नाशिकमध्ये नुकतेच दोन दिवसीय अवयवदानविषयक राज्यस्तरीय अधिवेशन ‘श्रेष्ठदान महाअभियान’पार पडले. ‘मृत्युंजय ऑर्गन फाऊंडेशन’, ‘दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन’ आणि ‘मविप्र’ संस्थेने आयोजित केलेल्या महाभियानाद्वारे शहरात अवयवदान संस्कृतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले. मरणोत्तर देहदान आणि अववयदान याविषयी समाजात असलेले गैरसमज दूर व्हावे, तसेच या श्रेष्ठ दानाविषयी जनसमान्यात जनजागृती व्हावी, या उद्देशाने भरवण्यात आलेल्या महाधिवेशनचा उद्देश सफल झाल्याचे दिसून आले.
Read More