शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे ते प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मंगळवार, १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ वा वर्धापन दिन असून दोन्ही गटाकडून हा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
Read More
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात मोठ्या पवारांची एकाधिकारशाही महायुतीने मोडीत काढली आहे. पुणे जिल्ह्यातील निकाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांच्या वर्चस्वाला धक्का देणारे ठरले आहेत. मविआच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा घेऊनदेखील पवारांचा बहुतांश जागांवरील पराभव हा खूप मोठा संदेश देऊन जातो.
( Trumpet Symbol ) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 'ट्रम्पेट' या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरीत नाव तुतारी ऐवजी ट्रम्पेट असेच ठेवले जाणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे.
( Prataprao Patil-chikhalikar ) माजी खासदार प्रतापराव पाटील - चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
पक्षविरोधी भूमिका आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शुक्रवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी दिली.
‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी!’ म्हणत दारोदारी फिरणार्या शरद पवार गटाला ‘केंद्रीय निवडणूक आयोगा’ने झटका दिला आहे. ‘तुतारी’ चिन्हासारखे दिसणारे ‘पिपाणी’ हे चिन्ह यादीतून हटवण्याची त्यांची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. आता हे चिन्ह अपक्ष उमेदवारांना मिळणार असल्यामुळे ‘तुतारी’ची ‘पिपाणी’ वाजणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
पवार इंदापूरच्या जनतेला भावनिक साद घालत होते. पण, दुसरा गणंग मराठी माणसाच्या लाडक्या गणपती बाप्पाबद्दल जे बोलला, ते तर या इसमाचा पायातले खेटर काढून समाचार घेण्यासारखे होते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडून आ. जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप अनुसूचित जाती मोर्चा, मुंबई आक्रमक झाली आहे. आव्हाड यांच्या विरोधात त्वरीत गुन्हा नोंदविण्याची मागणी पंतनगर पोलीस ठाण्यात भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच, आव्हाड यांना अटक झाली नाही तर भाजप अनुसूचित जाती मोर्चा मुंबई व महाराष्ट्राच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे अपघात प्रकरणी अजितदादांनी पोलीस आयुक्तांना फोन करुन सक्त कायदेशीर कारवाईचे, राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिले असतानाही जितेंद्र आव्हाड यांना स्वप्नात अजितदादाच दिसतात, कायम एका द्वेषाने ते अजितदादांबद्दल बोलत असतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षाची बैठक पार पडली. त्यानंतर पुणे येथे पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी आपल्या पहील्या उमेदवाराची Sunil Tatkare Raigad घोषणा केली आहे. यावेळीच अजित पवार यांनी महायुतीच्या सर्व जागांच्या घोषणेसाठी निश्चित तारखेची माहीती दिली.
दिनांक २८ मार्चला एकत्रित महायुतीची ( mahayuti candidates ) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
रक्ताची नाती म्हणजेच कुटूंब नव्हे, २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली वेगळी राजकीय भूमिका जाहीर केली तेव्हा आमच्यासारखे लाखो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक कुटुंब म्हणून अजितदादांबरोबर उभे राहिले आहेत.
माझं निर्णय घटनेला धरून आहे हे त्यांनाही माहिती आहे. पण माझा निर्णय चुकीचा आणि कुणाच्या प्रभावाखाली घेतलेला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट न्यायालयात गेले आहेत. यावर आता राहूल नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेची वर निकाल सुनावत आहेत. अजित पवार गट हाच मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा निकाल त्यांनी सुनावला. विधीमंडळात अजित पवार यांच्याकडे बहुमत आहे यावरुन हा निकाल देण्यात आला आहे.
"८० वय झाले तरी काही जण रिटायर्ड होत नाहीत. वय झाले की थांबायचे असते पण काही जण अति करीत आहेत." अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना खोचक टोला मारला आहे. ते कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यात बोलत होते.
बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 'राष्ट्रवादी भवन' पेटवल्याची घटना समोर आली आहे. तर, बीडमध्ये संतप्त जमावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली.
कळवा पूर्व येथील लोकांकडून स्थानिक लोकप्रतिनिधीचे १६ गुंड दर महिन्याला ३० ते ४० लाखाची खंडणी गोळा करतात, अशी माहिती पोलिसांनीच दिल्याचा भंडाफोड राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच येत्या शुक्रवारी कळवा पूर्वेकडील लोकांसाठी आव्हाडांनी हंडा मोर्चाचा फार्स ठेवला आहे. त्याची चिरफाडच एकप्रकारे मुल्ला यांनी केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद पराजपे, प्रकाश बर्डे, युवक काँग्रेस अध्यक्ष विरु वाघमारे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची आज दि. २५ ऑगस्ट रोजी कोल्हापूरात निर्धार सभा सुरू आहे. यावेळी दसरा चौकात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य भोसल्यांचं नव्हतं, ते रयतेचं राज्य होतं, असे विधान शरद पवारांनी केली.तसेच करवीर नगरी देशाला दिशा दाखवणारी नगरी आहे. मला जन्म देणारी माता कोल्हापूरची होती, असे अत्यंत भावनिक भाषण पवारंनी केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गुप्तभेटीसंदर्भात खुलासा करण्यात आला आहे. अजित पवार आपले पुतण्या असून आपण वडिलकीच्या नात्याने त्यांना भेटलो असल्याचे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, पवार कुटुंबातील आपण वडीलधारी व्यक्ती असून वडीलधाऱ्या माणसाला भेटायला आल्यास त्यात गैर काय असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजितदादा गटाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी पुण्यात गुप्त भेट झाल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या बंगल्यावर ही भेट झाल्याचा दावा माध्यमांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, हे सिद्ध करण्यास सांगणारी नोटीस केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटास बजाविली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच पक्षावरील हक्क सिद्ध करण्याच आव्हान शरद पवार यांच्यापुढे उभे राहिले आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची वाय.बी. सेंटर येथे भेट घेतली. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल व अन्य सर्व आमदार हे देखील या भेटीदरम्यान उपस्थित होते. दरम्यान, या भेटीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेतली तर त्यात वावगं काय आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, वर्ष सोबत काम केल्यानंतर भेट घेणं साहजिकचं असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली तर त्यात काहीच गैर नसल्या
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली राजकीय उलथापालथ आणि त्यातून बदललेली गणिते यामुळे विधिमंडळातील समीकरणे बदलणार आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार महायुती सरकारचे दुसरे उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांच्यामुळे सभेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले. दुसरीकडे विधान परिषदेतही ठाकरे गटाच्या काही सदस्यांनी मूळ शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तिथेही विरोधी पक्षनेता बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असताना मविआने विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय न घेतल्याने
महाराष्ट्र : कागलमध्ये आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्याने तणाव निर्माण झाला, त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, औरंगजेब हा आपला कधीच होऊ शकत नसून त्याचे उदात्तीकरणसुध्दा होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, मुस्लिम समाजातील कुटुंबांनी आपल्या लहान मुलांना समजावून सांगण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये जितेंद्र आव्हाड बोलत आहेत की, २०११ मध्येच आपल्याला कोरोना येणार असल्याचे समजले होते, त्यामुळेच मी मुंब्र्यात कबरस्तान बांधायला घेतलं. तसेच जे काही होतं ते अल्लाहाला माहीत असतं, अल्लाहच्या कृपेने आपल्याला २०११ मध्येच समजले, कोरोना २०२० मध्ये येणार आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आ. जितेंद्र आव्हाडांचा हा व्हिडीओ २०२१ मध्ये राष्ट्र
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ पोलीसांना यासंबंधी योग्य तपास करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता स्वतः शरद पवारांनी यावर भाष्य केले. मला धमक्या देऊन माझा आवाज बंद करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे. ते म्हणाले, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी ही सरकारची असून पवारांनी याकडे लक्ष वेधले.
नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन दिवसीय ओबीसी शिबिरात ओबीसींच्या हिताचे निर्णय झाले नाहीत, ओबीसींचे हित साधायचे असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाचा राष्ट्रीय किंवा राज्याचा अध्यक्ष ओबीसी व्यक्ती करावा असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपूर्ण प्रवासात ज्या वेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला त्या प्रत्येक वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्या पक्षाचे नेते हेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच, भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही, असेही
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सुप्रिया सुळे अध्यक्षा बनणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीतून तीव्र पडसाद उमटले होते. शरद पवार यांनी मात्र, आपला राजीनामा देण्यावर कायम असल्याचे म्हटले होते. तरीही दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेऊ, असेही म्हटले होते. मात्र, बुधवार, ३ मे रोजी सकाळी सुप्रिया सुळे यांचे अध्यक्षपदासाठी नाव पुढे येऊ लागले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपवरून ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघांनाही अटक करून त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती. आता पोलिसांनी राष्ट्रवादीच्या ‘त्या’ चार कार्यकर्त्यांना तडीपारीची कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे आ. जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.
घोटाळेबाजांना तेव्हा 'विशिष्ट धर्म' नाही आठवला?; हसन मुश्रीफ ईडीच्या रडारावर, किरीट सोमय्यांचा जोरदार घणाघात!
ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात Ajit Pawar दिसणार?
राहुल गांधी यांचा 'पप्पू' उल्लेख आणि काँग्रेसच्या भारत जोडो आंदोलनाबद्दल नेमकं काय म्हणाले शरद पवार?
फॉक्सकॉनच्या वादात जयंत पाटील यांचा नवा खुलासा!
मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांचे रस्ते अपघातात निधन झाले, त्यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या मेटे यांच्या आईबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अत्यंत घाणेरड्या भाषेत टिपण्णी केली गेल्याची धकाकदायक घटना समोर आली आहे
"घरातून एखादा मुलगा बाहेर पडला तर त्या मुलाची समजूत काढली जाते. परंतु इथे उलट आहे. इथे आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे आधीच मार्ग काढला असता तर आघाडी सरकार टिकलं असतं. परंतु उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे सल्लागार महत्वाचे वाटतात.", असे शिंदेगटातील आ. दीपक केसरकर यांनी सोमवारी (दि. २७ जून) माध्यमांशी साधलेल्या एका संवादादरम्यान म्हटले. दरम्यान शिवसेना पक्षातील राजकीय भुकंपामुळे उद्भवलेल्या एकूण परिस्थितीवर केसरकरांनी आपले मत व्यक्त केले.
शिवसेना नेते, नागरी विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची धोक्यात आली आहे. विधानपरिषदेच्या मतदानानंतर शिंदे गायब झाले होते. २१ जून २०२२ च्या सकाळपासून सुरतमध्ये असलेले शिंदे, आज पहाटे शिवसेनेचे ३३ व सात अपक्ष आमदारांनासोबत घेऊन गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. अजून १० आमदार सोबत येणार असल्याचा दावा करून शिंदेनी महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.
शिवसेना जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेपुढील अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड करू नये व महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, या मागण्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढे ठेवल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलेलं आहे. "शिवसेना हा राखेतून भरारी घेणारा पक्ष असून, फार फार तर शिवसेनेची सत्ता जाईल अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली. खासदार संजय राऊतांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता वाढली आहे.
शिवसेना नेते,राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही काळापासून शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीतील सेनेला मिळालेल्या विजयानंतरही शिंदेनी माध्यमांसमोर येण्याचे टाळले. काल पहाटेपासून गायब असलेले एकनाथ शिंदे १३ आमदारांसह गुजरातमधील सुरत येथे हॉटेल ली-मेरिडिअन मध्ये मुक्कामाला आहेत.
संख्याबळ असून देखील महाविकास आघाडी सरकारच्या पराभवाची मालिका सुरू असताना काँग्रेसच्या गोटातली आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विधानपरिषदेच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीमुळे बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
शिवसेना नेते व राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याने शिवसेनेत खळबळ माजली आहे. या घटनेसंबंधी शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी राऊत यांना चांगलाच टोला लगावला आहे. राऊतांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये "राऊत यांची 'सुरत' बघण्यासारखी झाली आहे". असा टोमणा मारून पाटील यांनी राऊतांवर टीका केली.
शिवसेनेवर बंडाचे हत्यार उगारत १३ आमदारांसह सुरतला निघून गेलेले, राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. पक्षाकडून शिंदे यांना शिवसेनेना गटनेते पदापासून दूर करण्यात आले आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती पक्षाकडून शिवसेना गटनेते पदी करण्यात आली आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक व माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार ईडीच्या कारवाई मुळे तुरुंगात आहेत. कोठडीत असल्या कारणाने राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता आले नाही. आपल्याला विधानपरिषदेत मतदान करता यावे, यासाठी या दोन्ही नेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्याने, मलिक व देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात मलिक व देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पाटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसच्या सगळ्या आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून काँग्रेसच्या वतीने अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पाटोले यांनी सगळ्यात शेवटी मतदान केले. या निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला तडा जाणार असून "काँग्रेसमध्ये आनंदच आनंद आहे" असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
बहुचर्चित असलेली महाराष्ट्र विधानपरिषदेची मतदान प्रक्रिया अखेर पार पडली. राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्या आमदाराने नेमकं कोणाला मतदान केल आहे, हे प्रतोद किंवा व्हीपच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींना समजतं. विधानपरिषदेत मात्र आमदार कोणाला मतदान करतील हे समजणे अवघड असत. परंतु असे असताना देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी "उसे गुमाँ है कि मेरी उड़ान कुछ कम है, मुझे यक़ीं है कि ये आसमान कुछ कम है". असे सूचक ट्विट करत काँग्रेसच्या विजयाबद्दल खात्री असल्याचे सुचवले.
ठाणे महापालिकेने घरबसल्या केलेल्या ओबीसी सर्वेक्षणावरून टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडी सरकारला घरचा अहेर दिला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपने साम-दाम-दंड-भेदचा वापर करण्यात आला असून या निवडणुका पार्ट घेण्यात याव्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या लीगल सेलच्यावतीने करण्यात आली आहे. ऍड. नितीन मानेने याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन शनिवारपासूनच राज्य विरुद्ध केंद्र सरकार, अशी लढाई सुरू आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केले, त्यानंतर केंद्र सरकारनेही त्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, या प्रकाराचे राजकारण शनिवारी रात्री उशीरा पोलीस ठाण्यात पहायला मिळाले. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला १०-१२ पोलीसांनी उचलून आणून कारवाई केली.
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा दहा दिवस होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे असं विधान केलं होतं.यानंतर मोठी चर्चा झाली. यावर आज नेहमी चर्चेत असणारे भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी पडळकर यांनी जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेल्या पात्र आहे असा म्हणत निशाणा साधला आहे.