"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची किती आणि तुमची उंची किती ? याचा विचार करा आणि मग त्यांच्यावर टीका करा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती तुफानाला उद्धव ठाकरे घाबरले असून, मोदीजींचे हे तुफान जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील." असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर केला आहे. ठाकरेंनी मोदीजींचा वारंवार एकेरी उल्लेख टाळायला हवा होता. ते पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक चुका करत असून हे प्रकार जर थांबले नाहीत तर कधी ना कधी स्फो
Read More
आम्ही पन्नास थरांची दहीहंडी फोडली, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाचोरा शिवसंवाद यात्रेत प्रत्युत्तर दिले आहे. ५० थर होते की आणखी काही, असा उपरोधिक सवाल त्यांनी आपल्या भाषणात विचारला आहे. दहीहंडी कालच होऊन गेली आहे. कालच महाराष्ट्राच्या तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, त्यांनी पण पन्नास थर लावले होते.
महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यावतीने 24 डिसेंबर हा जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
तालुक्याची महत्त्वाची बैठक येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विभागीय अध्यक्ष तेजस पाटील यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष चेतन तांगडे यांच्या सहमतीने पाचोरा तालुका व शहर कार्यकारिणी गठीत करून नवीन युवकांची तसेच अनुभवी पदाधिकार्यांची नावे जाहीर करण्यात आली.
जळगाव ते नांदगाव राष्ट्रीय मार्ग क्र.753 या रस्त्याचे काम प्रगतीपथावर चालू असून जळगाव ते भडगावदरम्यान पाचोर्यातील हिवरा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन 60 वर्ष पूर्वीचा दगडी पूल हा गुरुवारपासून कर्मचार्यांसह पोकलँडने तोडण्यास सुरुवात झाली आहे.
पाचोर्यातील जारगाव चौफुली जवळील नाल्याच्या साफसफाईअभावी सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने व सांडपाण्याचा परिसरातील घरांना वेढा पडत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
गिरड रोडवरील कांकनबर्डी येथील खंडोबा कुलदेवतेच्या यात्रेनिमित्ताने मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पिण्याच्या शुद्ध पाण्याची पाणपोई लावण्यात आलेली होती.
पाचोरा तालुक्यातील 44 वे विज्ञान प्रदर्शन शहरातील गुरुकुल इंग्लिश मेडिअम शाळेत घेण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनासाठी लोहारा जि. प.मराठी मुलांची शाळा मधील प्रथमेश पुरुषोत्तम सुर्वे याने अग्निशमन यंत्र ,सुमित सुनील क्षीरसागर ऋषभ प्रदीप क्षीरसागर यांनी जैविक शेती हे साहित्य बनवले होते त्यांना वर्गशिक्षक अविनाश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या टप्प्यात नांद्रा येथील नाला खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यात 1 कोटी 16 लाख 30 हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई कुडे माध्यमिक विद्यालयाची सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील सहल 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत वेगवेगळ्या जगप्रसिद्ध, प्रेक्षणीय, उल्हासित व पाहण्याजोगी ठिकाणी उत्साहात झाली. सहलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी या सहलीत चक्क विमान प्रवासाने आपल्या सहलीचा आनंद लुटला.
पाचोरा बाजार समितीने तत्कालीन संचालक प्रताप हरी पाटील, पंढरीनाथ गोविंद पाटील व गणेश सुमेरसिंग पाटील यांनी 2011 ते 2012 या कालावधीत गैरव्यवहार केल्याचे सिध्द झाल्यामुळे यांच्याविरुद्ध 50 लाख 72 हजार 156 रुपयांच्या अपहाराची जबाबदारी निश्चित केली.
पाचोरा-भडगाव तालुक्यात या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने खरीप हंगाम वाया गेला. थोडेफार पाणी विहिरींमध्ये शिल्लक होते, ते देखील आटले. धरणे, पाझर तलाव कोरडेठाक झाले आहेेत.
तालुक्यातील जारगाव येथील तरुण भावेश डिगंबर पवार (25) या तरुणाने गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेपूर्वी आपल्या राहत्या घरातील किचन रूममध्ये वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शिवतीर्थ जयकिसान सोसायटीपासून प्रभाग 8 मध्ये आ. किशोर पाटील, महेश सोमवंशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सायकल रॅली काढण्यात आली.
पाचोरा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतची सभा नुकतीच झाली. त्यात जळगाव जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांची महाराष्ट्र शासनाने राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवर शासन नामनियुक्त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल पाचोरा अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे या निवडीचे स्वागत करण्यात आले.
येथील वि .का .सो .चा सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा येथे आयोजित सहकार मेळाव्यात सन्मानपत्र देवून राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व ना. सुभाष देशमुख, सभापती सतीश शिंदे यांनी गौरव केला.
येथे कल्याण मटका नावाचा सट्टा सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना मिळाल्यावरुन त्यांच्या पथकाने गुरुवार 6 रोजी नगरदेवळा नदीपात्रात जुगार, सट्टा अड्ड्यावर छापा टाकून 6 जणांना ताब्यात घेतले.
आगामी लोकसभा ,विधानसभा निवडणुकीत निवडणूकीत मतदानाच्या दिवशी प्रत्येक अपंगांच्या घरी शासकीय वाहन पाठवून त्यांना या वाहनातून मतदान केंद्रावर नेले जाईल व परत त्यांना घरी सोडले जाणार आहे.
येथील रेल्वे कॉलोनी वसाहतीतील नाना बाळू हांडे (33) हा विवाहित तरुण आपल्या राहत्या घरून घरात कुणास काही न सांगता निघून गेला आहे. 2016 पासून बेपत्ता झाला आहे.
2007 मध्ये आर.ओ.पाटील आमदार व जिल्हाधिकारी विजय सिंघल हे असताना तालुक्यातील उतावळीसह अनेक गावात नदीजोड प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली होती.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत पिंपळे नाल्यावरील सुशोभिकरणासाठी आ. स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने 2 कोटींचा निधी मंजूर झाल्याने या कामाचे भूमिपूजन माजी आ.साहेबराव पाटील यांच्या हस्ते होऊन थाटात शुभारंभ मंगळवार 5 रोजी करण्यात आला.
माळी समाज पंच मंडळातर्फे कोंडवाडा गल्ली, समाज कार्यालय याठिकाणी महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण व दीपप्रज्वलन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार बी. ए. कापसे पाचोरा यांच्या हस्ते करण्यात आले. खरा शिक्षक दिन म्हणून पुस्तके
तालुक्यातील राणीचे बांबरुड शिवारात चिपट्टबल्ली नाल्याच्या काठावर गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड टाकून 35 हजार रुपये किंमतीचे गुळमिश्रित रसायनसह गावठी दारू पोलिसांनी शुक्रवारी कारवाई करीत नष्ट केली.
पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकर्यांचा मका शासकिय हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासनातर्फे कोणतेही खरेदीकेंद्र सुरू केले नसल्याने शेतकर्यांचा मका हा खाजगी व्यापार्यांना विकावा लागत आहे.
येथील बालाजी रथोत्सवा निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीतील सर्व भाविक भक्तांसाठी मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडतर्फे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाणपोळी लावून करण्यात आलेली होती.
अयोध्या येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्यावेळी लक्ष्मण घाट येथे शरयू नदीचे पूजन करून महाआरती सुरुवात केली, त्याचवेळी पाचोरा शहरात ठिकठिकाणी चौकाचौकात मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली.
ईद-ए-मिलादनिमित्ताने येथे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
गुरुवारी सकाळी 9:45 ते दुपारी 12:30 वाजेदरम्यान पाचोरा तालुक्यातील पहाण गावी फिर्यादी दिलीप दगडू पाटील (45) यांच्या राहते घराच्या ओसरीत ठेवलेली चाबी घेऊन अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला.
शेतीला जोडधंदा म्हणून शेळी, मेंढी पालन अतिशय उत्तम व्यवसाय आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून माता-भगिनी संसाराचा गाडा चालविण्यासाठी कष्ट करीत राहतात. महिला खर्या अर्थाने संसाराचा आधार असल्याचे प्रतिपादन आ. किशोर पाटील यांनी केले.
पाचोरा तालुक्यातील उतावळे नाला बहुळा नदीस बहुळा प्रकल्पाच्या खालील बाजूस हिवरा नदी व पुढे गिरणा नदीत मिळतो. बराच वेळा सदर बहुळा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नाही याकरिता उतावळे नाल्यावर सांगवी गावाजवळ वळण बंधारा बांधून पोच कालव्याद्वारे बहुळा प्रकल्पात पाणी टाकून बहुळा प्रकल्पाच्या खालील बाजूस गिरणा नदीत वाहून जाणारे पाणी या प्रकल्पात टाकण्याचे या नदी जोड प्रकल्पात प्रस्तावित आहे.
राज्यातील कोतवालांच्या चतुर्थ श्रेणीचा प्रश्न कायम
सद्यस्थितीत अनेक आव्हानांना टक्कर देणार्या सर्वसामान्य माणसाला कौटुंबिक गरजा पूर्ण करता याव्यात, परिवारातील भावी पिढीचे उच्च शिक्षण, लग्नकार्य करता यावे, तसेच अन्य आवश्यक त्या हौशी व गरजा भागवता याव्यात...याकरिता सहकार क्षेत्रातील बँका, पतसंस्था या राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा अधिक सोयीच्या ठरतात. यादृष्टिने आणि खाजगी सावकारी नष्ट करण्यासाठी चाळीसगावमधील जनसेवा नागरी सहकारी पतपेढी अभिमानास्पद कामगिरी करीत आहे.
तालुक्यातील आखतवाड येथे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून तलाठी गावात येत नसल्याने ग्रामंस्थांना सर्व कामांसाठी लागणारे कागदपत्रे घेण्यासाठी 3 ते 4 कि.मी. अंतरावर पायपीट करत नेरी येथे चकरा माराव्या लागतात.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगरपरिषद संचलित गांधी सार्वजनिक वाचनालयच्या विद्यमाने 19 ते 24 नोव्हेंबर पर्यंत रात्री 8 वाजेपासून हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणावर शारदीय व्याख्यान माला आयोजित करण्यात आली आहे.
बोंडअळीचे अनुदान तहसीलदार यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा होऊनदेखील शेतकर्यांच्या खात्यात जमा न केल्याने आज काँग्रेस आयकडून रास्ता रोको आंदोलन होताच प्रशासनाची एकच धावपळ उडाली.
महाराष्ट्रात भीषण दुष्काळामुळेे सर्वत्र विदारक चित्र असून शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आहे.शेतकर्यांच्या वाईट अवस्थेला परावलंबी समाज व्यवस्थाच जबाबदार आहे.
पाचोरा-भडगाव मतदार संघातील शेतकर्यांसाठी पाहिलांदाच मतदार संघात असा कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती व अमोल शिंदे यांच्या वतीने करण्यात आला. किसान कृषी प्रदर्शनात आधुनिक पध्दतीची शेती काळाची गरज असल्याचा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
पाचोरा शहर, परिसर आणि तालुक्यातील सर्वच समाज घटकांची आणि सामाजिक, शैक्षणिक, युवा, प्रौढ, ज्येष्ठ संस्था आणि संघटनांंना विविध उपक्रमांसाठीची सभागृहाची गरज विनामूल्य पूर्ण करणारी संस्था आहे,
सध्या पाचोरा येथे नवीन हायवेच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीसह उपवाहिन्या या हायवेलगत आहेत.
शहरातून सध्या चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. पाचोरा शहरातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला सध्या रस्त्याचे पोकलँड व जेसीबीने खोदकाम केले जात आहे.
अतिशय कमी उत्पन्न गटातील श्रमजीवी, कष्टकर्यांसह सर्वांना किरकोळ पैशात सत्वर, ठणठणीत करण्याचे मानवी सेवेचे व्रत जोपासत आहे येथील विश्व हिंदू परिषद शाखा संचलित कै.परशुराम कोंडिबा शिंदे आरोग्य सेवा केंद्र.
येथील सम्राट अशोकनगरमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून ,रहिवाश्याचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकी कडे शासनाकडून स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे परंतु पाचोर्यात मात्र स्वच्छ अभियान कागदावरच दिसत आहे.
येथील रेल्वे स्थानकावर बेवारस बॅग रेल्वे पोलिस ईश्वर बोरूडे यांना आढळून आली होती. त्यांनी ही बॅग पोलिस चौकीत आणून दिली. तपासणीनंतर या बॅगेत 10 हजाराची रोकडसह सोन्याचे चांदीचे दागिने मिळून आले ही बॅग उत्तरप्रदेशातील महिलेचे असल्याचे कळल्यानंतर तिला तिची बॅग रोकड रक्कमेसह सुपूर्द करण्यात आली.
तालुक्यातील सारोळा आणि चिंचखेडे या गावात घरातील कर्त्यां पुरुषांचे निधन झाले. घरात संपूर्ण अंधार असतांना काँग्रेसचे आरोग्य सेवा सेल अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. सुप्रिया सोमवंशी यांनी अंधारलेल्या घरात पणती लावण्याचा प्रयत्न केला. या गरजू कुटुंबियांना आर्थिक मदतीसह फराळाचे वाटप केले.
शहरातून सध्या चारपदरी रस्त्याचे काम सुरू असून, पाचोरा शहरातील हायवेच्या दोन्ही बाजूला सध्या रस्ता पोकलँड मशीनने जमिनीखाली पाईप लाईन, वायर किंवा कुठल्याही लहान- मोठे केबल असो याची पर्वा न करता बेधडकपणे काम सुरू आहे.
तालुक्यातील पिपळगाव हरेश्वर येथे मोलमजुरीसाठी आलेल्या दहा कुटुंबांना दिवाळीनिमित्त शिवसेना व युवासेनेतर्फे फराळ, मिठाई व कपड्यांचे वाटप करण्यात आले.
पाचोरा तालुक्यावर सध्या भीषण पाणीटंचाईचे सावट असून ते दूर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पावले उचलली जात आहे. मात्र, काही राजकीय पक्ष त्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे. अशातच कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ऍड. अभय शरद पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील धरणांमध्ये संपादित केलेल्या जमिनींवर अतिक्रमण करून खोदलेल्या अनधिकृत खासगी विहिरी तातडीने बुजवण्याबाबत प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन प्रशासनाने दखल न घेतल्याने येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
‘जळगाव तरूण भारत’ने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भडगाव येथे सोमवार, १५ ऑक्टोबर रोजी आयोजित अल्पना कला स्पर्धा २०१८ अंतर्गत रांगोळी स्पर्धेत गायत्री संजय पवार हिने प्रथम तर सौ. ममता अतुलसिंह परदेशी यांनी द्वितीय तर अंकिता रुपेश जैन यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर पाच विजेत्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. ही स्पर्धा संत सेना महाराज विठ्ठल मंदिर नाचणखेडा रोड येथे उत्साहात पार पडली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
‘जळगाव तरुण भारत’ने नवरात्रोत्सवानिमित्त भडगाव येथे सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ६.३० दरम्यान सर्वांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा संतसेना महाराज विठ्ठल रुख्मिणी मंदिर, नाचणखेडा रोड, भडगाव येथे होणार असून त्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे
पोचारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो.कॉ. अमृत पाटील यांना खडकदेवळा ता. पाचोरा शिवारात मांडुळ सापाची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली. त्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीसांनी कारवाई केली. यात एक इसम व मांडूळासह मिळून आला आहे.