बईच्या पूर्व उपनगरातील पाच मशिदींच्या व्यवस्थापनाने अजानसाठी वापरले जाणारे लाऊडस्पीकर हटवण्याच्या नोटीशीप्रकरणी मंगळवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात याचिकाकर्त्यांनी पोलिसांवर आरोप केला आहे की, या मशिदींना निरर्थक नोटिसा बजावून मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
Read More
दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असून या प्रकरणात कोणताही लैंगिक अत्याचार किंवा हत्या झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणात दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत त्यांच्या मुलीच्या मृत्यूला गूढ व अमानवी स्वरूप असल्याचे नमूद करत, सीबीआय आणि उबाठाचे वरळीतील आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकार ठोस भूमिका घेणार का? प्रविण दरेकरांचा सभागृहात सवाल मुंबईतील पोलिसांच्या घरांचा प्रश्न अत्यंत दयनीय, बिकट आहे. जे पोलीस आपल्या संरक्षणाची काळजी घेतात तेही सुस्थितीत राहावे ही आपली जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांचे पोलिसांवर विशेष लक्ष आहे. त्यामुळे राज्य सरकार पोलिसांच्या घरांबाबत भूमिका घेईल का?, असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी प्रश्नोत्तराच्या चर्चेवेळी उपस्थित केला. विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे दादर चौपाटी बंद करण्यात आल्याची खोटी माहिती व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर पसरवल्या जात आहेत तर याबाबत मुंबई पोलिसांनी X च्या माध्यमातून सहास्पष्टीकरण दिले आहे.
विवेक फणसाळकर यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. संजयकुमार वर्मा, सदानंद दाते, रितेश कुमार, अर्चना त्यागी, देवेन भारती आणि अमिताभ गुप्ता यांची नावे चर्चेत होती. त्यापैकी देवेन भारती यांच्या गळ्यात माळ आयुक्तपदाची माळ पडली. डॅशिंग आयपीएस अधिकारी, अशी त्यांची ओळख. 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या तपासात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. कुख्यात दहशतवादी कसाबला फाशीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कणा मोड
मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवार, ३० एप्रिल रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.
भारतीय पोलीस सेवेतील १९९४च्या तुकडीचे डॅशिंग अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती यांना मुंबई पोलीस दलात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे.
३५ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणारे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे बुधवार दि. ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आयुक्तपदासाठी रितेश कुमार, अमिताभ गुप्ता, संजीवकुमार सिंघल या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शासनाचा आदेश जारी करण्यात आला असून उद्या म्हणजे गुरुवार दि. १ मे रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत.
( Vishwa Hindu Parishad morcha on Mumbai Police Commissionerate today ) हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून आकस भावनेने होणार्या कारवाईच्या निषेधार्थ ‘विश्व हिंदू परिषदे’चा मोर्चा मंगळवार, दि. 29 एप्रिल रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडकणार आहे. दुपारी 3 वाजता चर्चगेट रेल्वे स्थानक ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ येथे सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ‘विश्व हिंदू परिषद’ कोकण प्रांताचे प्र
सायबर गुन्हेगारी रोखणे तसेच सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, ७ एप्रिल रोजी केले.
(Disha Salian Case) दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या लॅपटॉपमध्ये तिचे वडील सतीश सालियान यांचा व्हॉट्सअॅप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आधीच्या एसआयटीला चौकशीदरम्यान हा डेटा मिळाला होता. या डेटामुळे, दिशाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यामागे तिच्या वडिलांशी झालेला वाद कारणीभूत होता का, या दिशेने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Narendra Modi देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी त्यांच्या विमानाला दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली. यासंबंधित माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात आली. ज्या व्यक्तीने फोन केला त्याला अटक करण्यात आली. तसेच तो युवक मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.
सैफ खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात १९ जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद नावाच्या संशयित बांगलादेशी घुसखोराला ठाण्याहून अटक केली होती. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार १६ जानेवारी रोजी पहाटे वांद्रे पश्चिम येथील अभिनेत्याच्या घरात घुसून हल्ला केल्याची त्याने कबुली दिली. एका अधिकृत निवेदनात, मुंबई पोलिसांनी सांगितले की सदर आरोपीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला आणि बनावट हिंदू ओळखपत्र वापरून तो काम करत होता.
(Saif Ali Khan Attacked) बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रयातील घरात १६ जानेवारीला मध्यरात्री चाकू हल्ला झाला. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. पोलिसांनी या व्यक्तीला वांद्रे पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. ताब्यात घेतलेला व्यक्ती हा आरोपी नाही, असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींची ओळख अखेर पटली आहे. तसंच त्यांचा ठावठिकाणा माहिती करण्यातही पोलिसांना यश आले आहे.
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) यांच्याविषयी केलेले वक्तव्य आमदार सुरेश धस यांना भोवण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोग ॲक्शनमोडवर आला असून, मुंबई पोलीस आयुक्तांना कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
मुंबई : काही दिवसात ग्रेगोरियन नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. लोक या इंग्रजी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ( Mumbai Police ) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबई पोलिसांकडून मध्यरात्री मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचा पालन न करणारे वाहन चालक तसेच मध्यरात्री फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
Mumbai police इराणी टोळीने मुंबई पोलिसांवर हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी घडली होती. इराणी टोळीच्या सुमारे २० जणांनी पोलिसांवर दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पावले, हनुमंत पुजारी आणि सुनील लोखंडे हे तीन पोलीस गंभीर जखमी झाल्याची घटना आंबवली रेल्वे स्थानकाजवळ घडली असून पोलिसांनी एका २० वर्षीय चेन स्नॅचरला अटक केली होती.
अभिनेता सलमान खान याला गेले अनेक दिवस बिश्नोई गॅंगकडून धमक्यांचं सत्र सुरुच आहे. यातल्या काही धमक्या तपासाअंती फक्त खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी काही बाबतीत मुंबई पोलीस तपास करून धमकी देणाऱ्यांच्या मागावरही आहेत. आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आल्यामुळे मुंबई पोलिसांची चिंता आणखी वाढली आहे. यासंदर्भात पुन्हा एकदा वरळी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांना ४ नोव्हेंबरच्या रात्री एक धमकीचा मेसेज आला आहे. यात सलमान खानला जर जीवंत राहायचे असेल तर त्याने मंदिरात येऊन माफी तरी मागावी किंवा ५ कोटी रूपयांची खंडणी द्यावी असे म्हटले आहे. या आठवड्यात सलमानला आलेली ही दुसरी धमकी आहे. माध्यामांना मिळलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल रात्री व्हॉट्सॲपवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा हा संदेश आला आहे.
मुंबई : राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी धोरण निश्चिती करणे आवश्यक असून, नेमके हेच करण्यात उद्धव ठाकरे Uddhav Thacheray अपयशी ठरल्याचा निष्कर्ष ‘राष्ट्रीय मतदाता मंच’च्या अहवालातून काढण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय मतदाता मंच’ने नुकताच ‘महाराष्ट्र सरकार मूल्यमापन अहवाल २०१९-२४’ प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये राज्य सरकारच्या २०१९ ते २०२४ काळातील कामगिरीचा सर्वांकष आढावा घेतला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी शनिवारी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या आरोपीचा मुंबई पोलिसांना शोध घेतला असून, सदर आरोपी एक महिला असल्याची बाब उघडकीस आली आहे. भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ यांनी १० दिवसात जर आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही, तर त्यांची सुद्धा बाबा सिद्दिकी यांच्या सारखीच हत्या केली जाईल असे या महिलेने म्हटले होते.
Salman Khan बॉलिवूडचा दबंग खान अभिनेता सलमान याला काही दिवसांआधी लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्याचा जीव वाचवायचा असेल तर लवकरात लवकर २ कोटी रुपय द्यावी असा मेसेज सध्या मुंबई पोलीसांना पाठवण्यात आला आहे.
मुंबई- Election commission news : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून बुधवार, दि. ३० ऑक्टोबरपर्यंत राज्यात १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातूंचा त्यात समावेश असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सध्या त्याची सुरक्षा अधिक वाढवण्यात देखील आली आहे. एकीकडे सलमान-बिश्नोई वाद सुरु असताना आता अभिनेता आणि निर्माता कमाल खान याने सलमानशी पंगा घेतला आहे.
Salman Khan मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रामांकावर जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ५ कोटीं रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, जर सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईसोबत वैर संपवून जिवंत राहायचे असेल तर किमान ५ कोटी रुपये द्यावे. जर पैसे दिले नाहीतर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल. या मेसेजमुळे मुंबई पोलीस याप्रकरणाचा तपास सुरू करत आहेत.
(Baba Siddique Murder Case) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी याच्या निर्मल नगर येथील कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकीं वर गोळीबार करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र दिवसागणिक या प्रकरणातील नवनवीन खुलासे उघडकीस येत आहेत. या हत्येसाठी मारेकऱ्यांकडून तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
(Baba Siddique Murder Case )राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र तिसरा मारेकरी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा शनिवारी रात्री खून करण्यात आला. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने स्विकारली आहे.
Mumbai Police नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मुंबई पोलिस ढाल बूनन मुंबईकरांच्या संरक्षणासाठी तत्पर आहेत. नवरात्रौत्सवात गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. यावेळी मुंबई पोलिसांची गर्दीच्या ठिकाणी करडी नजर असणार आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.
हिंदी चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे मुलाचे अपहरण करण्याची घटना अंबरनाथमध्ये घडली
बदलापूरमधील दुर्देवी घटनेनंतर आरोपीला ताबडतोब फाशी द्या अशा घोषणा देत रेल्वे रोखून आंदोलन केले, त्या कूरकर्मा आरोपीविषयी विरोधकांना आपुलकी का वाढली, अशी सडकून टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
श्रीमद राजचंद्रजी मार्ग, रॉयल ओपेरा हाऊस येथे दर महिन्याला एक आकर्षक सामुदायिक कार्यक्रमासाठी एसआरएमडी युथविंगच्या पुढाकाराने आणि लोधा फाउंडेशन, बीएमसी, मुंबई पोलीस आणि B.E.S.T च्या सहकार्याने आयोजित ‘जॉय एवेन्यूचा’ पहिला कार्यक्रम नुकताच पार पडला.
(fake notice) राज्यात मागील काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सायबर चोरटे फसवणुकीसाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या वापरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अनेक नागरिकांना आयुक्तांच्या नावे सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, ई-मेल, तसेच मेसेज व फोन करून कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून अटक करण्याची धमकी दिली जात आहे. असे कॉल आल्यास अथवा मेसेजेस आल्यास न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधा, असे अवाहन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केले आहे.
अभिनेता सलमान खानच्या घरावर एप्रिल महिन्यात गोळीबार झाला होता; तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देखील एका युट्यूबरकडून देण्यात आली होती. आत या ट्यूबरला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या एस्प्लेनेड मॅजिस्ट्रेट कोर्टाने युट्यूबरला जामीन मंजूर केल्याचे सांगितले जात आहे. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या युट्यूबर बनवारीलाल लातुरलाल गुजर याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती.
टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हसह नरीमन पॉईंटपर्यंत चाहत्यांचा जनसागर उसळला आहे. टीम इंडियाच्या विश्वविजयानंतर शहरात ओपन टॉप बसमधून विजय परेडचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर गर्दीचा विचार करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनास निर्देश दिले आहेत.
मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसरात गेल्या सहा-सात महिन्यापासून महापालिका आणि एएसआयकडून पुनरुज्जीवनाचे काम सुरु आहे. १५ दिवसापुर्वी बाणगंगा तलाव परिसराची पाहणी केली असता काम व्यवस्थित होत नसल्याचे संबधित अधिकाऱ्यांना कळवले होते. पण काल बाणगंगा तलावातील गाळ काढण्याचे काम देण्यात आलेल्या कॅन्ट्रक्टरने पैसे वाचवण्यासाठी एक्सकेंव्हेटर संयंत्र उतरवून तलावांच्या पायऱ्यांची हानी केली. यामुळे ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्व असलेल्या या स्थळाचे नुकसान झाले, असे विधान कॅबिनेट मंत्री आणि स्थानिक आमदार मंगल प्रभात लो
शहरातील वाढत्या रोहिंग्या आणि बांग्लादेशी लोकांच्या अनधिकृत वास्तव्यामुळे फक्त पोलिसांची नाही, तर आपल्या समाजाची देखील डोकेदुखी वाढली आहे, असे कॅबिनेट मंत्री तथा उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अखेर मुंबई पोलिसांनी गुरुवार, दि. 16 मे रोजी अटक केली आहे. राजस्थानच्या जयपूरमधून भावेशच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. भावेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची सात पथके कार्यरत होती. वेगवेगळ्या भागात भिंडेचा पोलिसांकडून शोध सुरू होता. तो राज्याबाहेर पळाल्याचा संशय पोलिसांना होता. यापूर्वी भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळले होते.
मानखुर्द रेल्वे स्थानक जवळ मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आयुष राजेश शेगोकार असे या दुर्देवी मृत्यू पावलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
न्यायालयाने बुधवारी, दि. ६ मार्च २०२४ रिपब्लिक टीव्ही आणि त्याचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध दाखल केलेला बनावट टीआरपी खटला (TRP scam) मागे घेण्याची परवानगी दिली. वास्तविक, मुंबई पोलिसांनी न्यायालयात अर्ज दिला होता. या अर्जात उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात दाखल झालेले खटले बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. न्यायालयाने हा अर्ज स्वीकारला.
नववर्ष सुरु होण्यासाठी अवघा एक दिवस उरला असताना शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी वाहूतक पोलीसांकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, ३१ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ८ ते १ जानेवारी २०२४ सकाळी ८ या कालावधीत सांताक्रुझ वाहतुक विभागात जुहू चौपाटी येथे खूप मोठया संख्येने जनसमुदाय येण्याची शक्यता आहे.
बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ९ जानेवारी २०२४ पर्यंत मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र वाहतूक बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.
अभिनेता सलमान खान याच्या जीवाला गेल्या काही दिवसांपासून धोका आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने धमकी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. यानंतर मुंबई पोलिस अधिक सतर्क झाले असून त्यांनी सलमान खानच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलली आहेत.
मुंबई शहरातील वाढत्या वायू प्रदुषणामुळे महापालिका प्रशासन सतर्क असून सरकार पातळीवर नवनवीन उपाययोजना राबविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. दरम्यान, पालिका प्रशासन वायू प्रदुषणाबाबत उपाययोजना करण्यात व्यस्त असताना एका व्यक्तीने X वर पोस्ट करत आणखी नवा एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागातील भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी समुद्रात कचरा टाकत असलेले छायाचित्र हे समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. अनेक नागरिक तसेच मान्यवरांनी या कृत्याबाबत खेद व्यक्त केला होता.
महादेव बेटिंग ॲप प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत असून आता याप्रकरणी नवीन माहिती पुढे आली आहे. मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यासंबंधीचा पुढील तपास अजून सुरु आहे.
संपूर्ण देशात सध्या एकदिवसीय आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. ५ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या वर्ल्ड कपचा आज (२१ ऑक्टोबर) साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड हा विसावा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आहे. यावेळी कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले असून त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाी प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच ललित पाटील प्रकरणी सर्वच धागेदोरेबाहेर येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.