दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने अध्यात्मरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात २० ते २१ सप्टेंबर २०२५ या कालवधीत दररोज सायंकाळी ५.३० वाजता होईल.
Read More
मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपने तयार केला रेल मुंबई टोकापासून सहावा कोच ज्येष्ठ नागरिकांसाठी मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपने मुंबई उपनगरीय नेटवर्कमध्ये वृद्ध प्रवाशांसाठी समर्पित डब्यासह पहिला इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयू) रेक सादर केला आहे. रेल्वे बोर्डाच्या निर्देशांना त्वरित प्रतिसाद म्हणून, माटुंगा वर्कशॉपच्या डेडिकेटेड टीमने या रेक तयार केला.
( Mahakumbhabhishek ceremony at Astik Samaj Temple Matunga ) आस्तिक समाज, माटुंगा, मुंबई - १०२ वर्षांहून अधिक परंपरा आणि भक्तीने समृद्ध असलेल्या माटुंगा येथील आस्तिक समाज मंदिरात भगवान श्रीराम आणि भगवान श्रीहनुमान यांचा महाकुंभाभिषेक सोहळा साजरा होणार आहे. दर १२ वर्षांनी एकदाच केला जाणारा हा पवित्र विधी मंदिरातील दैवी ऊर्जा आणि देवतांची शक्ती पुनर्जीवित करतो. यावर्षी हा सोहळा आमच्या परंपरेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा साकारणार आहे.
( Action taken against 54 abandoned vehicles in Matunga area ) माटुंगा परिसरातील विविध रस्त्यांच्या कडेला असलेल्या, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेवारस आणि निकामी वाहनांविरोधात मुंबई पालिकेच्या एफ (उत्तर) विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मंगळवार, दि. ११ मार्च रोजी ५४ बेवारस वाहने उचलण्यात आली. तर, एकूण १५४ वाहनधारकांना त्यांची निकामी झालेली वाहने उचलण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
नाटकातून नाट्यरसिकांना वेगळी अनुभूती मिळत असते. मात्र आवड असूनही वयोमानामुळे आणि शारीरिक व्याधींमुळे ज्येष्ठ नाट्य रसिकांना प्रयोगाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. अशा रसिकांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय नाट्यपरिषदेने पुढाकार घेतला आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून नूतनीकरणानंतर नाट्यरसिकांसाठी २२ जूनपासून खुल्या होणाऱ्या माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे एका विशेष सुविधेची व्यवस्था ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी करण्यात आली आहे.
अमर महल ते वडाळा व पुढे परळ पर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जल बोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' संयंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्प अंतर्गत वडाळा ते परळ दरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱया टप्प्याच्या जल बोगद्याचा 'ब्रेक थ्रू' शुक्रवार,दि. २१ जून रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आला. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरानंतर १०० किलोमीटर जल बोगदे असणारे मुंबई महानगर जगातील दुसरे शहर ठरले आहे.
माटुंगा (पूर्व) परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पदपथ खोदून अज्ञातांनी केबल चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. याबाबत प्रकरणाची मुंबई महानगरपालिकेने गंभीर दाखल घेत अनधिकृत खोदकामे आढळल्यास पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व विभागातील सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर (Yashwant Natyagruha) बंद होते. मात्र, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीनंतर अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या प्रशांत दामले आणि त्यांच्या टीमने पुढाकार घेत यशवंत नाट्य मंदिराची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेतला. गेले दोन महिने या वास्तुचे काम सुरु होते (Yashwant Natyagruha) आता ते पुर्ण होत आले असून शक्यतो १ मे २०२४ महाराष्ट्र दिनी यशवंत नाट्य मंदिर रसिक प्रेक्षकांसाठी खुले होणार असल्याची माहिती अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे कै. मधुकर आठल्ये, कै. मनमोहन आठल्ये आणि कै. एस. एम. गोडबोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘युवा महोत्सव’आयोजित केला आहे. यात प्राजक्ता काकतकर आणि शिवानी मिरजकर यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात सादर करण्यात येणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये आतापर्यंत सुमारे १४०८३८३ दशलक्ष लिटर्स पाणीसाठा असून आजच्या दिवशी २०२२ मध्ये हा पाणीसाठा १४२५९३३ दशलक्ष लिटर्स तर २०२१ मध्ये १४३२२६८ दशलक्ष लिटर्स असल्याची नोंद आहे. मात्र असे असले तरी मागील तब्बल दीड ते दोन वर्षांपासून माटुंगा येथील कमला रामन नगर येथील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याची माहिती येथील नागरिकांनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना दिली.
माटुंगा रोड रेल्वे स्टेशन ते टी एच कटारिया मार्ग परिसरामध्ये माटुंगा लेबर कॅम्प ते माटुंगा वेस्टर्न रेल्वे (तरंगता पूल) शाहूनगर बीट क्र.३, या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी बहुतेक विद्युत खांबातील लाईटी बंद पडलेली आहे. गेल्या अनेक दिवसपासून विद्युत खांबामधील लाईटचं गायब आहे.वारंवार पालिका व बेस्ट प्रशासनाच्या निदर्शनात आणून देखील अद्यापही काही कारवाई झालेली नसल्याचे स्थानिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी सांगितले.
नाट्यरसिक आणि कलाकार यांची पंढरी असणाऱ्या 'यशवंतराव नाट्यगृहात लवकरच तिसरी घंटा वाजणार आहे. शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ आणि रविवार दि. ६ ऑगस्ट रोजी अभिनेते प्रशांत दामले फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकांच्या प्रयोगाने यशवंत रंगमंदिराचा पडदा उघडणार आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या दोन्ही नाटकाच्या निर
गेल्या काही दिवसांपासुन राज्यात पावसाने हाहाकार केला आहे. कोकणात ही मुसळधार पाऊस सुरुच आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत. तर, आता मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
नाट्यकर्मीं आणि प्रेक्षकांमधील दुवा म्हणजे यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल. ‘यशवंतराव नाट्य संकुल’ या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. ज्येष्ठ कलाकार, लेखरक दिग्दर्शक यांच्या कलाविष्काराने पावन झालेली ही वास्तू आहे. गेले काही वर्ष ही वास्तू बंद होती. आणि त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीनंतर नव्याने निवडून आलेले अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली गेले काही दिवस या वास्तुचे नुतनीकरण सुरु होते. आता हे नाट्यसंकुल कलावंतांसाठी आणि प्रेक्षकांसाठी सज्ज झाली आहे. बहुप
नोकरी सांभाळून नाना छंद जोपासत क्रिकेट सांख्यिकीत रमलेले छंदिष्ट विनायक माधव केणी यांच्याविषयी...
मध्य रेल्वेच्या दादर आणि माटुंगा स्थानकादरम्यान शुक्रवारी (दि १५ एप्रिल) गडद एक्सप्रेस आणि पाँडीचेरी एक्सप्रेसमध्ये रात्री ९.२१ दरम्यान झालेली धडक ही 'स्पॅड'(SPAD) मुळे झाली असल्याचा निष्कर्ष म. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काढण्यात आला आहे.
टुंगा येथील वीर माता जिजाबाई इन्स्टिट्यूटच्या (व्हीजेटीआय) ‘एन्थुजिया’ उत्सवाच्या दुसर्या दिवशी बुधवारी विविध खेळांच्या स्पर्धांना प्रारंभ झाला. सर्व ११ संघ विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले असून यंदाच्या ‘एन्थुजिया’चा विजेता कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
परळ विभागातल्या रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर सहा वर्षांपर्यंतची मुले व त्यांच्या मातांच्या आरोग्य तपासणीसाठी 'मोबाईल आरोग्य तपासणी व्हॅन'ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. माता बाल आरोग्य आहार प्रकल्पाअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला.
दुसऱ्या राष्ट्रीय ऑलिम्पिक गेम्स फेडरेशन कप २०२२मध्ये केली पदक विजेती कामगिरी
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन (सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ) अध्यक्षा, श्रीमती तनुजा कंसल यांनी पहिल्या संपूर्ण महिला स्थानक असलेल्या माटुंगा स्थानकावरील महिला कर्मचा-यांचा सत्कार केला. त्यांनी कर्मचार्यांना २५,०००/- रुपये गट पुरस्कार आणि प्रशंसनीय काम केलेल्या दोन पॉईंट्सवुमन यांना २,५००/- चा वैयक्तिक पुरस्कारही दिला. यावेळी सीआरडब्ल्यूडब्ल्यूओचे कार्यकारी समिती सदस्य उपस्थित होते.
मुसळधार पावसात उभी राहून दाखवत होती वाट
माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
माटुंग्यातील दोन्ही घटना सीसीटीव्हीत कैद
चंद्रकांता गोयल तीनवेळा भाजपच्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत
सहजरित्या उपलब्ध होणार्या जीवनावश्यक वस्तूंसाठी ‘लॉकडाऊन’च्या काळात रांगा लावाव्या लागत असल्याने कंटाळलेल्या मुंबईकरांनी अखेर अनोखी शक्कल लढविण्यास सुरुवात केली आहे. रांगेत उभे राहण्याऐवजी अनेकांनी दगड, कापड किंवा आपल्या पिशव्या रांगेत ठेवल्याचा अजब प्रकार गुरुवारी उघडकीस आला. माटुंग्यातील ‘सहकारी भांडार’च्या बाहेरील या प्रकाराची चित्रफीत विविध समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाली. याबद्दल दुकानाच्या व्यवस्थापकांकडे चौकशी केली असता, दुकान सुरू होताच केवळ रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल, असे
माटुंगा येथील बिग बाझार येथे भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे पाच बंब आणि पाण्याचे तीन टॅंकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
आज गुरुवारी मध्य रेल्वे ४ तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
आठवडयाच्या पहिल्याच दिवशी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाने दमदार बॅटिंग केल्याने मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले.
गोविंद भगवान तथा दादा चोळकर या एका तपस्वी व्यक्तिचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) या संस्थेत एका प्राध्यापकांने केलेल्या अश्लील वर्तन आणि विनयभंगाच्या घटनेच्या विरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.