राज्यात आगामी काळात नवीन ऊर्जा स्रोतांचा विकास, ग्रीन एनर्जी प्रकल्प आणि वीज निर्मितीमध्ये सुधारणांवर विशेष भर देण्यात यावा असे निर्देश उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. एचएसबीसी फोर्ट, मुंबई येथे आयोजित उर्जा विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, संचालक संजय मारुडकर, अभय हरणे, बाळासाहेब थिटे, कार्यकारी संचालक राजेंश पाटील, पंकज नागदेवते, नितीन चांदुरकर उपस्थित होते.
Read More
राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढतो आहे. अशावेळी वाढत्या मागणीनुसार वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विजेच्या ग्रीडला संतुलित करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर जल विद्युत केंद्राची महत्वाची भूमिका असते. अधिक वीज मागणीच्या काळामध्ये वीज पुरवठा करण्यामध्ये हा उदंचन जल विद्युत प्रकल्प अत्यंत महत्वाचे योगदान देतो.
ऊर्जा खात्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले विश्वास पाठक यांची महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनी अंतर्गत असलेल्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांवर स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक झाली आहे
ठाण्यात गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी आता मंडळांना ऑनलाईन अर्ज उपलब्ध करण्यासोबतच मंडळांना संबंधित प्रभाग समिती क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्रात ‘एक खिडकी’ योजनेद्वारेदेखील अर्ज सादर करता येणार आहेत.