एवढे प्रेम उतू येत आहे तर उद्धव ठाकरे मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देतील का? असा खोचक सवाल खासदार नारायण राणे यांनी बुधवार, २ जुलै रोजी केला. विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या यूतीबाबत भाष्य केले.
Read More
राज ठाकरेंनी शिवसेनेत यावे, असे उद्धव ठाकरे कधीच म्हणू शकत नाही. कारण राज ठाकरे शिवसेनेत आल्यास तेच प्रमुख राहतील, असे विधान खासदार नारायण राणे यांनी बुधवार, २ जुलै रोजी केले. विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या यूतीबाबत भाष्य केले.
उद्धव ठाकरे यांनीच राज ठाकरेंना पक्षाबाहेर जाण्यास प्रवृत्त केले. शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरेच पूर्ण जबाबदार आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना नारायण राणे यांनी मंगळवार, १ जुलै रोजी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे याचे मराठीचे प्रेम बेगडी आहे. मराठीबद्दल इतकेच प्रेम होते तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? असा सवाल खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. राज्य सरकारने हिंदी सक्तीसंदर्भातील दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंकडून विजयी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यावरून नारायण राणेंनी त्यांचे कान टोचले.
उद्धव ठाकरे आता तुम्ही आवळत चालले आहात. मुंबई महापालिकेच्या आधी तुमची सगळी भांडी फोडणार आहे, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. मंगळवार, २७ मे रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत. मुक्त विद्यापीठात कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतो, असे विधान संजय राऊतांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांच्यावर स्तुसीसुमनेही उधळली. बुधवारस १४ मे रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे राज्याचे नुकसान केले. पुढच्या वेळी ठाकरेंचे पाच आमदारही नसतील, असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. गुरुवार, १७ एप्रिल रोजी त्यांनी बेस्ट भवन येथे बेस्टच्या विविध प्रश्नांसंदर्भात समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Narayan Rane सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवाईमार्गे देशातील वेगवेगळ्या ठिकाणांना जोडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चिपी विमानतळावरुन आता इंडिगोची विमानसेवा सुरू केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थिती चिपी विमानतळ बंद होणार नाही, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी दिली.
राज्यभरात सध्या दिशा सालीयान मृत्यू प्रकरणाची चर्चा असून शनिवार, २२ मार्च रोजी खा. नारायण राणे यांनी याप्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत मनोरुग्ण झाले आहेत. त्यांना मेडिकल चेकअप करावे लागेल, असा घणाघात खासदार नारायण राणे यांनी केला आहे. शनिवार, २२ मार्च रोजी भाजप कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वा! चित्राताई वाघ वा! अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी आमदार चित्रा वाघ यांचे तोंडभरून कौतूक केले. गुरुवार, २० मार्च रोजी अनिल परब यांनी चित्रा वाघ यांच्यावर टिका केली. त्यावर चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले. याबद्दल नारायण राणे यांनी ट्विट करत त्यांचे कौतूक केले.
"शिवसेना पक्षाचा प्रमुख बाळासाहेबांचा पूत्र एका सभेत म्हणतो की, सोसायटीमध्ये तुम्हाला जर बकरी ईदला परवानगी द्यायची नसेल, तर दिवाळीला कंदील उतरवा. त्यावेळी मला बाळासाहेब आठवले. असं बोलल्यावर त्यांनी याला गोळ्या घातल्या असत्या," अशी टीका भाजप नेते नारायण राणेंनी केली आहे. शुक्रवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी निलेश राणेंच्या प्रचारासाठी कुडाळमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.
rane vs thackeray : कणकवली आणि सावंतवाडीच्या जोडीला यंदा कुडाळ मतदारसंघ महायुतीकडे खेचून आणण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणेंनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात ते यशस्वी होतील का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वारे सध्या कोणत्या दिशेला वाहत आहेत? ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली पक्षांतरे या वाऱ्यांना रोखतील का? याचा आढावा.
तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या आरक्षणातही तुम्ही राजकारण करत आहातस, असा घणाघात खासदार नारायण राणेंनी केला आहे. शरद पवार जातीजातीत तेढ निर्माण करत आहेत, असेही ते म्हणाले. त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, अशी टीका खादसार नारायण राणेंनी केली आहे. मालवणमध्ये महाविकास आघाडी आणि राणे समर्थकांमध्ये झालेल्या राड्यानंतर त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर दोन गटांत झालेल्या राड्यानंतर ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे आणि नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये गुरुवारी राजकोट किल्ल्यावर तुफान राडा झाला होता. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवप्रभूंचा पुतळा अवघ्या काही महिन्यांत कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींनी रोष व्यक्त करणे स्वाभाविक. परंतु, विरोधकांनी त्यात राजकारण साधावे, हे महाराष्ट्राला न पटणारे. महाविकास आघाडीचे नेते जणू हा पुतळा पडण्याची वाटच पाहत होते, अशी शंका घेण्याइत पत खालची पातळी त्यांनी गाठली.
राजकोट किल्ल्यावर बुधवारी दोन गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले असून त्यांच्यात जोरदार राडा झाला. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बुधवारी निषेध आंदोलन केले. याचवेळी भाजपचे कार्यकर्तेही तिथे दाखल झाले आणि दोन गट आमनेसामने आले.
शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूत्व या दोन विषयांना उदरनिर्वाहाचं साधन बनवलं, असा घणाघात खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. बुधवारी महाविकास आघाडीकडून राजकोट किल्ल्यावर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली.
महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर तब्बल दोन तासांनंतर आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्याबाहेर पडले. सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याने महाविकास आघाडीने निषेध मोर्चा काढला होता.
उद्धव ठाकरेंना आता उद्धवमिया म्हणतात, अशी टीका भाजपचे जेष्ठ नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणेंनी केली आहे. ते शनिवारी पत्रकार परिषद बोलत होते. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले.
बुधवार, ४ जून रोजी लोकसभा निवडणूकीच्या निकालाचं पडघम वाजलं आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब झालं. तब्बल २९४ जागांवर एनडीएने आपला विजय निश्चित केला. तर राज्यात महायूतीने १७ आणि महाविकास आघाडीने ३० जागा मिळवत सरशी केलीये. मात्र, महायूतीच्या एका जागेची सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा. या लोकसभा मतदारसंघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन टर्म खासदार असलेल्या उबाठा गटाच्या विनायक राऊतांचा दारूण पराभव केला
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुरुवारी भेट घेतली आहे. लोकसभेत मिळालेल्या विजयाकरिता राज ठाकरेंचे आभार मानन्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
उबाठाच्या अदृश्य हातांनी आम्हाला निवडणूकीत मदत केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. बुधवारी लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतून भाजप नेते नारायण राणे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले.
मोदीजींचा राजीनामा मागण्याआधी संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंचा राजीनामा मागावा, असा टोला भाजप आमदार नितेश राणेंनी राऊतांना लगावला आहे. बुधवारी लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. यावर आता राणेंनी त्यांचा जोरदार समाचार घेतला.
संपुर्ण देशभरात सध्या लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरु असून राज्यात महायूती आणि महाविकास आघाडीपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
लोकसभेच्या निकालाकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मदारसंघातून नारायण राणे हे सध्या आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नारायण राणे यांचा दणदणीत विजय झाला आहे. नारायण राणेंनी उबाठा गटाच्या विनायक राऊतांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत कोकणात भाजपचे कमळ फुलवले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ करिता एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महायुतीला २४ जागा तर मविआला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार नारायण राणे निवडून येण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महायूती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभा घेणार आहेत.
नुकतीच भाजपची आणखी एक यादी जाहीर झाली असून यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून या जागेसाठी उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नुकतीच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायूतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे, उबाठा गटाचे नेते विनायक राऊत हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दरम्यान, याळेळी रत्नागिरीत नारायण राणे विरुद्ध उबाठा अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
थेट मोदीजींशी संपर्क साधणारा खासदार आम्हाला निवडून द्यायचा आहे. सतत रडत बसणारा आणि नकारात्मक वृत्ती असणारा खासदार आता आपल्याला नको आहे, असा टोला नितेश राणेेनी उद्धव ठाकरे आणि विनायक राऊतांना लगावला आहे. भाजपने गुरुवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर नितेश राणेंनी चिपळून येथे माध्यमांशी संवाद साधला.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाला मोठी परंपरा आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू ते डॉ. निलेश राणे यांनी आपापल्या कार्यकाळात या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या कार्यकालातील आठ वर्षे मोदींच्या नेतृत्वातील सत्तेत असूनही स्थानिक खासदार विनायक राऊत हे विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले.
आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे भाजपची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंसाठी माझ्याकडून एक शब्द घेतला होता, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत इंडी आघाडीच्या सभेत भाजपवर केलेल्या टीकेला आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.
संजय राऊत उद्धव ठाकरेंशी प्रामाणिक नाही तर शरद पवारांशी आहे. ते कधीतरी उद्धव ठाकरेंना फसवणार आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केले आहे. नारायण राणेंनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला.
"उद्धव ठाकरे यांनी पैसे घेऊन तिकीट वाटल्याची यादी माझ्याकडे आहे. महापालिकेत एखाद्या समितीचा अध्यक्ष करण्यासाठी पैसे घेतले जायचे. खासदार, आमदारकीच्या तिकिटासाठी पैसे घेतले जायचे. एकदिवस पत्रकार परिषद घेऊन त्या लोकांना पुढे आणतो.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक सुचक ट्विट केलं आहे.
शिशिर शिंदे यांनी वानखेडे खणून जेलमध्ये गेले, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले लोक इथे आहेत. त्यांनी मोठा संघर्ष केलाय.तुम्ही आयत्या पिठावर रेखोट्या मारून आले त्या देखील नीट मारता आल्या नाहीत. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या अपमान केला, रामदास भाईचा ही तशाच अपमान करण्यात आला. नारायण राणे, राज ठाकरे, त्यांच्यापासून तुम्हाला काय त्रास होता..? पण त्यांना तुम्ही दूर सारलं. माझ्या विभागात हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे मला तुम्ही सांगितले असते तर मी मनमोकळेपणाने सगळे सोडून दिले असते,अशी टीका मुख्यमंत्
भास्कर जाधवांना निवडणुकीसाठी १५ लाख रुपये दिले, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सिंधुदुर्गमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
शंभर खोके एकदम ओके ही घोषणा गेल्या दोन वर्षांपासून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बड्या नेत्यांच्या तोंडी आपण ऐकली असेल. मुख्यतः ही वाक्य ठाकरे गटाच्या नेत्याकडून शिंदे गटाच्या नेत्यावर केल्या जाणाऱ्या आरोपात पाहायला मिळायची. पण आज हे चित्र बदलण्यात शिवसेनेला शिंदे गटाला यश मिळालं आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना जबर धक्का देत मोठा गौप्यस्फोट केलायं. ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे मी १ कोटी रूपयांचा चेक दिला होता. मंत्रिपदासाठी त्यांनी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही’, असा मोठा गौप्य
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केली. त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांच्या घोषणा देखील करण्यात आल्या. पण दुसरीकडे ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंनी आयती संधी साधत दि. १ फेब्रुवारीपासून आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौऱ्यासं रायगड जिल्ह्यातून प्रारंभ केला. आधी या दौऱ्यासंबधी मिळालेल्या माहितीनुसार, हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे. आणि या दौऱ्यात सहा सभांचं आयोजन करून कोकणात जम बसवण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून केला जाणार आहे. त्य
१६ मे २०२१ कोकण आणि गोवा किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाने तडाखा दिला. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, राजापूर, गुहागर, दापोली आणि मंडणगड याभागांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. दरम्यान कोरोनाच्या लाटेमुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन व्यवसायाला ही फटका बसला होता. शेतीवर घर चालवणारा सर्वसामान्य शेतकऱ्याचे ही या वादळात नुकसान झाले. त्याआधी जून २०२० मध्ये रायगड आणि रत्नागिरीच्या सीमाभागात निसर्ग चक्रीवादळ आले होते. ज्यात अनेक बोटी फुटल्या, वाहून गेल्या, जाळ्या वाहून गेल्या इतकेच न
राज्यसभेच्या १६ राज्यांतील रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दि.२९ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या ५६ जागांमध्ये महाराष्ट्रातील ६ जागा आहे. ज्या सहा राज्यसभा जागांसाठी दि. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत विरोधी पक्ष अर्थात, महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे. या सहा राज्यसभा जागांचा विचार करता, भाजपचे प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन, नारायण राणे आणि ठाकरे गटाचे अन
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन मनोज जरांगेंनी २७ जानेवारीला मागे घेतले. राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याने त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेप घेत २९ जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन असे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द केली आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार अनिल देसाई, प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, व्ही. मुरलीधरन, नारायण राणे आणि श्रीमती वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ 02 एप्रिल 2024 रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत.
मराठा समाजाच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून मनोज जरांगेंनी शनिवारी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. याबाबत त्या दोघांशी चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सध्या राम मंदिर उद्धाटनाच्या मुद्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची सत्ता गेल्यामुळे ते काय बोलतात हे त्यांनाच माहिती नाही, असे ते म्हणाले आहेत.