(MP Ravindra Waikar) शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्या गाडीचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातावेळी खासदार रविंद्र वायकर हे गाडीतच असल्याचे समजते आहे.
Read More
मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर ( Ravindra Waikar ) यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे रवींद्र वायकर यांची खासदारकी अबाधित राहणार आहे.
(Ameet Satam ) भाजप आमदार आणि अंधेरी (प) विधानसभेचे उमेदवार अमीत साटम यांचे शॉपर स्टॉप जवळील एस वी रोड येथे मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रवींद्र वायकरांच्या विजयावर सध्या विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वायकरांनी आता विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तसेच यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
महाविकास आघाडी म्हणजे खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याची कोटा फॅक्टरी आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शिवसनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर आता केशव उपाध्येंनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीची लढत झालेल्या उत्तर पश्चिम मतदारसंघात टपाली मतांमुळे कौल बदलला आहे. 'ईव्हिएम' मोजणीत उबाठा गटाचे अमोल कीर्तिकर हे केवळ एका मताने आघाडीवर होते. मात्र, टपाली मतांचा कल जाहीर होताच शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी आघाडी घेतली आणि अवघ्या ४८ मतांनी ते विजयी ठरले.
उत्तर पश्चिम लोकसभा निवडणूकीत उबाठाचे अमोल किर्तीकर विरुद्ध महायुतीचे रवींद्र वायकर यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. सुरुवातीपासून अमोल किर्तीकर यांनी आघाडी घेतलेल्या या मतदार संघात आता रवींद्र वायकरही कडवी झुंज देताना पहायला मिळत आहेत. हातात कमी दिवस असताना नाव घोषित झाल्यानंतर वायकर यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे सुपूत्र अमोल किर्तीकर यांना तिकीट जाहीर केलं होतं.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांना मतमोजणीत लीड मिळालेली होती. पण आता मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात फेर मतमोजणी होत आहे. त्यामुळे आता मुंबई उत्तर पश्चिममध्ये काही चित्र बदलते का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. सद्या रविंद्र वायकर ७५ मतांनी आघाडीवर आहेत. तर अमोल किर्तीकर यांना ४ लाख ४३ हजार ४०३ मते मिळाली आहेत.
अनिल परबांनी आधी उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या घोटाळ्यांचा हिशोब मागावा, असे प्रत्युत्तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महाराष्ट्रातील ४८ जागांवर प्रचार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यांनी बुधवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
शिवसेनेने नुकतीच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर हे महायूतीचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा थेट सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरेंच्या 'युझ ॲण्ड थ्रो' पॉलीसीमुळे सगळे निष्ठावान त्यांना सोडून चालले आहेत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर केली आहे. रविवारी उबाठा गटाचे नेते रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावर आता राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. रवींद्र वायकर आज रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा जबर धक्का बसला आहे.
उबाठा गटाचे आ. रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आ. वायकरांनी काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना उबाठा गटाच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे रवींद्र वायकर हे उबाठा गटाला अखेरचा रामराम करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. रविंद्र वायकर हे उबाठा गटाला सोडून शिवसेनेत प्रवेश करतील, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चालू आहेत. रविंद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेल्यास, उबाठा गटासाठी हा मोठा धक्का असेल.
राज्यात सध्या ईडीचे धाडसत्र सुरु असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाच्या नेत्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टोला लगावला आहे. पुढील आठवड्यात उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, उबाठाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत व विधिता संजय राऊत यांना ईडीकडे हिशोब द्यावाच लागेल, असे ते म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटातील नेत्यांना ईडीचा दणका बसला आहे. या नेत्यांवर असलेल्या आरोपांबद्दल त्यांना ईडीने समन्स बजावले आहेत. यामध्ये उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर आणि शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांचा समावेश आहे.
काही दिवसांपुर्वी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड होती. रवींद्र वायकरांवर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, आता किरीट सोमय्यांनी याप्रकरणी पुन्हा एक मोठा खुलासा केला आहे.
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. जोगेश्वरी येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी ही धाड पडली आहे. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि इतर चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. याशिवाय रवींद्र वायकर यांच्या भागीदारांच्या घरावरही धाड पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
जोगेश्वरी येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी मंगळवारी सकाळीच ईडीची धाड पडली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. 'कर नाही त्याला डर कशाला' असे ते म्हणाले आहेत. तसेच आमचं सरकार कुठलाही राजकीय आकस ठेवून काम करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मंगळवारी सकाळी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप केला होता. आता त्यांच्या घरी ईडीची धाड पडली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, किरीट सोमय्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार अपात्रता प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीवर भाष्य केले. तसेच आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोकं आहोत, अशी भुमिका मांडली. मात्र त्यांची ही भुमिका जनतेच्या मनात भावनिक वातावरण निर्माण करण्यासाठी आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यातून रडीचा डाव बघायला मिळाला, अशी घाणघाती टीका भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली.
मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या कुठल्या वहिनी या रवींद्र वायकरच्या पार्टनर आहे? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. मंगळवारी सकाळी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यांना प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका १० वर्षांच्या आत कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तथापि ही मर्यादा पाच वर्षापर्यंत कमी करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
आजचा दिवस कोविडकाळात निष्पाप बळी गेलेल्या मुंबईकरांसाठी महत्त्वाचा होता. कारण आज एकीकडे बॉडीबॅग खरेदी घोटाळ्यासंबधी किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी झाली. तर दुसरीकडे ऑक्सिजन घोटाळ्यातील आरोपीविरुद्ध तक्रार दाखल झाली.त्यामुळे आज मुंबईकरांचा ऑक्सिजन घोटाळ्याने कसा जीव घेतला? बॉडीबॅग खरेदीत घोटाळा कसा झाला? त्यात आतापर्यत कोणाची नावे उघडकीस आले आहेत. ह्यामागे मास्टरमाईंड कोण आहे? अशा सर्व प्रश्नाची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात असलेले साई रिसॉर्ट प्रकरण चर्चेत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमंक काय घडतं? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यातच आता एकीकडे दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश अनिल परब यांना सत्र न्यायालयाने दिले आहेत. तर दुसरीकडे खिचडी घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलायं.तसेच रवींद्र वायकरांवर ही ईडीने गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे या तिन्ही घटनांचा वेध घेत आज आपण साई रिसॉर्ट प्रकरण, खिचडी घोटाळा, पंचतारींकित हॉट
कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून ऑक्टोबरमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ईडीने रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ईडीने मनी लॉड्रिंग प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलेत. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. त्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावलं आहे. त्यांना दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्या
एकीकडे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरु असताना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी राज्य सरकार एका याचिकेतून आरोप केला होता. परंतु, आता हायकोर्टाने हा आरोप फेटाळल्याने शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे.
उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी त्यांना आणि इतर चार जणांना मुंबईत आलिशान हॉटेल बांधण्याची दिलेली परवानगी रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला. मात्र, वायकर यांना सर्वोच्च न्यायालयात जाता यावे यासाठी उच्च न्यायालयाने आपल्या आदेशाला चार आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे.
उद्धव ठाकरे गटाला आज (५ ऑगस्ट) दोन मोठे धक्के मिळाले आहेत. कोविड सेंटर घोटाळ्याबाबत किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता, ठाकरे गटाचे माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. सध्या वायकर हे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. याबद्दल भाजपा नेते किरीट सोमय्यांनी माहिती दिली आहे.
ठाकरे गटाचे माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून ५ तास चौकशी करण्यात आली. जोगेश्वरी येथील पंचतारांकित हॉटेल मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी बांधले आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. रविंद्र वायकर यांच्या जोगेश्वरीतील पंचतारांकित हॉटेलचा घोटाळा सिद्ध झाला असून ते उद्धव ठाकरे यांचे भागीदार आहेत. अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. शिवाय, राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला वायकर यांच्या घोटाळ्यावर ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वायकरांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे करणार असल्याची माहिती सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबईतील ५०० कोटींचा कथित फाईव्ह स्टार हॉटेल घोटाळा प्रकरणी आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, यात मुंबई पालिकेचे अधिकारीही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
मुंबई : जोगेश्वरी पुर्व येथील पूनमनगर येथील पी.एम.जी.पीच्या इमारतीची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्याची मागणी आमदार रवींद्र वायकर यांनी प्रशासनाकडे केली आहे. पूनमनगर येथील १७ इमारती अति धोकादायक आहेत. यात सुमारे ९८२ सदनिकाधारक रहात आहेत. पावसाळ्यापूर्वी या इमारतींची डागडुजी करावी, अशी मागणी वायकरांनी म्हाडाकडे केली आहे. तसेच राज्य सरकारलाही यावेळी वायकरांनी याप्रश्नी विचारणा केली आहे. राज्य शासनाने या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
गोरेगाव येथील आरे कॉलनीच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य रवींद्र वायकर, सुनील राणे यांनी ‘आरे’च्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे प्रतिपादन
पावसाळा सुरु झाला असून पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न सर्वच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ऐरणीवर आला आहे.