जेएम फायनांशियल प्रायव्हेट इक्विटी (JM Financial Private Equity) ने मोडिश ट्रॅक्टरऑरकिसान प्रायव्हेट लिमिटेड (Tractoraurkisan Pvt Ltd) कंपनीत ४० कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. त्यांचा ब्रँड ' बलवान' (Balwan) मध्ये ही गुंतवणूक केली जाऊ शकते. ही अँग्री मशिन व टूल बनवणारी कंपनी आहे. शेतकऱ्यांना लागणारी मशिनरी ही कंपनी बनवते. २०१५ साली या कंपनीची स्थापना झाली होती. बलवान या ब्रँड अंतर्गत शेतकऱ्यांना लागणारे मत सहाय्य देखील पुरवते.
Read More
बेन कॅपिटल आपले ४२९ दशलक्ष डॉलर्स किंमतीचे भागभांडवल विकणार असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये खाजगी इक्विटी कंपनी बेन कॅपिटलने बँकेत ४२९ दशलक्ष डॉलर्स समभाग विकत घेतले होते.
खाजगी इक्विटी (Private Equity) व व्हेंचर भांडवल (Venture Capital) मध्ये घट झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. फेब्रुवारी महिन्यात खाजगी इक्विटी व व्हेंचर भांडवलात ३९ टक्क्याने घट होत २.२ अब्ज रूपयांपर्यंत पोहोचले असल्याचे गुरुवारी एका अहवालात म्हटले गेले आहे.