मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या वाढदिवसानिमित्त एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आत्तापर्यंत चित्रपट, मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी सई ‘बिजनेस वुमन’ झाली आहे.
Read More
विविध भाषेच्या चित्रपटसृष्टींची तुलना एकमेकांशी कायमच केली जाते. अनेकवेळा मराठी चित्रपटसृष्टीतील उणीव किंवा जमेची बाजू सांगत त्याची तुलनामराठी चित्रपटसृष्टीची बॉलिवूड आणि विशेषत: दाक्षिणात्य चित्रपटासोबत तुलना केली जाते. अशा प्रकारे सगळ्याच चित्रपटसृष्टींची तुलना चुकीचे असल्याचे सिद्धार्थ जाधवने म्हटले. सिद्धार्थ जाधवने काही सिद्धार्थ कनन यांना मुलाखत दिली होती. यावेळी सिद्धार्थने मराठी चित्रपटसृष्टीची दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबत होणाऱ्या तुलनेबाबतही भाष्य केले.
‘सैराट’ हा मराठी चित्रपटसृष्टीला सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी आत्तापर्यंत ‘फॅंड्री’, ‘झुंड’ असे दर्जेदार चित्रपट दिले. आता वेब सीरीजच्या माध्यमातून ते ओटीटी माध्यमावर येत असून ‘मटका किंग’ ही वेब सीरीज ते दिग्दर्शित करणार आहेत. विशेष म्हणजे 'मटका किंग'मध्ये अभिनेता विजय वर्मा मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत मराठमोळे कलाकार झळकणार आहेत.
‘सैराट’ सारखा सुपरहिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. विविध विषयांना आणि प्रामुख्याने गावाची नाळ ही प्रत्येक चित्रपटातून जपणाऱ्या नागराज मंजुळे यांचा ‘नाळ २’ चित्रपट १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. एकीकडे मराठीत आपले स्थान बळकट करणाऱ्या मंजुळेंनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड चित्रपट करत हिंदीत देखील दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवले. आता पुन्हा एकदा हिंदीत नवी कलाकृती आणण्याच्या तयारीत नागराज मंजुळे आहेत अशी माहिती समोर येत आहे.