भारतात सत्तापालटासाठी ‘युएसएड’चा वापर झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आरोप अर्थहीन ठरवित, काँग्रेसने या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकारकडे करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणाव्या लागतील.
Read More
"लव्ह जिहाद"ची एक लाख प्रकरणे समोर आली आहेत.
लोकशाहीत निवडून आलेला आमदार किंवा खासदार हा त्याच्या मतदारसंघातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करीत असतो. त्यामुळे अमुक एका धर्माची किंवा समाजाची व्यक्ती मंत्रिमंडळात किंवा सभागृहात नसल्याने संबंधित धर्माचे किंवा समाजाचे प्रतिनिधित्व केले जात नाही, हा युक्तिवादच चुकीचा आणि फसवा. गेल्या काही वर्षांपासून भारतीय समाजात जातीपातींवरून आणि धर्म-भाषा यांच्यावरून फूट पाडण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. संबंधित युक्तिवाद हा त्याचाच एक भाग असून, त्याला जोरदार छेद दिला पाहिजे.
बाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी(शरद पवार गट), काँग्रेस या पक्षांना डिवचण्याची संधी सोडलेली नाही. लोकसभा निवडणुकीत मविआने राज्यात ३० जागांवर विजय मिळविला होता. या घवघवीत यशानंतरदेखील सांगलीतील जागेची चर्चा राज्यात पाहायला मिळाली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी शुक्रवार, दि. २१ जून रोजी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा निकालाचे विश्लेषण करण्यात आले. तसेच या निवडणुकीतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
इंग्रजी दैनिक मिड-डे कडून ईव्हीएमवर ५ कॉलमच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेला लेख हटविण्यात आला आहे. दरम्यान, ओटीपीद्वारे ईव्हीएम अनलॉक करण्याच्या मुद्द्यावर ‘मिड-डे’ने पसरवलेल्या भ्रामक माहितीवर दैनिकाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
येत्या १० वर्षात नागरिकांचे दरडोई उत्पन्न (Per Capital Income) हे दुपटीहून अधिक वाढणार असल्याचे मॉर्गन स्टॅनलीने आपल्या अहवालात म्हटले आहे. या निवेदनात म्हटल्याप्रमाणे आगामी काळात भारताची आर्थिक घोडदौड समाधानकारक पातळीवर कायम राहणार असल्याचे यात सांगितले गेले आहे. भारतीय जनता पार्टीच्या जागा सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत घटलेल्या असताना त्या 'आर्थिक' कारणांमुळे अथवा अर्थव्यवस्थेमुळे नसून इतर कारणांमुळे घटल्या असल्याचा दावा मॉर्गन स्टॅनलीने केला आहे.अर्थव्यवस्थेतील सुधारणा या कायम राहतील व अर्थव्यवस्थेला आगाम
अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतवर चंदीगढ एअरपोर्टवर हल्ला झाला होता. CISF जवान महिलेने कंगनाच्या कानशिलात लगावल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. अनेकांनी कंगनाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या असून काहीच दिवसांपुर्वी भाजपात प्रवेश केलेले अभिनेते शेखर सुमन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून एनडीए तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणार आहे. इंडी आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली असून यात राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे.
राजकीय अस्पृश्यतेमुळे ज्या भाजपबरोबर आघाडी करण्यासाठी, सहयोगी मिळत नव्हते, त्याच भाजपने आघाडींची सरकारे देखील आपला कार्यकाळ यशस्वी करतात, हा विश्वास देशाला दिला. गेले दशक बहुमताला कौल दिल्यानंतर, जनतेने पुन्हा एकदा आघाडीला कौल दिला आहे. आज याच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा शपथविधी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर रालोआच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा मांडलेला हा लेखाजोखा...
नुकताच २०२४ च्या लोकसभा निवडणूकीचा निकाल लागला. यात पहिल्यांदाच खासदारकीसाठी हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून भाजपकडून निवडणूक लढवणार्या कंगना राणावत हिने विजय मिळवला. परंतु, काल ७ जून २०२४ रोजी चंडीगढ एअरपोर्टवर तिच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. नवनिवार्चित खासदार कंगना राणावत (Kangana Ranaut) काल चंदीगढ विमानतळावरुन दिल्लीसाठी निघाली होती. तेव्हा एका महिला सुरक्षाकर्मीने तिच्या कानाखाली लगावली. या घटनेनंतर विविध प्रतिक्रिया उमटत असून शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने केलेल्या वक्तव्याविरोधात महिला सुरक्षाकर्मीच
अभिनेत्री आणि मंडी लोकसभेची नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत हिच्यासोबत चंदीगढ एअरपोर्टवर एक धक्कादायक घटना घडली. एका CISF महिला जवानाने बेसावध असलेल्या कंगनाच्या कानशिलात लगावली. या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला असून आता स्वत: कंगना हिने बॉलिवूडकरांवर डरकाळी फोडली आहे. तिच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतरही बॉलिवूड गप्प राहिल्याने तिने तीव्र नाराजी व्यक्त केली.
२०२४ च्या लोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जून रोजी जाहिर झाला. परंतु, अयोध्येतील नागरिकांनी भाजपला साथ न दिल्यामुळे कलाकार मंडळींनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायणमधील लक्ष्मण ही भूमिका ज्यांनी साकारली होती ते अभिनेते सुनील लहरी देखील यामुळे दु:खी झाले असून त्यांनी एका पोस्टद्वारे अयोध्येतील नागरिकांनी भाजपाला मत न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ज्या भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येतील राम मंदिराचे जानेवारीमध्ये उद्घाटन झाले होते, त्याच पक्षाच्या उमेदवाराचा ४ जून रोजी जाहीर झालेल्या न
लोकसभा निवडणूकीसाठी ४ जून २०२४ हा दिवस फार महत्वाचा होता. निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या या निकालात पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या यशानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेता अभिजित केळकर याने मोदींचे अभिनंदन केले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहिर झाला. अटीतटीच्या लढतीत एनडीएने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. परंतु, अयोध्येतील लोकांनी ज्या सरकारने त्यांना राम मंदिर देऊ केले त्यांच्याकडेच पाठ फिरवल्यामुळे गायक सोनू निगम भडकला असून त्याने अयोध्यावासियांचा तीव्र विरोध केला आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला. ज्या दिवसाकडे देशातील नागरिकांचे आणि राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते तो ४ जूनचा दिवस नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारा होता. दरम्यान, अयोध्येत अनपेक्षित अपयश मिळाल्यामुळे सरकारसह काही कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मिडिया पोस्ट करत, “सर्वात जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट घ्यावे लागतात”, असे म्हटले आहे.
संपुर्ण देशाचे लक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या निकालांकडे लागले होते. आणि यंदाही अभिनेत्री-खासदार हेमा मालिनी तिसऱ्यांदा या निवडणूकीत जिंकल्या आहेत. त्यांना उत्तर प्रदेशातील मथुरा येथून भाजपाचं तिकीट मिळालं होतं. त्यांच्या या विजयानंतर लेक ईशा देओल हिने खास पोस्ट केली आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाची रणधुमाळी आज ४ जून २०२४ रोजी सुरु झाली आहे. संपुर्ण देशाचं लक्ष या मतदान मोजणीवर लागले असून मंडीतून भाजपसाठी आनंदाची वार्ता येत आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिला मंडीतून तिकिट देण्यात आलं होतं. मंडीमध्ये कंगना राणावतच्या विरोधात माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि सध्याच्या खासदार प्रतिभा सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आणि सध्या कंगना ३६ हजार मतांनी आघाडीवर आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून दिल्लीमध्ये भाजपला सातही जागांवर आघाडीवर मिळविता आली आहे. दिल्लीत भाजपने आपचा सुपडासाफ केला असून सर्वच जागांवर निर्णायक आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या बंसुरी स्वराज २५ हजारांनी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
देशाचं संपुर्ण लक्ष सध्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे लागले देशभरात सर्वच राजकीय पक्षांची एकमेकांसोबत मोठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदा भाजपकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांना तिकीट देण्यात आले होते. यात अभिनेत्री कंगना राणावत, हेमा मालिनी, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, रवी किशन यांची नावे आहेत. हेमा मालिनी या मथुरेतून निवडणूक लढत होत्या. सध्या त्या १ लाख मतांनी आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे मंडीतही कंगना राणावतने बाजी मारली आहे.
देशाचं संपुर्ण लक्ष सध्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे लागले देशभरात सर्वच राजकीय पक्षांची एकमेकांसोबत मोठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदा भाजपकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांना तिकीट देण्यात आले होते. यात अभिनेत्री कंगना राणावत, हेमा मालिनी, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, रवी किशन यांची नावे आहेत. हेमा मालिनी या मथुरेतून निवडणूक लढत होत्या. सध्या त्या २ लाख मतांनी आघाडीवर आहेत.
मध्य प्रदेशात भाजपला सहज विजय मिळविता आला असून सर्वच जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. मध्य प्रदेशातील एकूण २९ जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. सर्वच जागांवर सर्वाधिक मताधिक्यावर भाजप उमेदवारांनी आपली जागा राखली आहे.
केरळमधील लोकसभेच्या एकूण २० जागांपैकी केवळ १ जागेवर भाजपला आघाडी मिळविता आला आहे. भाजपच्या सुरेश गोपी यांनी थ्रिसूर येथून तब्बल ७० हजार मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. सुरेश गोपी यांच्याविरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार व्हीएस सुनिलकुमार यांचा पराभव केला आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला आज ४ जून २०२४ रोजी सुरुवात झाली असून सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. अशात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने हिमाचलप्रदेशमधील मंडी येथून विजय मिळवला आहे. आणि यानंतर तिने सोशल मिडियावर पोस्ट करत सगळ्यांचे आभार मानले आहे.
इंदौर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांचा विक्रमी मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. शंकर लालवानी यांना तब्बल ११ लाख ७५ हजार मते मिळवित आपला गड राखला आहे. दरम्यान, इंदौर लोकसभा मतदारसंघात नोटालादेखील जनतेने पसंती दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
अभिनेत्री कंगना राणावत हिने पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीत आपले नशीब आजमावले होते. भाजपने तिला हिमाचलप्रदेशमधील मंडीतून लोकसभेची उमेदवारी दिली होती आणि आनंदाची बाब म्हणजे ती जिंकून आली आहे. तिच्यावर या यशानंतर कौतुकांचा वर्षाव होत आहे. यात अभिनेते अनुपम खैर यांचाही समावेश असून त्यांनी कंगनाला अभिनंदन करत एक विशेष पोस्ट शेअर केली आहे.
काँग्रेस पक्षाने यंदाच्या निवडणुकीमध्ये देशाला नवी दृष्टी दिली आहे. त्याचप्रमाणे पुढील वाटचाल काय असेल, याचा निर्णय इंडी आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा करून घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
१८ व्या लोकसभा निवडणुकीच्या ५४३ जागांसाठी मतमोजणी सुरू असून निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निकालानुसार एनडीए तिसऱ्यांदा सत्तास्थापन करता येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत.
सलग तिसऱ्यांदा सरकार बनविण्याची अभूतपूर्व कामगिरी भाजपने केली असली, तरी विजयाचा हा आनंद निर्भेळ नाही. भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत न मिळाल्याने नव्या सरकारच्या भावी योजनांमध्ये काहीशी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे. मोदी यांना बहुमतापासून वंचित ठेवले, याचाच विरोधी पक्षांना आनंद झाला आहे. पण त्यांना जनतेने तिसर्यांदा नाकारले आहे, ही गोष्ट ते विसरतात. या विजयामुळे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात कोणते निर्णय घेतले जातात, पाहणे औत्सुक्यपूर्ण होईल.
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल जाहीर झाले असून एनडीए पुन्हा एकदा बहुमत मिळाले आहे. दरम्यान, राज्यात महायुती विरुध्द मविआ असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. एकूण ४८ जागांपैकी महायुतीला १८ जागांवर विजय मिळविता आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या वतीने राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत.
लोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहिर होणार आहे. सध्या सगळ्यांचेच लक्ष निकालाकडे लागले असले आहे. अशात आता भारताचे पहिले निवडणूक आयुक्तांच्या जीवनावर लवकरच बायोपिक येणार आहे. विद्या बालन यांचे पती सिद्धार्थ रॉय कपूर यांनी या बायोपिकची घोषणा केली आहे. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
अवघ्या देशाला उत्सुकता लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, मंगळवार, दि. ४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मुंबईसह राज्यभरातील मतमोजणी केंद्रांवर प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ करिता अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले असून येत्या ४ जूनला निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालाचा अंदाज समोर येणार आहे. सायंकाळी ६:३० नंतर एक्झिट पोल स्पष्ट होतील. त्यानुसार, लवकरच एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. एनडीए विरुध्द इंडी आघाडी यांच्यात नेमकी बाजी कोण मारणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ करिता एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महायुतीला २४ जागा तर मविआला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. एबीपी-सीव्होटर च्या सर्व्हेनुसार राज्यात महायुती व मविआ यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. भाजपला १७ जागा, शिवसेना शिंदे गटाला ०६ जागा तर उबाठा गटाला ०९ जागा, शरद पवार गटाला ०६ जागा व काँग्रेसला राज्यात ०८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ करिता एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महायुतीला २४ जागा तर मविआला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार पियुष गोयल निवडून येण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान आज होणार असून त्यानंतर सायंकाळपासून मतदानोत्तर कल चाचण्याचे (एक्झिट पोल) निकाल विजयाचा अंदाज वर्तवणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार असून त्यासाठीच्या प्रचारतोफा गुरुवारी थंडावल्या आहेत. अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणूक २०२४च्या अंतिम टप्प्यातील मतदान राहिले असतानाच देशाच्या आर्थिक स्थितीबाबत आनंदवार्ता आली आहे. देशाच्या जीडीपी वाढीच्या दराने भारताला आनंदाची बातमी दिली असून मागील वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत ७.८ टक्के वेगाने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. येत्या ०४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून त्याआधीच आर्थिक वार्ता समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर टीव्ही चॅनेल, सोशल व डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस आपले प्रवक्ते पाठवणार नसल्याचे जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आली असून १ जून रोजी शेवटचे मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही मतदान होणार असून एकूण ५७ जागांसाठी ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार केंद्रात सत्ता स्थापन करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता यासंदर्भात संकेत दिले आहेत. ते म्हणाले, नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख जवळपास निश्चित करण्यात आली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडी आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. देशभरात काँग्रेस ४० आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला (सपा) ४ जागा मिळणेही अवघड आहे, असे भाकीत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर, सलेमपूर आणि चंदौली येथे प्रचारसभांना संबोधित केले.
भारतात आलेल्या आक्रांतांनी आमच्यावर राज्य केले, ते त्यांच्या बाहुबळावर नव्हे, तर आमच्या स्वकीयांचे निर्णय चुकले म्हणून. आमचेच देशबांधव जेव्हा देशहितापेक्षा, व्यक्तिगत लाभाला महत्त्व देतात, तेव्हाच पारतंत्र्याचे जोखड नशिबात येते. तेव्हा स्वराज्याचे सुराज्य व्हावे, असे मनोमन वाटत असेल, तर एक योग्य निर्णय घेणे गरजेचे असते. आजही त्यापेक्षा भिन्न परिस्थिती भारतीयांसमोर नाही. म्हणून अखेरच्या मतदानाच्या टप्प्यातही मतदारांनी बेसावध आणि निर्धास्त राहण्याची एक चूक देशातील पुढील शंभर पिढ्यांसाठी मात्र शिक्षा ठरु शकते.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशभरातील ५८ मतदारसंघामध्ये ५९.३३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ७८.१४ टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. त्याचप्रमाणे देशाची राजधानी दिल्लीमध्ये ५५.३८ टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यावेळी देशभरात ५९.३३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे लोकसभा निवडणुकीच्या १ ते ५ टप्प्यांमधील एकूण मतदार, मतदानाची टक्केवारी आणि मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या शनिवारी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सार्वजनिक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतदानाच्या आकडेवारीमध्ये फेरफार शक्यच नसल्याचा पुनरूच्चारही आयोगाने केला आहे.
डोंबिवली एमआयडीसीत बॉलयर स्फोटातील मृतांची संख्या आत्तापर्यंत मृतांचा आकडा ११वर पोहोचला आहे. यावरुन विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांचे चांगलेच कान उपटले आहेत.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात नवनवे खुलासे होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुणे पोलीसांच्या तपासात अनेक बाबी समोर आल्या असून कारच्या चालकाने सांगितले की, गाडी 'तो'च चालवत होता, त्यामुळे गाडी नेमकी कोण चालवत होता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची माहिती मिळताच विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला फोन केला होता, असे सदर प्रकरणी समोर आले आहे.
उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एका नियंत्रण सुटलेल्या मारुती इको कारने ५ महिलांना चिरडले आहे. या अपघातात आतापर्यंत ४ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक महिला जखमी झाली आहे. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे पूनम पांडे, दिव्या पांडे, सरिता द्विवेदी व ज्योती अशी आहेत.
उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि इंडी आघाडीने आपापली ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी दोन्ही आघाड्यांनी डावपेच आखून विजयाचा दावा केला आहे. पूर्वांचलमध्ये लोकसभेच्या २७ जागा आहेत.
मतदान केंद्रांवरील मतदानाची अंतिम प्रमाणीकृत आकडेवारी प्रकाशित करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. मात्र, तशी मागणी करून मतदान प्रक्रियेविषयी जाणीवपूर्वक शंका निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.
सोमवार, २० मे रोजी राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सकाळी ७ वाजतापासून एकूण १३ मतदारसंघांत मतदान सुरु झाले. दरम्यान, या मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ वाजतापर्यंत सरासरी ४८.६६ टक्के मतदान झाले आहे. Loksabha elections