मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या खऱ्या पण, गेल्या दोन महीन्यांत मुंबईतील ११ आंतरराष्ट्रीय शाळांना धमकीचे ई-मेल आले आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या बाबत मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की, हे ई-मेल स्वीडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि नॉर्वे सारख्या देशांमधून ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’चा (व्हीपीएन) वापरून करून पाठवण्यात आले आहे. व्हीपीएन वापराने पाठवणाऱ्याची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुबंई पोलिसांनी सांगितले.
Read More
महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार असून या स्टार्टअप्सना उद्योगासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात संधी उपलब्ध होणार आहे. गुगलच्या व्हेंचर कॅपिटल अँड सेटअप पार्टनरशिप विभागाचे प्रमुख डॉ.अपूर्व चॅमरिया यांनी आज कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयातील दालनात भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.
लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, दिवा ते छशिमट जलद लोकल सुरू करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवार, दि. 9 जून रोजी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, त्यावेळी ते बोलत होते.
एका पिढीने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत:ची आवड जपत, स्वप्नपूर्तीसाठी झटणार्या नवोद्योजक साईश कोलते यांच्याविषयी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’चा समारोप; तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत क्रांती घडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारीतील ५३ अनिवासी भूखंडांच्या विक्रीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ई-लिलावासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज गो लाईव्ह कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.
‘ऑपरेशन सिंदूर’ने भारत हा लष्करीदृष्ट्या किती मजबूत देश आहे, तेच सिद्ध केले आहे. भारताचे सामर्थ्य पाहून जगाची छातीच दडपली. यामुळेच भारतातील देशविरोधी नेत्यांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. नरेंद्र मोदी नामक राष्ट्रनायकाच्या पासंगालाही आपण पुरत नाही, हे लक्षात आल्यामुळे भारतविरोधी मजबूर नेत्यांनी थयथयाट सुरू केला आहे.
'स्टार्टअप इंडिया'च्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्र देशाची स्टार्टअप राजधानी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आपल्याला ७०१ किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 'मरिन स्टार्टअप'ला मोठा वाव आहे. त्याला चालना देण्यासाठी येत्या काळात धोरणात्मक पावले उचललेली दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २० मे रोजी व्यक्त केला.
( Minister Mangal Prabhat Lodha on Startup ) एकेकाळी भारताचा जगभरात व्यापार होता. घराघरात लघु आणि कुटीर उद्योगही सुरु असायचे, त्यामुळेच भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जात होत. देशाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्टार्ट अप ही लोकचळवळ व्हायला हवी आज सहभागी झालेल्या कार्यक्रमात शासनाच्या सहा विभागांनी र्स्टाटअप्स सोबत काम करण्यास अनुमती दर्शवली आहे असे प्रतिपादन, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित "टेक वारी" कार्यक्रमात केले.
भारतातील तरुणांचा स्टार्टअप्सकडे कल वाढलेला दिसतो. परंतु, बरेचदा असे होते की, स्टार्टअप सुरू करताना आपल्या वैयक्तिक गरजांकडे दुर्लक्ष होते. यात मग पुढे आर्थिक ओढाताण सुरू होते आणि त्यातूनच मग ते स्टार्टअप बंद पडतात. यामागचे एक कारण म्हणजे, योग्य वेळी योग्य ती गुंतवणूक न करणे, हे होय. अशा या महत्त्वाच्या ‘इन्व्हेस्टमेंट प्रोफायलिंग’ विषयावर स्वानंद समुद्र यांनी त्यांनी आजपर्यंत चार हजारांहून अधिक ग्राहकांना मार्गदर्शन केले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
Proletsभारतीय संस्कृतीत आजही निसर्गाचे महत्त्व अबाधित आहे. अगदी आहारापासून ते रोजच्या जीवनशैलीपर्यंत प्रत्येक बाबतीत निसर्गाशी आपला ऋणानुबंध जुळला आहे. पोषक आहाराच्या दृष्टीन अशीच गोष्ट म्हणजे, भरडधान्य अर्थात मिलेट्स. भरडधान्याचे वैशिष्ट्य असे की, यांच्यात भरपूर पोषणमूल्ये असूनही त्यांच्याकडे इतकी वर्षे कोणाचेच फारसे लक्ष गेले नव्हते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून जगभर ओळखले गेले. पोषणकारी भरडधान्यांच्या प्रेरणेतून मिहीर देसाई यांनी ‘प्र
भारतातील अनेक स्टार्टअप अल्पावधीतच प्रचंड यशस्वी ठरले, तर काही स्टार्टअप्सना आपला गाशा गुंडाळावा लागला, याकडे डोळेझाक करता येणार नाही. त्यानिमित्ताने स्टार्टअप्सचा शुभारंभ करण्यापूर्वी आणि स्टार्टअप सुरु केल्यानंतर नेमकी नवउद्योजकांनी काय खबरदारी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
स्टार्टअपच्या यशस्वीतेत सर्वांत महत्त्वाचे असते, ते अशा स्टार्टअपचे आर्थिक आरोग्य. परंतु, स्टार्टअपने आर्थिक आरोग्य सांभाळायचे म्हणजे नेमके काय करायचे? पैसा मिळवायचा, पण तो टिकवायचा कसा? मी आधी की माझा व्यवसाय? या सर्वच प्रश्नांच्या गलबल्यात अडकून बरेचसे स्टार्टअप अल्पावधीत बंद पडतात. हे नेमके कशामुळे होते आणि ही कोंडी फोडायची तरी कशी? याविषयी ‘फायनान्शियल फिटनेस’चे सुधीर खोत यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदांवर काम करुनसुध्दा आपली नाविन्याची हौस भागवण्यासाठी युट्युब चॅनल सारख्या अतिशय अवघड प्रांतात उडी घेतली, त्यातल्या नवीन आव्हानांना सामोरे जात, गोष्टी शिकत पुढे जाण्याचा अवघड प्रवास केला. स्टार्टअप्सना त्यांचा प्रवास मांडण्यासाठी आणि त्यांच्या संकल्पनांना जगासमोर आणण्यासाठी आपल्या Business Arena 365 या चॅनेलच्या निर्मितीची गोष्ट जाणून घ्या Mahendran Subramanian यांच्याकडून........
८० टक्के स्टार्टअप्स बंद का पडतात? स्टार्टअप्स ते युनिकॉन हा प्रवास प्रत्येकाला का जमत नाही? स्टार्टअप्सना यशस्वी होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सशक्त असणे गरजेचे आहे, पण त्यासाठी नेमकं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर नवउद्यमींना सापडतच नाही. ही कसरत करताना उद्योजकांची आर्थिक कोंडी होते. नेमकी हीच कोंडी फोडण्याचा यशस्वी फॉर्म्युला जाणून घ्या Financial Fitness च्या Sudhir Khot यांच्याकडून.... @SudhirKhot
मुंबई : “महाराष्ट्र ( Maharashtra ) हे आपल्या नाविन्यपूर्ण आणि उद्योगस्नेही धोरणाने जगाची स्टार्टअप राजधानी हा लौकिक लवकरच मिळवेल,” असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्रालयाकडून ‘नाविन्यतेला सशक्त करून महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणे’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आला होता. या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस
नवीन स्टार्ट अप धोरण देशातील आधुनिक धोरण ठरणार असून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गुरुवार, १६ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. या विशेष दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीद्वारे येत्या १६ जानेवारी रोजी मुंबईत एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिग्दर्शकाला ‘चित्रपट दिसतो’ असे म्हणतात. पण, म्हणजे नेमके त्याला चित्रपट किंवा त्यातील प्रत्येक दृश्य व्हिज्युअली कसे दिसेल, ते समजणे म्हणजे नेमके काय, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘झिरो से रिस्टार्ट’ हा चित्रपट. दिग्दर्शक विदु विनोद चोप्रा गेली ४५ वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. १९७६ सालापासून त्यांनी ‘शॉर्ट फिल्म्स’ने त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरू केला, तो आज २०२४ सालापर्यंत अविरत सुरू आहे. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘१२वी फेल’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून तुफान प्रतिसाद मिळवला. द
( Review ) विदु विनोद चोप्रा दिग्दर्शित १२वी फेल चित्रपट कसा घडला या मागची कथा सांगणारा झीरे से रिस्टार्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात १२वी फेल चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या शोधापासून ते अनेक अडचणींचा सामना टीमने कसा केला याचं सादरीकरण दाखवलं आहे.
भारताच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी व राष्ट्रीय उत्पादन केंद्र बनविण्याच्या ध्येयाला पाठिंबा देण्यासाठी उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागा(डीपीआयआयटी)ने मोठा निर्णय घेतला. डीपीआयआयटीने सॉफ्टवेअर सोल्यूशन्समधील जागतिक कंपनी एचसीएल सॉफ्टवेअर कंपनीसोबत मॅन्युफॅक्चरिंग इनक्युबेशन उपक्रमाकरिता धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने इन-स्पेस(IN-SPACE) अंतर्गत अंतराळ क्षेत्रासाठी समर्पित १ हजार कोटी व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करण्यास मंजूरी दिली. दरम्यान, मोदी सरकारने अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा एक भाग म्हणून उपक्रमांमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी IN-SPACE ची स्थापना केली होती. अंतराळ अर्थव्यवस्था सध्या ८.४ अब्ज डॉलर इतकी असून २०३३ पर्यंत ४४ अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे.
केंद्र सरकारने अंतराळ स्टार्ट अप्सच्या साहस निधीसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी गगनयानाच्या पार्श्वभूमीवर अंतराळ क्षेत्रात २००हून अधिक स्टार्टअप्स निर्माण झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ विभाग राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.
केंद्र शासनाच्या 'एक जिल्हा, एक उत्पादन' योजनेंतर्गत ठाणे जिह्यातील प्रोलेट्स ब्रँडला दि. २५ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथील पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट पॅकेजिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फूड व बिवरेज क्षेत्रात देशस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फूड प्रोसेसिंग कंपन्यांना 'Informa Markets'द्वारे 'Fi India Award' देऊन गौरविण्यात येते.
(Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024)पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना आयडी कार्ड, प्रमाणपत्र, स्किल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अमरावती येथील पीएम मित्र पार्कचे ई-भूमिपूजन, १००० आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभ देखील याप्रसंगी करण्यात आला. यावेळी राज्यपाल डॉ. सी. पी.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नव्या चार स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे. तंत्र वस्त्रोद्योगातील महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवोदितांसाठी संशोधन आणि उद्योजकतेसाठी अनुदान (ग्रेट) योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रूपये अनुदानासह मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने देशांतर्गत रोजगारनिर्मितीस चालना देण्यासाठी स्टार्टअप्स योजनेला प्रोत्साहन दिले आहे. या स्टार्टअपसच्या माध्यमातून देशात रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असून सरकारकडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सद्वारे १५.५३ लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल याकरिता प्रयत्न केला जाणार आहे.
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे प्रारंभीक टप्प्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आयोजित करण्यात आली आहे, या योजनेसाठी रु.१०० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून, सुमारे ५०० स्टार्टअप्सना रू १ लाख ते रू २५ लाखपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येईल तरी या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील इच्छुक महिला स्टार्टअप्सनी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत असे
संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगारनिर्मिती, नवीन स्टार्टअप्सवर भर देण्यात आला. केंद्र सरकारकडून रोजगारनिर्मितीसाठी अनेक नव्या तरतूदी करण्यात आल्या असून नवीन रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.
रालोआ सरकारच्या तिसर्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प दि. 23 जुलै रोजी संसदेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पातून सरकारने मागच्या एका दशकातील आपले धोरणसातत्य कायम ठेवले. त्याबरोबरच सरकारने देशातील ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’ला मारक ठरणारा ‘एंजल टॅक्स’ रद्द केला. त्यासोबतच शेजारील देशांना भारताच्या विकासयात्रेत सहभागी करून घेत त्यांनाही भरघोस आर्थिक मदत दिली. तेव्हा ‘एंजल टॅक्स’ रद्द करुन देशातील स्टार्टअपसाठी आणि शेजारी देशांना मदत जाहीर करुन त्यांच्यासाठीही ‘देवदूत’ ठरलेल्या भारतीय अर्थसंकल्पाचे आकलन...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात स्टार्टअप्ससाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यापैकी एक घोषणा एंजल टॅक्स रद्द करण्याची आहे. २०१२ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने एंजल टॅक्स लागू केला होता. हा कर अशा असूचीबद्ध व्यवसायांवर लागू होता ज्यांना गुंतवणूकदारांकडून निधी मिळालेला असतो.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसलेल्या हजारो नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार निवडणूक आयोगाकडून यादीत नाव नसलेल्या मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परिणामी कल्याण पश्चिमेतील हजारो मतदारांच्या नाव नोंदणीचा मार्ग पुन्हा मोकळा झाला असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे.
डीपटेक स्टार्टअप (Deeptech Startup) कंपनीच्या उद्योगांमध्ये भारतात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः २०२३ मध्ये ही संख्या वाढत ४८० उद्योगावर पोहोचली आहे. जागतिक पातळीवर डीपटेक कंपन्यांचे महत्व वाढताना आता भारतातही ही वाढ होत आहे. त्यामुळे भारतात रोजगाराच्या संधी व उद्योगांची स्वायत्तता वाढत आहे. मात्र तंत्रज्ञान विभागातील संस्था Nasscom व Zinnov कंपन्यांनी विंटर फंडिग (निधी) तरतूदीत घट झाल्याचा ट्रेंड कायम राहिल्याचे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने स्टार्टअप कंपन्यांना बळ देण्यासाठी नवी योजना आखण्याचे ठरवले आहे. यामध्ये सरकारने काही नवी तरतूद करून नवी योजना आणण्याचे ठरवले असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. मागील सरकारच्या दोन्ही काळात स्टार्टअप कंपन्यांठी सीड फंडिंग (Seed Funding) योजना आणली होती. याच धर्तीवर ही योजना संप ल्याने पुन्हा एकदा नवे अर्थसहाय्य स्टार्टअप उद्योगासाठी करण्याची शक्यता आहे.
स्टार्टअपसह व स्टार्टअपच्या माध्यमातून लघु उद्योग क्षेत्रात नवउद्योजकांना नव्या व वाढत्या प्रमाणांवर संधी मिळत असतानाच, प्रत्यक्ष स्टार्टअप क्षेत्रातील नवउद्योजक म्हणून महिलांची संख्या मात्र अगदी जागतिक स्तरावर सुद्धा मर्यादित राहिली आहे. भारताच्या संदर्भात पण हीच बाब लागू असून, ऐतिहासिक पार्श्वभूमी व सद्यःस्थिती अशाच स्वरुपाची असून, त्यामुळेच या विषयाचा मुळातून विचार होणे गरजेचे ठरते.
एडुटेक कंपनी बायजूजच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीत खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. बायजूजने ४२ दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या कर्जाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. मध्यस्ताने (Arbitrator) कंपनीला काही समभाग (शेअर्स) न विकण्याचे आदेश दिले आहेत.
व्हेंचर कॅपिटल कंपनी एसेल (Accel) ने उद्योगजगतात मोठी घोषणा केली आहे. भारतातील सुरुवातीच्या स्तरावर असलेल्या स्टार्टअप कंपन्यांना हाताशी घेत या समुहाचा 'अटॉम्स'(Atoms) नावाचा उद्योजकांचा कार्यक्रम सुरू केला आहे.
भारतातील स्टार्टअप महाकुंभला चांगला प्रतिसाद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पॉकेट एफएमने सिरिज डी फंडिगमधून १०३ दशलक्ष डॉलर्स इतक्या निधीचा संग्रह केला आहे. लाईटस्पीडने घेतलेल्या फंड रेजिंग (Fund Raising) फेरीत पॉकेट एफएमने हा निधी जमवला आहे.दर्जेदार कंटेंट व कंपनीच्या भविष्यातील वाढीसाठी या निधीचा उपयोग केला जाईल असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
बुधवारी 'स्टार्टअप महाकुंभ 'या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप हा देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी महत्वाचा कणा असेल हे महत्वपूर्ण विधान केले आहे. बुधवारी सकाळी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्टार्टअपची महती त्यांनी समजावून सांगितली.
देशातील तरुणांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करण्याचा निर्माण करण्याचा मार्ग आता निवडला आहे. स्टार्टअपद्वारे आता मोठे यश मिळवत असून ती आता भारताची संस्कृती झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्ली येथे आयोजित स्टार्टअप महाकुंभास संबोधित करताना ते बोलत होते.
गल प्ले स्टोअरमधील काही ॲपचे लिस्टिंग (सदस्यत्व) हटवल्यानंतर या कंपनीच्या नाराजीचा सामना गुगल कंपनीला करावा लागला होता. परंतु केंद्र सरकारने अंतरिम आदेशानंतर ही गायब झालेली अँप पुन्हा प्ले स्टोअरवर दिसू लागली होती. परंतु बिलिंग या आर्थिक बाबतीसह समस्येसह गुगलने बदलेली धोरण लक्षात घेता कंपनीने विशेषतः भारतीय स्टार्टअप ॲप स्टोअरवरून हटवली होती. याची तक्रार सरकारकडे करत या कंपनींनी सरकारकडे यात दखल देण्याची मागणी केली होती.दुसरीकडे या कंपन्यांनी युएसप्रणित गुगलचा हा भारतीय छोट्या कंपन्यांनासोबत असलेला पक्ष
विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देणे, महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योजकांचा शोध घेणे आणि नवउद्यमींचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करण्यासाठी 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिले आहे. स्थानिक पातळीवर उद्योजक घडावेत, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवार, दि. २६ जानेवारी रोजी दिली.
देशातील सर्वाधिक 'स्टार्ट अप' आणि 'युनिकॉन' हे महाराष्ट्र राज्यात आहेत. 'स्टार्टअप'ची राजधानी म्हणून देशात आपल्या राज्याला ओळखले जाते. त्यामुळे ही ओळख टिकवणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. २५ जानेवारी रोजी केले.
मागच्या एका दशकात ‘स्किल इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यांसारख्या सरकारी योजनांमुळे देशात एक ‘स्टार्टअप क्रांती’ झाली. त्यात नुकताच दि. १६ जानेवारी रोजी ‘स्टार्टअप दिन’ साजरा करण्यात आला. या दिनाचे निमित्त साधून ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटरनल ट्रेड’ (डीपीआयआयटी)ने स्टार्टअप्सवर एक अहवाल प्रकाशित केला. त्याचेच या लेखात केलेले आकलन...
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकवला आहे.
भारतीय शेतीने याआधी पारंपरिक बैलगाडी आधारित होण्यापासून, ट्रॅक्टर आधारित होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. आता शेतीच्या कामांमध्ये होणारा ड्रोनचा वापर हरित क्रांतीची तिसरी लाट ठरणार आहे. कृषी-ड्रोन तंत्रज्ञान आपल्या शेतीच्या पद्धतींना आधुनिक बनवण्यात आणि त्यामध्ये बदल घडवण्यात खर्या अर्थाने यशस्वी होत असल्याचे सिद्ध होत आहे.
केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला मुंबई महानगरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दि. १५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झालेली ही यात्रा आतापर्यंत लक्षावधी नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. यात हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांना फायदा मिळाला आहे. दि. २६ जानेवारी २०२४ या कालावधीपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. आपल्या परिसरात येणाऱ्या या यात्रेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात
शासनाकडून राज्यातील स्टार्टअप्सना आवश्यक असलेले सर्व सहकार्य केले जाईल. आपल्या राज्यास स्टार्ट-अपमध्ये देशात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
क्रिकेट दिग्गज आणि आयसीसी विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फिटनेस स्टार्टअप 'तगडा रहो'मध्ये गुंतवणूक केली आहे. तथापि, स्टार्टअप कंपनीने अद्याप गुंतवणुकीची रक्कम उघड केलेली नाही किंवा धोनींने किती पैसे गुंतवले आहेत किंवा किती भागभांडवल खरेदी केले आहे हे सांगितलेले नाही.
वस्त्रोद्योग क्षेत्रात दर्जात्मक उत्पादन व उत्पादकतेच्या जोडीलाच नावीन्य-कल्पकता, संशोधन स्थायी स्वरुपातील विकास व त्याशिवाय उद्योजकतेवर भर दिला जातो. याच धोरणांना अनुसरून केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने विशेष बाब म्हणून, वस्त्रोद्योगाशी संबंधित स्टार्टअप धोरण जाहीर केले आहे. या नव्या उपक्रमाविषयी...