१५ दोषी अधिकार्यांचे निलंबन करणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानसभेत माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीत मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. विशेष लेखापरीक्षण पथकाने केलेल्या तपासणीत २२ कर्मचारी आणि अधिकारी दोषी आढळले आहेत. यापैकी १५ कर्मचारी आणि अधिकारी सध्या कार्यरत असून, उर्वरित ७ निवृत्त झाले आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांवर चौकशी करणे शक्य न झाल्याने कार्यरत १५ जणांची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीत ते दोषी आढळले असून, त्यांच्याकडू
Read More
सभागृहात बीड प्रकरणावर चर्चा सुरु असताना वाल्मिक कराड पुण्यात एका हॉस्पीटलमध्ये टीव्हीवर तमाशा बघत होता, असा गौप्यस्फोट शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवार, ४ जानेवारी रोजी परभणी येथे मुक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
मराठा आरक्षणाला मी किंवा माझ्या पक्षाने तसंच समता परिषदेने कधीही विरोध केलेला नाही. पण आम्ही पहिल्यापासून हे निश्चितपणे म्हणालो आहोत की मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये. वेगळं आरक्षण त्यांना द्या, सर्वोच्च न्यायालयात ज्या त्रुटी असतील त्या दूर करा आणि मराठा बांधवाना आरक्षण द्या. असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 'राष्ट्रवादी भवन' पेटवल्याची घटना समोर आली आहे. तर, बीडमध्ये संतप्त जमावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली.
शरद पवारांनी फक्त वसंतदादा विरोधातचं बंड केला नाही. तर राज्याच्या राजकारणात अनेक काका-पुतण्यात देखील कलह निर्माण करण्याच काम केलय. आज जरी शरद पवार आपल्या पुतण्याच्या बंडाने घायाळ झाले असले तरी त्यांनी स्वत: अनेक पुतण्यांना आपल्याच काकांच्या विरुध्द उभ केलं होत. हा राजकीय इतिहास सांगतो.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यात वारंवार संघर्ष होत आहेत. मंगळवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी विरोध केला आहे.