रा. स्व. संघाने शताब्दी वर्षानिमित्त पंचपरिवर्तनाचा विषय लोकांपर्यंत पोहोचवून कृतिशील सामाजिक परिवर्तनाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. पंचपरिवर्तनातील एक महत्त्वपूर्ण विषय म्हणजे, सामाजिक समरसता. उच्च-निच्चतेची भावना समाजमनातून नाहीशी झाली पाहिजे, यासाठी ‘सामाजिक समरसता मंच’ची निर्मिती झाली. हा मंच जातिभेदाचा कलंक नष्ट करण्यासाठी आजही प्रयत्नरत आहे. यासाठी कार्यकर्ते तयार करणे, अथांग चिंतन करणारे आणि प्रत्यक्ष प्रकल्पांच्या उभारणीकरिता ताकदीने लेखन करणारे, प्रसंगी त्यासंदर्भातील आव्हानांना तोंड देणारे असे च
Read More
वायुसेना प्रमुख Air Chief Marshel अमरप्रीत सिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तानच्या दाव्यांना निर्बंधित करत सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे ४–५ फाइटर जेट उध्वस्त झाले; त्यात अत्याधुनिक एफ – १६ समाविष्ट असल्याचे ते म्हणाले.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानची किमान ५ लढाऊ विमाने आणि १ टेहळणी विमान पाडले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी होण्यामागे राजकीय इच्छाशक्तीचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन हवाईदल प्रमुख एअरचीफमार्शल अमर प्रीत सिंग यांनी शनिवारी हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेडच्या (एचएएल) मॅनेजमेंट अकॅडमीत बोलताना केले आहे.
(India-Pakistan Conflict) पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर १० मे रोजी युद्धविराम देण्यात आला. यानंतर रविवार, दि. ११ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत विस्तृत
(Air Marshal A. K. Bharti detail response to Pakistan aggression) भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांच्या डीजीएमओ यांनी आज १२ मे रोजी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एअर मार्शल ए. के. भारती यांनी भारताची लढाई ही पाकिस्तानी सैन्याविरोधात नाही तर दहशतवादाविरोधात असल्याचे म्हटले आहे. एअर मार्शल ए.के. भारती म्हणतात, "भारताची लढाई ही पाकिस्तानी सैन्याविरोधात नाही तर दहशतवादाविरोधात आहे.
पुणे हवेली येथील भूमि अभिलेख उप अधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अंतर्गत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अमरसिंह पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.
एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी मंगळवारी नवीन भारतीय हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
Marshal Denzil Keeler Death पाकिस्तानला धूळ चारणारे अधिकारी एअर मार्शन डेंजिल जोसेफ किलर यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले असून ते ९० वर्षांचे होते. त्यांचा जन्म १९३३ मध्ये लखनऊ, उत्तर प्रदेश येथे झाला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील हिरो म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. त्यांनी गुरूग्राम येथे अखेरचा श्वास घेतला.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज शॉन मार्श याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शॉन मार्शने आस्ट्रेलियाकडून टी-२०, कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे. शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना अटीतटीच्या सामन्यात संघाला महत्त्वपूर्ण खेळी करत संघासाठी निर्णयात्मक विजय मिळवून दिला आहे.
सध्या जग निर्णायक टप्प्यात आहे आणि बदलाचा कल भारताच्या बाजूने आहे. ग्लोबल साऊथमध्ये भारताचा उदय हा आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये महत्त्वाचा मुद्दा असल्याचे मत हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी नुकतेच केले आहे.
ललित पाटील पलायन प्रकरणात कुणालाही दया दाखवली जाणार नाही असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नागपुर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधीवेशनात विधान परिषदेत ते बोलत होते.
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी आणि ससुन रुग्णालयातील एका डॉक्टरचा समावेश आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
लढाऊ क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, भारताने गुरुवारी 2.23 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण संपादन प्रकल्पांना प्राथमिक मान्यता दिली. यामध्ये 97 तेजस हलकी लढाऊ विमाने आणि 156 प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) या प्रकल्पांना मंजुरी दिली.
ऑस्ट्रेलियाने रविवारी भारताविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून वर्ल्डकप ट्रॉफी पटकावली. मात्र, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना या ट्रॉफीची काहीच किंमत नसल्याचे सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियन कांगारू वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवतानाचे फोटो व्हायरल झाले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांकडून कागांरुंवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक २०२३ अंतिम सामना खेळविला जात आहे. कांगारूंना पहिला झटका बसला असून डेव्हिड वॉर्नर ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. मोहम्मद शामीने त्याला स्लीपमध्ये विराटकरवी झेलबाद केले. विराटने स्लीपमध्ये तितकाच उत्तम झेल घेतला.
अभिनय आणि निर्मीती क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारा श्रेयस तळपदे पुन्हा एकदा मराठीकडे वळला आहे. दाक्षिणात्य चित्रपट 'पुष्पा' या चित्रपटात अल्लू अर्जूनसाठी हिंदीत आवाज देत श्रेयसने मराठी आणि हिंदी पाठोपाठ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील आपली छाप सोडली. श्रेयसने मराठी-हिंदीबरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो एका बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे.
मार्सेली लास्ट या एका सर्वसामान्य ज्यू महिलेचं हे मनोगत आपल्याला इतिहास आणि भविष्य दोन्ही दाखवतं. कल्पना करा की, आपले ऐतिहासिक वीर जेव्हा मोहिमेसाठी बाहेर पडत, तेव्हा यांच्या घरच्यांची मनःस्थिती कशी होत असेल?
नासाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिमेपैकी एक मंगळ ग्रहावरील मोहिम आहे. या मोहिमच्या माध्यमातून नासा मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करून तेथील सजीवसृष्टीच्या शक्यतेची माहिती घेत आहे. दरम्यान, यासाठी नासाने नवी मोहिम आखली असून मंगळावरून रॉकेट प्रक्षेपित करणार असून ते मंगळाचे नमुने पृथ्वीवर आणणार आहे. यामुळे नासाला मंगळ ग्रहावरील सजीवसृष्टीच्या शक्यतेची माहिती घेणार आहे.
अमेरिकन रिसर्च फर्म ‘हिंडेनबर्ग’ हे नाव भारतासह सध्या जगभरात चर्चेत आहे. अवघ्या पाच विश्लेषकांच्या जीवावर या ‘हिंडेनबर्ग’ने जगभरातील बड्या उद्योजकांना वेठीस धरले. ‘हिंडेनबर्ग’ हे नाव हल्लीच्या पिढीसाठी नवे असले, तर ज्या पिढीने पहिले आणि दुसरे महायुद्ध अनुभवले किंवा त्या कालावधीत वावरले, त्यांच्यासाठी आणखी एक ‘हिंडेनबर्ग’ होऊन गेला. होय तोच ज्याने अॅडॉल्फ हिटलरला हुकूमशहा होण्यासून रोखले होते. पहिल्या महायुद्धात बलाढ्य जर्मनीचा फिल्ड मार्शल हे सर्वोच्च पद ज्याने भूषविले तो लुडविंग हिंडेनबगर्र्! आपल्या युद्ध
“केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ योजनेतील ‘अग्निवीरां’च्या भरतीसाठीची वयोमर्यादा शिथील करत, ती २१ वरून २३ इतकी निर्धारित केली आहे. त्यामुळे आता देशातील तरुणांनी लवकरच सुरू होणार्या भरतीकडे लक्ष केंद्रित करावे,” असे आवाहन देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केले.
सांगली येथे असलेल्या आटपाडी तालुक्याचे शिल्पकार आणि माजी सभापती कै. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तब्बल '१ लाख पुस्तकांचे वाचन आणि आकलन' करण्याचा संकल्प वाचन कट्टा चळवळीमार्फत आखण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या अनोख्या उपक्रमास थेट परदेशातूनही प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात अनेक शाळकरी मुलांसह ८० वर्षांवरील ज्येष्ठ वाचकही जोडल्याचे दिसत आहे. आटपाडी तालुका साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि बाबासाहेब देशमुख यांचे चिरंजीव अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांप
कोरोनासह अन्य महामारी मुंबईत कमी झाल्यामुळे मास्क वापरण्यासंबंधीची सर्व बंधने मुंबई महापालिकेने मोकळी केली आहेत
कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क लावणे हे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु याबाबत दादरमध्ये पालिका नक्की कोणते धोरण अवलंबत आहे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमलेले क्लीनअप मार्शल नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर वसुली करत असल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा येऊ लागल्या आहेत.
आज १०० वर्षांनंतर हडप्पा आणि मोहेंजोदडो ही सरस्वती सिंधू सभ्यतेमधली अतिशय प्रगत शहर होती नि सन पूर्व तीन हजार वर्षांनंतर सरस्वती नदी हळूहळू कोरडी पडल्यामुळे, तिथल्या नागरिकांना स्थलांतर करावं लागलं, हा सिद्धांत सर्वमान्य झाला आहे. फक्त भारतातले कथित बुद्धिमंत आणि विचारवंत सोडून. ते हे सत्य कधीच मान्य करणार नाहीत.
‘टीम मार्शल’ म्हणतोय, आजचं जग ‘युरो-अटलांटिक’ नव्हे, तर ‘इंडो-पॅसिफिक’ बनलंय. कारण, नवा जागतिक संघर्ष प्रदेश आता आशिया खंड आणि त्याच्या भोवतीचा हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर असणार आहे. या संघर्षातले मुख्य भिडू आहेत अमेरिका, चीन आणि उत्तर कोरिया. बाकीचे भिडू आहेत रशिया, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि आखाती देश. म्हणजेच ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड हे युरोपिय प्रगत देश यात नाहीत. प्रगत आणि अण्वस्त्रसज्ज असूनही नाहीत. का नाहीत?
सोमवार दिनांक २२ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्ली येथे कार्यक्रमात हा पुरस्कार/मेडल दिले जाणार आहे. कर्वेनगर पुणे येथील एअर मार्शल प्रदीप पद्माकर बापट यांना अतिशय प्रतिष्ठित असा परमविशिष्ट सेवा मेडल पुरस्कार (पीव्हीएसएम) जाहीर झाला असून सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे सायंकाळी पाच वाजता एका खास समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. २६ जाने २०२० मध्येच हा पुरस्कार जाहीर झाला होता परंतु कारोनाच्या प्रादूर्भामुळे पुरस्का
जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांकडून मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ कधी असेल, त्याचा अचूक अंदाज घेतला जातो आणि त्यासाठी साधारण जुलैपासून ते १५ ऑगस्टपर्यंतचा काळ योग्य समजला जातो. तेव्हा यानिमित्ताने जगभरातील मंगळमोहिमांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
जपान, जर्मनी, अमेरिका यांच्याशी मोदी शासनाने मधुर संबंध निर्माण केलेले आहेत. ते प्रचंड भांडवली गुंतवणूक करू शकतात. अनिवासी भारतीय यांची संख्या दीड-दोन कोटींच्या आसपास असावी. त्यातील सगळे पैसेवाले नसले तरी खूप मोठ्या संख्येत भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता असणारे भारतीय आहेत. ते भारतात पैशाची गुंतवणूक करू शकतात.
कोरोनाचा धोका कायम असतानाही लोकलमध्ये निष्काळजीपणे विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘मार्शल’ नेमण्यात येणार आहेत. कोरोना आटोक्यात येत आहे, असे दिसत असले तरी धोका कायम आहे. पालिका प्रशासनातर्फे तशी वेळोवेळी सूचना देण्यात येत आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे टूल किट शेअर केल्याने स्वीडनमधील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग ही सध्या भारतामध्ये चर्चेत आहे. आणि आता ती एका नव्या वादात सापडली आहे.
एक असा व्यक्ती, ज्याने भविष्य वर्तमानात साकारण्याची हिंमत केली आणि खरोखरी ते सत्यातही उतरवले, असा असामान्य माणूस आता जगभरात पाय रोवण्याची सुरुवात भारतापासून करतोय, हे सर्वस्वी अभिमानास्पद आहे.
परग्रहांवरील जीवसृष्टीविषयी फार पूर्वीपासूनच मानवाला कुतूहल होते. पण, खगोलशास्त्रातील विविध प्रयोग आणि नवनव्या संशोधनामुळे परग्रहवासीयांच्या अस्तित्वाबाबत जगभरातील वैज्ञानिकांचेही हळूहळू एकमत होताना दिसते. २०२० या सरत्या वर्षातही अंतराळ विज्ञानात ही चर्चा केंद्रस्थानी राहिली. त्यानिमित्ताने...
धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदूंच्या विरोधात षड्यंत्रे रचली जात होती, पण आता त्याचा पर्दाफाश करण्यापर्यंत देशातले दर्शक पोहोचले आहेत. हिंदूंना बदनाम करणार्यांच्या चेहर्यावरचा बुरखा फाडला जात असून त्यांना त्यांची जागाही दाखवली जात आहे. त्याची आताच्या काळातील निवडक उदाहरणे पाहिली तरी हे नेमके कसे सुरु आहे, हे समजू शकेल.
डेन्व्हर रेल्वे स्टेशन. पूर्वेला जाणारी रेल्वे लवकरच सुटणार होती. येणार्या प्रवाशांची झुंबड उडाली होती. एका डब्यात खिडकीनजीकच्या सीटवर उत्तम पोशाखातील एक देखणी तरुणी बसली होती. गाडी सुटण्यापूर्वी काही क्षण दोन तरुण घाईघाईने डब्यात चढले.
पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी पुन्हा एअरस्ट्राईक करण्यास वायुसेना सदैव तयार असल्याचा इशारा वायुसेनाप्रमुखांनी दिला आहे.
पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूसा यांच्या सन्मानार्थ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी राज भवन मुंबई येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. भारत व पोर्तुगाल देशांमधील संबंध दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र एका विशेष गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे राज्यसभेतील मार्शल यांचा बदलेला पोशाख.
पोलिसांनी धार्मिक भावना भडकवणे, दंगल भडकावणे अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. जेव्हा हे गुन्हे दाखल झाले तेव्हा कर्नाटकात कुमारस्वामींचे सरकार होते.
लहानपणापासूनच आकाशात उडणारी विमाने पाहून सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणार्या आणि भारतीय हवाई संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणार्या नव्या वायुसेनाप्रमुख राकेशसिंह भदोरिया यांच्याविषयी...
अक्षय कुमारच्या मिशन मंगल हा चित्रपट बॉक्स ऑफिसावर जोरदार कमाई करत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाला करमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
उद्या १८ जुलैला विधानसभेत होणार्या विश्वासदर्शक ठरावावेळी १५ बंडखोर आमदारांना हजर राहण्याची सक्ती केली जाऊ नये, असे सर्वोच्च न्यालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या सरकारसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
एका स्वप्नवत अशा जगात घेऊन जाणारा 'मिशन मंगल' या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित झाला. अक्षय कुमार या चित्रपटात एका शास्त्रज्ञाची भूमिका साकारणार आहे. भारताच्या एका सुवर्ण कामगिरीवर आधारित 'मिशन मंगल' हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
शिक्षण घ्या. वाचन करा. यासाठी शाळा, ग्रंथालयं हवीत. त्याचीही आम्ही तरतूद करतो. पण आफ्रिकन बंधूनो, शेती करणं बंद नका रे करू! तुमच्या कोको पुरवठ्यावरच तर आमचे लठ्ठ पगार अवलंबून आहेत.
अंतराळ संशोधनावर आधारित स्टार ट्रेक, स्टार वोर्स, ग्रॅव्हिटी यांच्यासारखे चित्रपट आत्तापर्यंत हॉलिवूड मध्ये बनवण्यात आले. मात्र बॉलिवूडमध्ये हा विषय तितक्या सक्षमतेने अद्याप कोणीही मांडलेला नाही. त्यामुळेच आता भारतातील एका ऐतिहासिक घटनेवर आधारित 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे
द्रावर पहिले पाऊल ठेवणारा मानव म्हणून जसा नील आर्मस्ट्राँगने इतिहास रचला तसाच इतिहास आता एका महिलेच्या नावे रचला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती ‘नासा’ संस्थेचे प्रशासक जिम ब्रायडेनस्टीन यांनी दिली. त्यामुळे एकेकाळी केवळ चूल आणि मूल सांभाळणारी ‘ती’ आता मंगळावर झेप घेईल.
मंगळावरची ‘अपॉर्च्युनिटी’ हे वाचून कदाचित प्रश्न पडेल की आता मंगळावर कोणती आली हो ही नवी ’अपॉर्च्युनिटी’? होय, पण हे खरं आहे. ही कुठल्या कामाची ‘अपॉर्च्युनिटी’ नाही, तर ‘नासा’ने मंगळ ग्रहावर सोडलेल्या ’अपॉर्च्युनिटी रोवर’ या अंतराळ यानाचा विषय आहे. कारण, मंगळ ग्रहाच्या शोधासाठी निघालेल्या ’अपॉर्च्युनिटी रोवर’ या यानाच्या ऐतिहासिक सफरीचा नुकताच अंत झाला.
मुंबई महापालिकेने ‘क्लीन अप मार्शल’ संदर्भातील नियमावलीत सुधारणा केली आहे. मुंबईकरांना विनाकारण त्रास देणाऱ्या ‘क्लीन अप मार्शल’वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
काँग्रेस-जेडीएसची धुसफूस शिगेला, कुमारस्वामी हतबल
एका कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर हे कुमारस्वामी इतके संतापले की, त्यांनी चक्क फोनवरून त्या कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना जीवे मारण्याचे आदेशच देऊन टाकले.