लग्न झाल्यावर बहिणीने जास्त दिवस भावाच्या घरी राहू नये, असा खोटक टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंना लगावला आहे. ते सध्या महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर आहेत.
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शनिवार, दि. ३० मार्च रोजी ही माहिती दिली. या जागेवरून महादेव जानकर लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मनसे आणि रासपच्या ( MNS Jankar Mahayuti ) महायुतीत येण्याने कोणताही पेच निर्माण होणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. छगन भुजबळ सुद्धा नाशिकच्या जागेवर इच्छुक आहेत. या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) साथीने लेकीचा बारामती मतदारसंघ सुरक्षित करू पाहणाऱ्या शरद पवारांना देवेंद्र फडणवीस यांनी दणका दिला आहे. 'मविआ'च्या दारातून महादेव जानकर यांना परत आणतानाच, फडणवीस यांनी एका दगडात 'तीन' पक्षी मारले आहेत. त्यामुळे माढा, बारामती आणि परभणी असे तीन लोकसभा मतदारसंघ महायुतीसाठी 'सेफ' झाले आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा लवकरच सुटणार असल्याची माहिती पुढे येत आहे. काही दिवसांपुर्वीच शरद पवार यांनी महादेव जानकार सोबत आल्यास त्यांना माढ्याची जागा देऊ असे वक्तव्यं केले होते. त्यानंतर आता याबाबत निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मंत्री छगन भुजबळ आमचे दैवत असुन त्यांना धमकी देणं हे चूक आहे. असं काही होत असल्यास बाकीचा समाज गप्प बसणार नाही. असा इशारा रासपचे महादेव जानकर यांनी दिला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
"आपली इतर कामे सांभाळून ऐच्छिक सेवा म्हणून होमगार्ड हे काम स्वइच्छेने केले जाते. संकटकाळात होमगार्डस करून केली जाणारी मदत आणि इतर गोष्टी लक्षात घेता होमगार्डना वर्षात १८० दिवस कायम ठेवण्याचा निर्णय तसाच कायम ठेवला जाईल," अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दुर्गम आणि अतिदुर्गम भागात वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी राज्यात नव्याने १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येत असून, त्यासंदर्भातील कामे गतीने सुरू आहेत. तसेच निवासी डॉक्टरांची सोय व्हावी यासाठी वसतिगृह बांधणे आणि जुन्या वसतिगृहांची डागडुजी करण्यात येणार आहे. यासाठी १४६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्याकरिता कॉरिडॉरची निर्मिती प्रस्तावित आहे. कॉरिडॉरचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून जनतेच्या सूचना, हरकती यांचा विचार करून या आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करण्यासंदर्भात सदस्य मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
धनगर आरक्षणाची सुरुवात मीच केली, यासाठी दिल्ली येथे मी पहिला मोर्चा काढला होता आणि या समाजाला न्यायदेखील मीच देणार
माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयींच्या अÏस्थचे गोदावरीत विसर्जन
टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल या महिन्याच्या अखेरीस येणार आहे. अहवाल प्राप्त होताच सरकार त्यावर तात्काळ कार्यवाही करेल असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.
दूध व दूध भुकटी निर्यात करणाऱ्या उत्पादकांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्याबरोबरच शालेय पोषण आहार योजनांमध्ये दूध किंवा दूध भुकटीचा समावेश करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.