी केली असून तब्बल १७ तासांच्या धाडीत ईडीने अनेक गोष्टींचा उहापोह केल्याचे समजते आहे. ईडीने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी गुरुवारी चव्हाण यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे. कधीकाळी कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणारे ठाकरे आता शिंदेंनी केलेल्या बंडानंतर थेट का
मुंबईत ईडीच्या धाडसत्राला सुरुवात झालेली आहे. मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारांवर ईडीची नजर आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित प्रकरणातही ईडीकडून छापेमारी सुरू आहे. सुजित पाटकर यांच्याशी संबंधित तब्बल १० ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाशी संदर्भात ईडीकडून छापेमारी सुरू आहे.
करोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी ने छापेमारी केली. यावर ज्या लोकांचे कनेक्शन त्यांची चौकशी होणार. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे सुजीत पाटकर यांच्या मालमत्तेवरही छापा टाकण्यात आला आहे. तर, आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि युवासेना पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्यासह सनदी अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे.