भारत आणि अमेरिका अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर), कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), अत्यावश्यक खनिजे, प्रगत दूरसंचार आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी वाढवणार आहेत.
Read More
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन भारत दौऱ्यावर आले आहेत. भारतात पोहोचल्यानंतर त्यांनी भारताचे राष्टीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. सुलिव्हन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज (iCET) च्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. ते अजित डोवाल यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील आणि भारत-अमेरिका संबंधांचा आढावा घेतील.