Pm Narendra Modi

सेमीकंडक्टरचा विचार भारतात ५० वर्षांपूर्वीच झाला होता; पण त्या कल्पनेचीच भ्रूणहत्या झाली!

(PM Narendra Modi on Semiconductor Development) भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दि. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी साल २०२५ च्या अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगभरातील इतर राष्ट्रे समृद्ध होत गेली, परंतु भारताचे सेमीकंडक्टरचे स्वप्न ५०-६० वर्षांपूर्वीच जन्माच्यावेळीच स

Read More

"आता न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"; थेट लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

(PM Modi warns Pakistan over Nuclear Blackmail) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. राजधानी दिल्लीत झालेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी "स्वातंत्र्याचं हे पर्व १४० कोटी देशवासियांसाठी 'संकल्पांचा, सामूहिक सिद्धींचा आणि गौरवाचे' पर्व असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी पहलगाम दहशदवादी हल्ल्यानंतर राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या भारताच्या लष्करी कारवाईचा उल्लेख करत पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कठोर संदेश दिला.

Read More

पंतप्रधान मोदींनी इंदिरा गांधींना टाकलं मागे! सर्वाधिक काळ पद भूषवणारे दुसरे पंतप्रधान

(PM Narendra Modi breaks Indira Gandhi's record) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन विक्रम केला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडीत काढून आपल्यानावे केला आहे. सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते ठरले आहेत. त्यांनी आज म्हणजेच शुक्रवार, दि. २५ जुलै रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले आहेत. सलग सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवण्याच्या बाबतीत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आघाडीवर आहेत. त्यांच्यानंतर इंदिरा गा

Read More

पंतप्रधान मोदींचा घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान! भारत-घाना संबंधांना नवीन गती

(PM Narendra Modi honoured with Ghana's National Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी २ जुलैला पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. गेल्या १० वर्षांतील त्यांचा हा सर्वात मोठा विदेश दौरा असून तो तब्बल पाच आठवडे चालणार आहे. घानापासून मोदींनी आपल्या या दौऱ्याला सुरुवात केली असून गुरुवारी त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांची भेट घेतली. राजधानी अक्रा येथे एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्राध्यक्ष महामा यांनी पंतप्रधान मोदी यांचा घानाच्या 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' या राष्ट्रीय पुरस्क

Read More

"भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये मध्यस्थी स्वीकारणार नाही", पंतप्रधान मोदी-ट्रम्प यांच्यात ३५ मिनिटे फोनवर चर्चा! मोदींनी स्पष्टच सांगितले...

(PM Narendra Modi) कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये ३५ मिनिटे फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर जी-७ शिखर परिषदेच्या वेळी त्यांची भेट होणार होती, परंतु डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत लवकर परतल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या विनंतीवरून दोघांमध्ये फोनवरुन ही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल ट्रम्प यांच्यांशी सविस्तर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र सचि

Read More

पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे म

Read More

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच गुजरातमध्ये! भव्य रोड शोदरम्यान कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबियांकडून खास स्वागत

(PM Narendra Modi Holds Roadshow in Vadodara) ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी (२६ मे) दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. वडोदरा येथे झालेल्या रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या वडोदरा रोड शोमध्ये भारतीय लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही भाग घेतला. पंतप्रधानांचे स्वागत करताना कुरेशी कुटुंबियांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read More

पंतप्रधान मोदींकडून दाहोदला २४ हजार कोटींची भेट! पहिल्या ‘इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह’ला हिरवा झेंडा

(PM Narendra Modi inaugurated a locomotive plant in Dahod) पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सोमवारी दि. २६ मे रोजी वडोदऱ्यातील रोड शोने दौऱ्याची सुरुवात केल्यानंतर दाहोद येथे पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशातील पहिल्या लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवत प्रकल्पाचा शुभारंभ केला. लोकोमोटिव्ह प्लांटच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी स्वतः इंजिनात बसून त्याची माहिती घेतली. या वेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आण

Read More

"ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी..." लेखक विक्रम संपथ यांची 'ती' पोस्ट व्हायरल!

दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने सुरु केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाक पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्याचा चंग भारताने बांधला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवायचा निर्णय घेतला आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. इंग्रजी भाषेमध्ये सावरकरांचे द्विखंडात्मक चरित्र लिहीणारे तरुण लेखक विक्रम संपथ यांनी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी झालेल्या भेटीचा उल्लेख केला

Read More

Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे नावच अधिक बोलकं!"; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

(CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे

Read More

काँग्रेसनं डिलीट केली पंतप्रधान मोदींवर टीका करणारी 'गायब' पोस्ट; पक्षाअंतर्गत वाद चव्हाट्यावर

(Congress deletes Gayab post targeting PM Modi) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यादरम्यान राजकीय वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकावरील काँग्रेस पक्ष यांच्यामध्येही या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाद पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत एक पोस्ट करण्यात आली होती. मात्र त्यावरून चांगलाच वाद पेटल्यानंतर आता ती पोस्ट हटवण्यात आली आहे. पक्षाच्या अंतर्गत

Read More

"दहशतवाद्यांनी कधी कल्पनाही केली नसेल त्याहून कठोर शिक्षा देणार!"; बिहारमधील भाषणातून पंतप्रधान मोदींचा थेट इशारा

(PM Narendra Modi Assures Response To Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. केंद्र सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार धरत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली असतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना "दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना आणि त्यांच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीक

Read More

"काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्ये बदल केले”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

(PM Narendra Modi On Waqf Amendment Bill) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्यामुळे विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटलं होतं की, धर्माच्या आधारावर आरक्षणाला स्थान नसावं. पण काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्येही बदल केले”, असा आरो

Read More

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121