विद्यार्थी हेच राष्ट्राचे खरे आधारस्तंभ असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मिळणारी विद्याच देशाचे भविष्य घडवत असते. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामाध्यमातून राष्ट्रासाठी समर्पित असणारी पिढी निर्माण करण्याचे कार्य शैक्षणिक संस्थांना पूर्ण करायचे आहे.
Read More
पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असून, ‘अपार आयडी’ या नावाने हे ओळखपत्र ओळखले जाईल. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीचे संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड यात संग्रहित केले जाईल. असा हा शैक्षणिक आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणारा निर्णय सर्वस्वी कौतुकास्पदच!
प्रश्न बोर्डाच्या परीक्षा एकदा घ्यायच्या की दोनदा, हा नाहीच. उचित मूल्यमापन हा खरा प्रश्न आहे. आकलन क्षमता योग्य शास्त्रीय पद्धतीने तपासायची कशी, हा कळीचा मुद्दा आहे.
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्। तत् त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये॥ सत्याचा चेहरा तेजस्वी सोनेरी आवरणाने झाकलेला आहे; हे तेजोमय सूर्य! सत्याच्या प्राप्तीसाठी, प्रत्यक्ष दर्शनासाठी तुम्ही ते आवरण काढून टाका. भारतीय शिक्षण व्यवस्थेला लागलेले मेकॉलेप्रणित ग्रहण आता राष्ट्रीय शिक्षा नीतीच्या लागू होण्याने सुटण्याच्या दृष्टिपथात आहे.
भारतीयत्वाच्या उदात्त विचाराला वाहिलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ऐतिहासिक संघटनात्मक प्रवास आज दि. ९ जुलै रोजी ७५व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच...