अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्वर्यू, पूर्व राष्ट्रीय संघटनमंत्री तथा रा. स्व. संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदासजी देवी यांनी दि. २४ जुलै रोजी जगाचा निरोप घेतला. मदनदासजींचे जाणे, हे संघ परिवारातील विशेष करून विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी मनाला अतिशय वेदना देणारे आहे. कारण असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवनाचे शिल्पकार, प्रेरणास्थान, समर्पित प्रचारक असे त्यांचे संपूर्ण जीवन होते. राष्ट्र उभारणीसाठी त्यांनी दिलेले योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा देणारे आहे.
Read More
काही दिवसांपूर्वी जेव्हा आपण मदनदासजींना गमावले, त्यावेळी माझ्यासकट लाखो कार्यकर्ते अतिशय शोकाकुल झाले.मदनदासजींसारखे प्रभावी व्यक्तिमत्त्व आता आपल्यासोबत नाही, हे वास्तव स्वीकारणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे. तरीही त्यांचा प्रभाव चिरंतन राहील, ही भावना आपले सांत्वन करत आहे. त्यांची शिकवण आणि त्यांचे सिद्घांत आपल्याला यापुढील प्रवासात एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत राहतील आणि मार्गदर्शन करतील.
“मदनदास देवी म्हणजे व्यक्तीनिर्माण आणि संघटनानिर्माणाचे अद्भूत शिल्पकार होते. कार्यकर्ता पारखून त्याच्याकडे नेमकी जबाबदारी देणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सोमवारी व्यक्त केले.
“मदनदासजी देवी यांच्या व्यक्तित्वाचे वर्णन करायचे झाले, तर ’निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू’ असेच करावे लागेल. ते खर्या अर्थाने योगी होते, संघटन सूत्रामधून त्यांनी मनुष्याला जोडण्याचे काम केले. आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी आणि आंतरिक स्नेहाने प्रेरित करून कोणत्या ना कोणत्या कामात सक्रिय केले. व्यक्तीच्या मनाला ते स्पर्श करीत असत. कार्यकर्त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे ते पालक होते. संघटनेचे आणि मनुष्य जोडण्याचे काम करीत असताना खूप काही सहन करावे लाग
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा.स्व.संघ) माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे सोमवारी बंगळुरू येथे निधन झाले. त्यानिमित्त लखनौच्या निराला नगर येथील माधव भवन सभागृहात अवध प्रांतातर्फे शोकसभा आयोजित करणात आली होती. "लोकांना समजून घेण्याची अद्भुत क्षमता असलेले एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे मदनदासजी देवी. ज्या ठिकाणी ठोस भूमिका घेऊन बोलणे गरजेचे असते, तिथे ते स्पष्टपणे बोलायचे. जिथे समोरच्याला थांबवायचंय तिथे ते त्यास थांबवत असे.