उध्दव ठाकरेंच्या ओठावर छत्रपती तर पोटात औरंगजेब आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यासोबत सत्ता स्थापन करणाऱ्यांना शिवराय काय कळणार? असा सवाल भाजप नेते डॉ. संजय पांडे यांनी केला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Read More
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर त्यांनी ही भेट घेतली आहे. संजय पांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत चालविल्या जाणार्या बसेस नादुरूस्त असल्याने प्रवाशांसह बस चालक आणि वाहक त्रस्त झाले आहेत. या नादुरूस्त बसेस रस्त्यावर आणू नका अन्यथा आंदोलन करु, असा इशारा परिवहनच्या वाहक व चालकांनी परिवहन प्रशासनाला दिला आहे. कडोंमपाच्या परिवहन उपक्रमातील बहुसंख्य बसेस खिळखिळ्या झाल्या असून त्यांची देखभाल-दुरूस्ती केली जात नाही. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. या प्रकरणी चालक व वाहकांनी परिवहन व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांची भेट घेऊन नादुरू
“महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला अटक करण्याची ‘सुपारी’ मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती. मला हरतर्हेने अडकविण्याचा आदेश ‘वरून’ देण्यात आला होता,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.२४ रोजी दिल्ली येथे केले. त्यामुळे असा आदेश ‘वरून’ म्हणजे ‘मातोश्री’तून आला की ‘सिल्व्हर ओक’वरून, याचे गूढ वाढले आहे.
पोलीस आयुक्त संजय पांडेंना मला अटक करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं,असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत मला अडकवा, जेलमध्ये टाका असे आदेश महाविकास आघाडीने दिले होते.असा गंभीर आरोप फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केला आहे. उद्धव ठाकरेंनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केला असा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान आपण त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असून ताकदीने विरोध करणार असं स्पष्ट करताना त्यांनी वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्ट केलं.
‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’च्या (एनएसई) कर्मचार्यांच्या कथित ‘फोन टॅपिंग’शी संबंधित ‘मनीलॉण्ड्रिंग’ प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी चौकशीनंतर अटक केली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना रविवारी ‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. मंगळवार, दि. ५ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता, चौकशीसाठी ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना समन्समध्ये करण्यात आल्या आहेत.
मुंबईमध्ये विधानभवनात गुरुवारी बहुमत चाचणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई मध्ये एक जबाबदार पोलीस आयुक्ताची गरज लक्षात घेत. मुंबईच्या पोलीस आयुक्त्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
असं म्हणतात की, मुलं ही देवाघरची फुलं. मात्र, सध्या या निरागस, निष्पाप बालकांवर अत्याचाराच्या घटना देशभरात वाढत आहेत. बालकांवर होणार्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी ‘पोक्सो’ कायदा अस्तित्वात आहे. त्या अनुषंगाने घडणार्या घटना, समाजमन आणि प्रशासन यांचा या लेखात घेतलेला हा मागोवा. दुःखद, संतापजनक आणि अतिशय भयावह अशा या चित्राने विचलित होण्यापेक्षा समाजाने आपली सज्जनशक्ती एकत्रित करून परिस्थितीत सुधारणा करायलाच हवी, यासाठी हा लेखप्रपंच...
"माझ्याविरोधातली जुनी प्रकरणे बाहेर काढून , गुन्हे दाखल करून महाविकास आघाडी माझा आवाज बंद करू शकत नाही" असा इशारा भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिला आहे
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जवळचा मंत्री अनिल परब हे मातोश्रीचे खजिनदार आहेत. सचिन वाझेच्या माध्यमातून कलेक्शन जमा करून ते मातोश्रीवर पोहोचवण्याचे काम परब करत होते. ईडीने केलेल्या कारवाईमुळे याच गोष्टीचा आता भांडाफोड होणार आहे. मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारे अनिल परब गजाआड होणार असे म्हटले तर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे कारनामेही लवकरच बाहेर निघतील", अशी प्रतिक्रिया भाजप आमदार रवी राणा यांनी एका व्हिडिओतून दिली. गुरुवार, दि. २६ मे रोजी अनिल परब यांच्यावर ईडीकडून
मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे, हनुमान चालीसा पठणासाठी आग्रही असलेली मनसे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वादात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यासह मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर आणि ८ वकिलांचे शिष्टमंडळ हे राज्यपालांची भेट घेणार आहेत
खार पोलीस स्टेशन मध्ये मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशावरून चुकीची एफआयआर दाखल करण्यात आली असा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या हे संजय पांडे यांच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी रात्री दगडफेक करण्यात आली. "शिवसेनेच्या १०० गुंडांचा माझा मनसुख हिरेन करण्याचा डाव होता" अशा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला
"ज्या रझा अकादमीने आझाद मैदानावरच्या अमर जवान स्तंभची मोडतोड केली, महिला पोलिसांवर हात उगारला, कायम भारताविरुद्ध भूमिका घेतल्या. अशा रझा अकादमीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्तीत होते. त्यांना महाविकास आघाडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेला हा सरकारी आदेश तर नाही ना?", असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. सोमवारी (दि. १८ एप्रिल) ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमार्फत ते बोलत होते.
"मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात ध्वनीप्रदूषण संदर्भात अतिशय चांगले अभियान चालवले आहे. मात्र यालाच जोडून आणखी एक विषय म्हणजे मुंबईत मशिदींबाहेर अनेक बेकायदेशीर भोंगे लावण्यात आले आहेत, त्यांच्यावरही योग्य कारवाई करून ते उतरवण्यात यावेत.", अशी मागणी मंगळवारी मोहित कंबोज यांनी एका व्हिडीओमार्फत केली.
"मुंबई पोलीस आता टोप्या, परफ्यूम्स, कप्स, स्वेटर्स यांसारख्या वस्तू बनवणार आहेत आणि त्यांची विक्री सुद्धा करणार आहेत" अशी घोषणा मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून संवाद साधताना सांगितले
मुंबईचे नवनियुक्त आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयद्वारे ६ तास चौकशी करण्यात आली आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना तक्रारदाराला प्रभावित करण्याच्या कथित भूमिकेसाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची काल सीबीआयने ६ तास चौकशी केली असे एनआयने ट्विट केले आहे.
भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना ट्विटरवरून उत्तर दिले आहे. "आपले कर्म शेवटी आपल्याकडेच येते हे आयुक्तांनी लक्षात ठेवावे आणि कुठलाही छुपा राजकीय अजेंडा राबवू नये" असा सल्ला अमित यांनी मुंबईचे आयुक्त संजय पांडे यांना दिला आहे
क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा नव्याने तपास करा अशी मागणी मोहित कंबोज भारतीय यांनी केली
राज्य सरकारकडून पोलीस दलात मोठे फेरबदल झाला असून महाविकास आघाडीचे नेते नगराळेंपासून नाराज असल्याची चर्चा
भाजप नेते संजय पांडे यांची मुंबईत लावलेल्या पोस्टरवर कारवाईची मागणी
रेमडिसिवीर इंजेक्शन बाबत खोटी माहिती प्रसारीत केल्याबद्दल साकेत गोखले यांच्या विरोधात भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
छत्रपती शिवरायांच्या या पावन भूमीत हिंदूंविरोधात अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या अलिगढ विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्या अटकेसाठी भाजप उत्तर भारतीय मोर्चातर्फे बुधवार, दि. १० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थान असणार्या ‘मातोश्री’समोर एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
‘कोरोना’ या जागतिक महामारीच्या संकटाने उच्च-नीच भेद गळून पडले. सारे एका पातळीत आले. पण, या संकटात सापडलेल्यांना संजय पांडे यांनी मदतीचा हात दिला. कुठलाही भेदाभेद न बाळगता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिकवणुकीनुसार रंजल्या-गांजल्यांची सेवा संजय पांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्याचा मोबदला म्हणजे जनतेने दिलेले अनेकानेक आशीर्वाद आणि प्रेम. तेव्हा, त्यांच्या या मदतकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...