Sandeep Joshi

रक्षाबंधनचा ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ ला फायदा, अजूनही कमावत आहेत कोटींच्या घरात

हिंदी चित्रपटसृष्टीसाठी ऑगस्ट महिना खऱ्या अर्थाने सुगीचा गेला असेच म्हणावे लागेल. ११ ऑगस्ट रोजी ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. एकीकडे अभिनेता सनी देओल तर दुसरीकडे अक्षय कुमार. दोन्ही अभिनेत्यांचा चाहता वर्ग हा मोठाच. परंतु यावेळी सनी देओलच्या ‘गदर २’ने बाजी मारली आणि बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ ज्यावेळेस प्रदर्शित झाले त्यानंतर मोठा विकेंड असल्यामुळे दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. त्यातही गदर २ चित्रपटाला तर प्रेक्षकांनी इतका प

Read More

लैंगिक शिक्षणाचा संवेदनशील विषय खेळीमेळीने हाताळणारा ‘ओएमजी २’

आपण कितीही पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळत असलो तरीही लैंगिक विषयांवर आधाऱित कोणत्याही बाबी उघडपणे आपल्या पालकांसोबत बोलण्याचे धाडस मुलांचे होत नाही. कदाचित हाच संवाद पालक आणि मुलांमध्ये किंवा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये होत नसल्याकारणाने लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार किंवा किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिकतेसंबंधी चुकीचे समज घर करु लागतात. समाजामध्ये आजही उघडपणे जो विषय बोलला जात नाही किंवा ज्याबद्दल कुणाशीच थेट संवाद साधला जात नाही अशा लैंगिक शिक्षणावर ‘ओएमजी २’ या चित्रपटात फार उत्कृष्टरित्या मांडले आहे. अमित रा

Read More

'ओएमजी २' चित्रपटाला ‘अ’ श्रेणीचा दर्जा, प्रदर्शनाचा मार्ग झाला मोकळा

अभिनेता अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड २' हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटाचा विषय, त्यातील अक्षयची भूमिका आणि अशा अनेक विषयांमुळे चित्रपटाला थेट कोर्टाची पायरी देखील चढावी लागली होती. सेन्सॉर बॉर्डाच्या कात्रीत सापडलेल्या 'ओएमजी २' चित्रपटाची आता सुटका झाली असून सेन्सॉर बॉर्डाने चित्रपटाचा 'अ' श्रेणीचा दर्जा दिला असून १८ वर्षांवरील प्रेक्षकांनाच हा चित्रपट पाहता येणार आहे. सेन्सॉरने या पुर्वी चित्रपटातील काही सिन्स कट करण्यास सांगितले होते. परंतु कोणताही सीन जरी कट केला नसला तरी चित्रपट

Read More

अक्षय कुमार पुन्हा आपल्या पायावर धोंडा मारणार?

चित्रपट म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन करणारे माध्यम आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून विविध विषय वेगवेगळ्या पद्धतीने हाताळत प्रेक्षकांना त्याबद्दल माहिती देण्याचे काम लेखक दिग्दर्शक आणि कलाकार करत असतात. नव्या कथा, विषय, आशय आणि कलाकार यांच्या साच्यातून नवे चित्रपट एकीकडे येत असताना दुसरीकडे मात्र, जुन्या चित्रपटांचा रिमेक किंवा एखाद्या चित्रपटाच्या भागांची शृंखला हिंदी चित्रपट साकारताना दिसत आहेत. गेली ३० वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक यशस्वी चित्रपट प्रेक्षकांना देणाऱ्या अक्षय कुमारच्या पाठीमागे अलीकडच्या काळ

Read More

‘ओएमजी २’ चित्रपट फक्त 'प्रौढांसाठीच'! दिग्दर्शक सेन्सॉर बोर्डावर संतापले

अभिनेता अक्षय कुमारच्या ओह माय गॉड २ चित्रपटाच्या टीझर आणि गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात काही नेटकऱ्यांनी सवयीप्रमाणे अक्षय कुमारला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर, चित्रपटाच्या मेकर्सने देखील सेन्सॉर बोर्डावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. जर बोर्डाने पूर्वीच प्रौढांसाठी असे प्रमाणपत्र दिले आहे तर आणखी कट्स करायला सांगण्याची गरजच काय आहे असा परखड प्रश्न त्यांनी थेट सेन्सॉरला विचारला आहे. त्यामुळे येत्या काळात ओमएमजीची अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून य

Read More

“...तर बॉलिवूडची खैर नाही!”,‘ओएमजी२’ला प्रेक्षकांची तंबी

अभिनेता अक्षय कुमार याने एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरहिट चित्रपट दिले होते. मात्र, अलीकडे त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करण्यात कमी पडत आहे असे दिसून येत आहे. अक्षयचा ओएमजी २ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून त्याचा चित्रपटातील लूक समोर आला आहे. अक्षयने समाजमाध्यमावर प्रदर्शित केलेला त्याच्या या लुकमध्ये तो काळ्या टी-शर्टमध्ये त्रिपुंड, भस्म, जटा, रुद्राक्ष माळा यांसह दिसत आहे. अक्षय कुमारला शंकराच्या अवतारात पाहून लोकांनी लेगचच सल्ले देण्यास सुरुवात

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121