आयुष्यात हव्या असलेल्या गोष्टींचा समतोल साधत मध्यममार्गाचा मागोवा घेणारा ‘मीडियम स्पाइसी’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षकांना घरबसल्या या चित्रपटाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी वाहिनीवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नात्यांची गुंतागुंत आणि त्यांचं तरल चित्रण दाखवणारा होता.
Read More
‘मीडियम स्पाइसी’ ८ डिसेंबर रोजी इटलीमधील, फ्लॉरेन्स येथील ‘ला कॉंपाग्निया’ या आकर्षक चित्रपटगृहात थेट ऑन-ग्राउंड दाखवला जाईल.
आजवर काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे जेष्ठ कलाकार नव्या पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
अभिनेता ललित प्रभाकर हा लँडमार्क फिल्म्स, विधी कासलीवाल निर्मित ’मीडियम स्पाइसी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित टाकळकर यांनी केले आहे.
आवडी – निवडी आणि सवयी बद्दल खुसखुशीत भाष्य करणाऱ्या लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाचे शुटिंग लवकरच सुरु होत आहे. ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध नाटककार मोहित टाकळकर मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.