नागपूरच्या भोसले घराण्यातील शूर मराठा सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा १५ ऑगस्टपूर्वी लंडनहून महाराष्ट्रात परत आणली जाईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सोमवारी दि.७ जुलै रोजी विधानसभेत आणि विधान परिषदेत दिली.
Read More
निवृत्त न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग' साल २०२४ मध्ये स्थापन झाला होता. या आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र विधीमंडळाने २०२४ मध्ये 'मराठा आरक्षण कायदा २०२४' मंजूर केला होता. या कायद्यानुसार मराठा समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेला वर्गाला १० टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने समाजाला तात्पुरत्या स्वरूपात १०% आरक्षणाचा लाभ घेण्याची परवानगी देणाऱ्या आदेशाला एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात, गुरूवार दि. २६
विवाह हा हिंदू धर्मशास्त्रानुसार सोळा संस्कारांपैकी एक! मात्र आज त्याचे स्वरुप बदललेले दिसते. पूर्वी नसलेल्या असंख्य नवीन पद्धती आल्या आणि परंपरांचा भाग झाल्या. काही जुन्याच प्रथा नव्याने सुरु झाल्या. त्यापैकीच हुंडा ही प्रथा होय. या प्रथेने अनेक बळी घेतले आहेत. हे टाळण्यासाठी मराठा समाजाने विवाहाची एक आदर्श आचारसंहिता जाहीर केली आहे, त्याचा घेतलेला आढावा...
मागील काही दशकांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय आखाड्यात जेवढा संवेदनशील झाला आहे तेवढाच तो न्यायालयीन दृष्टीने किचकट बनला आहे. २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांआधारे आरक्षण दिले होते, परंतु ते मे २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवले. याबाबत महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, जी एप्रिल २०२३ मध्ये फेटाळण्यात आली. त्यानंतर, एक उपचारात्मक याचिका (Curative Petition) दाखल करण्यात आली, जी सध्
( official history of the Maratha Empire should be published MP Udayanraje Bhosale demands to minister amit shah ) “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रकाशित करावा,” अशी मागणी भाजप खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे गुरुवार, दि. २७ मार्च रोजी केली आहे.
Udayanraje Bhosale छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रकाशित करावा, अशी मागणी भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे गुरुवारी केली आहे.
#MarathaEmpire #ChhatrapatiShivajiMaharaj #SambhajiMaharaj छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांचे वीर सेनानी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी मुघलांविरुद्ध संघर्ष सुरूच ठेवला! त्यांच्या अद्वितीय पराक्रमाची, गनिमी काव्याच्या जोरावर मुघलांना दिलेल्या धड्याची सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये! हर हर महादेव!
बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचा वारसा तसा मोठा आहे. पण, बरेचदा या चित्रपटांमध्ये इतिहासाचे एकांगी चित्रणदेखील पाहायला मिळाले. विशेषतः मुघल साम्राज्याचे उद्दातीकरण ते स्थानिक योद्ध्यांच्या पराक्रमाला तुलनेने कमी लेखण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्नही झाले. पण, २०१४ नंतर हा प्रवाह बदललेला दिसतो. मराठा इतिहासावर आधारित ‘तान्हाजी’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली. याच पार्श्वभूमीवर ‘छावा’ या चित्रपटाने ऐतिहासिक चित्रपटांचा नवा अध्याय सुर
मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पोलादपूर येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भाजप विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर भूषविणार आहेत.
मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी गुरुवार, ३० जानेवारी रोजी सहाव्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले.
(Chhaava Movie Trailer) चित्रपटप्रेमींना प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा दमदार ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी संध्याकाळी प्रदर्शित झाला. इतिहासकार शिवाजी सावंत यांच्या छावा या प्रसिद्ध मराठी कादंबरीवर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची वर्णी लागली आहे.
(Chhaava Movie Trailer) अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक जीवनपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची मांदियाळी आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी 'छावा' चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित
(Chhaava) विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरला चित्रपटप्रेमींकडून मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार असे बोलले जात आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची, महाराणी येसूबाईंची आणि औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार हे एव्हाना साऱ्यांनाच कळले आहे. मात्र या सिनेमात आणखी दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
(Santosh Deshmukh Murder Case) बीड मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी तसेच सरपंच देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अश्या मागण्या या मोर्च्याद्वारे करण्यात येत आहेत. आज आज जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच देशमुखांच्या हत्येविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी मोठा जनसमुदाय एकवटलेला दिसून आला.
मुंबई : मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या घाटकोपर (पूर्व) येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा गुरुवार, ९ जानेवारी २०२५ रोजी भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांच्या हस्ते पार पडणार आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र सादर करण्यास दोन महिन्यांची अतिरिक्त मुदतवाढ देण्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दि. २६ डिसेंबर रोजी केली. मंत्रालयात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी याबाबत घोषणा केली.
गेवराई, बीड, औसा, अंबेजोगाई, लातूर ते जालना, अंबड, बदनापूर, राळा, भोकरदन, परतूर, परभणी सेलू ते नांदेड अशा मराठवाड्यातल्या जवळ-जवळ सर्वच प्रातिनिधीक तालुका, शहर भागातील मराठा समाज आणि इतर मागासवर्गीय समाजाशी संवाद साधण्याचा नुकताच योग आला. मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण किंवा ओबीसी आरक्षणांतर्गत समाजमनाचा ठाव घेतला. आरक्षणाबाबत अत्यंत संवेदनशील असलेला समाज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही प्रखर आहे. समाजाच्या पूर्वजांवर रझाकरांनी केलेले अत्याचार आजही त्यांच्यासाठी भळभळती जखम आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ समाजासाठ
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून लवकरच याकरिता मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. यातच राज्यातल्या विविध राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचारसभा घेण्यात येत असून आश्वासनांची घोषणा यावेळी करण्यात येत आहे. यात मराठा आरक्षणाचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी २५ जागा लढवण्याची घोषणा केली होती. परंतू, मित्रपक्षांच्या उमेदवारांची यादी न आल्याचे कारण देत त्यांनी सोमवारी सकाळी निवडणूकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
मुंबई : ( Manoj Jarange ) जरांगे केवळ आता मराठा समाजाचा चेहरा होऊ पाहत नाही. मराठा समाजाने त्यांना नाव, लौकिक, चेहरा दिला. परंतु त्यांच्यात राजकारणाचे वारं भिनलेय, असे टिकास्त्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सोडले आहे. तसेच जरांगे पाटील यांच्या भुमिका मराठा समाजासाठी ज्या पहिल्या होत्या त्या आता राहिलेल्या नाहीत. मराठा समाज ताकदीने महायुतीच्या मागे उभा राहील. निकालातून ते दिसून येईल, असा ठाम विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
Manoj Jarange मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्डाचे सज्जद नेमानी यांनी ३१ ऑक्टोबर रोजी भेट घेतली. येत्या विधानसभा निवडणुकीला मनोज जरांगे पाटील यांनी सज्जद नेमानी यांची भेट घेत मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
( Manoj Jarange On Assembly Elections 2024 ) राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्गा सतत चर्चेत राहिला आहे. यासंदर्भात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजवर अनेक उपोषणे व आंदोलने केली आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारने यावर कोणताही ठाम निर्णय वा भूमिका घेतलेली नाही. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच मनोज जरांगे यांनी दि. २० ऑक्टोबर रोजी
( Pravin Darekar )“सगळ्या आंदोलनातून मनोज जरांगे भरकटल्यासारखे वाटत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल, असे वाटले होते. परंतु, मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आक्रोश, टाहो फोडताना दिसत आहेत. हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखे त्यांचे बोलणे सुरू आहे. त्यांच्यात धमक असेल, तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी, उमेदवार उभे करावेत आणि सत्ता आणून स्वतः नेतृत्व करावे,” असे आव्हान भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ
मराठा समाजाला देणारा कोण आणि फसवणारा कोण? याबद्दल मनोज जरांगेंनी विचार करायला हवा, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
सारथीच्या माध्यमातून मराठा तरुण मोठमोठ्या पदांवर गेलेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. बुधवारी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. दरम्यान, काहीही न खाल्ल्याने त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांनी नवव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मराठा आंदोलनाला आपला पाठिंबा असून, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त असल्याचे शरद पवार म्हणाले. मात्र, ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा अट्टाहास बरोबर आहे का? तसेच, मुस्लिमांनाही आरक्षण देण्याची मागणी बरोबर आहे का? हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. १९९४ मध्ये ‘मराठा बांधवांना आरक्षणाची गरज नाही,’ असे पवार यांनी स्पष्ट केले असल्याने, त्यासाठी होणारे आंदोलन हे पवारांचेच पाप आहे, असेच म्हणावे लागेल.
मनोज जरांगेंनी सरकारच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी विनंती मंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंनी त्यांच्याशी संवाद साधला.
रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व दसपटी वतीने घेण्यात आलेला मराठा शक्ती आणि स़ंस्कृती जागृती मेळावा २०२४, दिमाखात पार पडला. या मेळाव्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महाविकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोढरे यांनी भूषविले. त्याचप्रमाणे दसपटी विभागातून रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व उद्योजक प्रतापराव श
आम्ही १० टक्के आरक्षण दिल्यावर ते रद्द होण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, याचा मनोज जरांगेंनी विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या १६ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
महाविकास आघाडी आणि जरांगे हे दोघेही एकालाच टार्गेट करत आहेत. यातून त्यामागची भावना स्पष्ट दिसत आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. टीव्ही ९ मराठीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.
वक्फ बोर्डाप्रमाणे आरक्षणाचं बिल आणा आमचा पाठिंबा राहिल, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यातील वातावरण तापलं असून मराठा समाजातील लोक अनेक नेत्यांना आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगत आहेत. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं.
दुसर्याच्या वाटेत काटे पेरून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, तर त्या काट्यांवरून चालण्याची वेळ स्वतःवरही कधीतरी येते, असे म्हणतात. त्याने पाय रक्तबंबाळ होतातच, शिवाय समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. शरद पवार हे त्याचे ताजे उदाहरण.
काळजी करू नका, छगन भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. नाशिकमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला.
माझा करेक्ट कार्यक्रम फक्त परमेश्वर करु शकतो, असं चोख प्रत्युत्तर मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना दिलं आहे. जरांगेंनी नाशिकमध्ये भुजबळांचा कार्यक्रम करणार, असा इशारा दिला होता. यावर आता भुजबळांनी प्रत्तुत्तर दिले.
मनोज जरांगे आता एकटे पडत आहेत. त्यामुळे त्यांनी राजकीय भाषा टाळायला हवी, असा सल्ला भाजप नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिला आहे. तसेच मराठा समाजाला त्यांची राजकीय भाषा अजिबात आवडत नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अखेर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा ठोक मोर्चाचे रमेश केरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका करण्याची मागणी केली. त्यानंतर शरद पवारांनी या आंदोलकांशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं पण मनोज जरांगेंचं समाधान होत नाही. त्यांच्या अपेक्षा जास्त आहेत, असे वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केले आहे. तसेच मनोज जरांगेंनी खुशाल २८८ जागांवर उमेदवार उभे करावे, असेही ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, यावेळी ते आरक्षणासंबंधी जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
महाराष्ट्रात बांग्लादेशसारखं काहीही होणार नाही, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं आहे. बांगलादेशमध्ये सध्या अस्थिर वातावरण असून तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. तसेच बांग्लादेशमध्ये होत असलेल्या हिंसाचारामुळे शेख हसीना यांनी देश सोडला आहे. दरम्यान, यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करीत मंगळवार, दि. ३० जुलै रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे हा मुद्दा आणखी चिघळल्याने विरोधकांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाने उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मातोश्रीबाहेर दाखल झाले असून अनेक घोषणा देत आहेत.
"संरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना एकत्र बोलवावं आणि सर्वमान्य तोडगा काढावा,” असे काल उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.
जात वैधता प्रमाणपत्राअभावी उच्च शिक्षणाची संधी हुकणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी महायुती सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून अनेक नेत्यांनी आंदोलने केली, बलिदान दिले. अनेक नेत्यांनी प्रचंड काम केले, अभ्यास करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे
शरद पवारांनी सोमवार, २२ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्दावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी २ वाजताच्या दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवारांची ही बैठक पार पडली.
मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आता राजकीय वास यायला लागला आहे. तसे असेल तर त्यांनी खुली राजकीय भुमिका घ्यावी, असे प्रत्युत्तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे. तसेच मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नका, असे आवाहनही दरेकर यांनी जरांगेंना केले आहे.
शरद पवार हे स्वत: चार वेळा मुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही असा प्रश्न करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्र सोडले. या महाअधिवेशनात बोलतांना त्यांनी भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाबाबत नेहमीच भूमिका स्पष्ट केल्याचे नमूद करून मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे सांगितले, मराठा आरक्षणाची ही लढाई १९८२ मध्ये सुरू झाली होती, अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना आरक्षण मागितले होते. मात्र, त्यांन
अजय बारस्कर यांची पंढरपूरमध्ये गाडी जाळल्याने ते आक्रमक झाले आहेत. त्यांना धमकीचे फोन येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी थेट धमकी देणाऱ्यांची नावच जाहीर करुन टाकली. काही महिन्यांपूर्वी अजय बारस्कर यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले होते.
छगन भुजबळ शरद पवारांच्या गटात जाणार. छगन भुजबळांची महायूतीत कोंडी होतेय, अशा अनेक बातम्या आज सकाळी सकाळी माध्यमांमध्ये यायला लागल्या. याचं कारण होतं छगन भुजबळांनी अचानक घेतलेली शरद पवारांची भेट. शरद पवारांची अपॉईनमेंट न घेता गेलेल्या भुजबळांना तब्बल दीड तासांनी त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा दीड तास चाललेल्या या भेटीत नेमकं काय शिजतंय, अशी चर्चा सुरु झाली. कुणालाच कानोकान खबर नसलेली ही भेट नेमकी कशासाठी आहे? आणि अशा अचानक घेतलेल्या भेटीमागे नेमकं कारण काय? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.