पालघर जिल्ह्यातील मासेमारी समुदायात भीतीचे सावट पसरले आहे. खोल समुद्रात गेलेल्या नऊ मासेमारी नौका अद्याप परतल्या नसून त्यांचा मागमूसही लागलेला नाही. यापैकी वसईहून गेलेल्या तीन नौकांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तसेच प्रशासनातही चिंतेचे वातावरण आहे.
Read More
नुकत्याच मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकलसेवा आणि ‘बेस्ट’ची बससेवा विस्कळीत झाली. अशा वेळी मुंबईकरांना अखंडित सेवा देण्यात ‘मेट्रो’ आणि ‘मोनो’ रेल्वेसेवेने मोठा हातभार लावला. मात्र, अचानक मोठ्या संख्येने प्रवासी एकाचवेळी मोनोमध्ये चढल्याने प्रवाशांच्या अतिरिक्त भारामुळे मोनो बंद पडली. यामुळे, आधीच घरघर लागलेल्या या मोनोच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात आले. मात्र, जगभरात किरकोळ तांत्रिक बिघाड वगळता, मोनो रेल्वेच्या कोणत्याही मोठ्या दुर्घटनेचे उदाहरण नाही.
(Maharashtra Rain Update) गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले आहे. मुंबईत शुक्रवारपासून संततधार पाऊस कोसळत आहे. सलग तिसऱ्याही दिवशी पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसाठी भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मध्य भारतावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून त्याच्या प्रभावामुळे पुढचे दोन दिवस म्हणजेच १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(Vasai-Virar Heavy Rainfall) गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस सुरू आहे. वसई- विरारमध्येही सोमवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विरार पश्चिम येथील युनिटेक सोसायटीमधील जवळपास ३५ ते ४० इमारती पाण्याखाली गेल्या आहेत.
एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी सक्षम पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण व आरोग्यसेवा, कार्यक्षम प्रशासन, उद्योग व व्यापाराला चालना तसेच, पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी हे घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात. याशिवाय, स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग आणि शाश्वत साधनसंपत्तीचा वापर हेदेखील प्रगतीला गती देतात. हे मी मागील चार वर्षांपासून जम्मू-काश्मीरसंबंधित भेटीदरम्यान येथील २० जिल्ह्यांतील बहुतांश ठिकाणी अनुभवले आणि पाहिले. दुर्गम गावे व सीमावर्ती भागदेखील हळूहळू पण ठामपणे हीच बदलाची आणि विकासाची छटा दर्शवू लागले आहेत. का
(Municipal Elections 2025) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर होणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोग मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विभागीय बैठक घेण्यात आली. यात नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, त्याच साहेबांच्या देशाला आज भारतीय उत्पादक, सेवा क्षेत्र, बाजारपेठ आणि मनुष्यबळाची गरज तीव्र झाली आहे.
धो-धो कोसळणाऱ्या पावसाने मुंबईची तुंबईची झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेलाही बसलेला दिसून येत आहे. रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने चाकरमान्यांना केले आहे.
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल मधील प्रवास हा जिररीचा विषय बनला आहे. लोकलमधील गर्दी, चौथ्या सीटवरून होणारी भांडण, धक्का दिला या कारणावरून होणाऱ्या हाणामाऱ्या या गोष्टी मुंबईकरांना नव्या नाहीत. आता महिला प्रवासी डब्यातील अशीच एक घटना वायरल व्हिडियोतून समोर आली आहे.
मुंबई उपनगरीय भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प एमयुटीपी II अंतर्गत ८,०८७ कोटी, एमयुटीपी-III अंतर्गत १०,९४७ कोटी आणि एमयुटीपी IIIA अंतर्गत ३३,६९० कोटी खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. ही माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवार,दि.२५ रोजी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या ७/११ लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गुरुवार, २४ जुलै रोजी सुनावणी पार पडली असून आता याप्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. सगळ्या आरोपींना फाशी होणारच, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ७/११ लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
२००६ च्या ७/११ मुंबई लोकल रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवार दि. २२ जुलै रोजी एका याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हा मुद्दा तातडीने यादीत घेण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची सुनावणी दि. २४ जुलै रोजी घेण्यास सरन्यायाधीशांनी सहमती दर्शवल्याची माहिती आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ७/११ लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केल्याच्या निर्णयाला आव्हान देत महाराष्ट्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज, बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
(7/11 Mumbai Local Blasts) मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सर्व १२ आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा रद्द करत निर्दोष मुक्त केले आहे. या खटल्यात १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. उच्च न्यायालयाने मात्र हा निकाल रद्द करून त्या सर्व आरोपींना तातडीने कारागृहातून सोडण्याचे आदेश जारी केले आहेत.
कायद्याच्या राजवटीने शासित असलेल्या देशात जातीवर आधारित कोणताही भेदभाव मान्य नाही, असे गुरूवार दि.१७ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अय्यनार मंदिरात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या (एससी) भाविकांना अडविल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अरियालूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि उदयारपलयम महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, “पुथुकुडी येथील अय्यनार मंदिर प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या भाविकांना आडवू नये आणि त्यांना उत्सवात सहभागाची संपूर्ण मुभा दिली जावी.”
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेच्या सर्व डब्यांना मेट्रोप्रमाणे स्वयंचलित दरवाजे आणि वातानुकूलन (एसी) सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणालाही बेघर केले जाणार नाही, अशी ग्वाही देताना त्यांनी मुंबईच्या विकासाबाबत सरकारची भक्कम भूमिका मांडली.
प्रताप सरनाईक यांची माहिती; खासगी कंपन्यांच्या वेळेबाबत टास्क फोर्स लोकल रेल्वेला मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. मात्र, कार्यालयीन वेळेतील गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे प्रवास दिवसागणिक असह्य होऊ लागला आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली. तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेच्या नियोजनासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याचेही सरनाई
मुंबईतील लोकल सेवा आणि बेस्ट सेवेनंतर आता मुंबई मेट्रो सेवेलाही मुंबईकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संचलित मुंबई मेट्रो २ अ आणि ७ या मार्गावरून एकाच दिवशी तब्बल ३ लाख १ हजार प्रवाशांनी प्रवास करत एक नवीन प्रवासी विक्रम केला आहे, अशी माहिती महामुंबई मेट्रो ऑपरेशनल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या गाठत नवा मैलाचा दगड !, असे म्हणत एमएमएमओसीएलने आपला आनंद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून साल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता देण्याचा आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उबाठा गटाने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बुधवार दि. २ जुलै रोजी केली असता, न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.
(Harshwardhan Sapkal) "आघाडीच्या तडजोडींमुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत जिल्हा आणि तालुका कमिट्यांना आघाड्यांबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिले जातील", असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अलिबाग येथील युवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरानंतर माध्यमांशी संवाद साधतेवेळी केले आहे.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोेकल रेल्वेच्या प्रवासावर मुंब्रा येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. साहजिकच मुंबईकरांच्याही लोकल रेल्वे यंत्रणेकडून सुधारणेच्या प्रचंड अपेक्षा आहेत. पण, मागील ११ वर्षांत मुंबई लोकलच्या सेवेमध्ये निश्चितच काही सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांचाच यानिमित्ताने आढावा घेणारा हा लेख...
पश्चिम रेल्वेकडून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम हा मुंबईतील लोकलसेवेवर होतो. अनेकदा पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने ट्रॅकवर पाणी साचून मुंबईची लोकल सेवा रखडते. हेच पाहता मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नालेसफाई आणि इतर पावसाळापूर्व तयारी करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने भुयारी नाल्यांच्या सफाईवर निरीक्षण ठेवण्यासाठी तरंगते कॅमेरे आणि थेट काल्वर्टमध्ये जात निरीक्षण करू शकणाऱ्या कामेरी मदत घेतली आहे. पावसाळ्यात दरवर्षी प्
नुकताच मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा स्थानकात दोन लोकलमधील गर्दीमुळे लोंबकळून प्रवास करणार्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांवर घासल्या गेल्या आणि रुळावर पडून चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. मुंबई लोकलमधून गर्दीमुळे पडून मृत्युमुखी पडणार्यांचे प्रमाण दर आठवड्याला सरासरी सात ते नऊ इतके आहे. त्यामुळे आता देशाचे अर्थचक्र गतिमान ठेवणार्या या महानगरातील लोकलचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना आवश्यक आहेत. त्याचाच आढावा घेणारा हा लेख.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाशी युती करावी आणि कोणाशी नाही, हे ठरविण्याचे अधिकार आमचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक समितीला आहेत. इतर कोणीही युतीबाबत निर्णय घेऊ शकत नाही. आमची भूमिका या निवडणुका महायुती म्हणून लढण्याची आहे. पण, काही जागांवर, जेथे शक्य होणार नाही, तेथे आम्ही मैत्रीपूर्ण लढती करू”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ११ जून रोजी दिली.
राज्यभरात सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना शरद पवारांनी याबाबत एक विधान केले आहे. मंगळवार, १० जून रोजी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकांची तयारी अखेर सुरू झाली आहे. राज्य सरकारने सोमवार, दि. 10 जून रोजी मुंबईसह राज्यातील सर्व ’अ’, ’ब’, ’क’, ’ड’ वर्ग महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश जारी केले. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले असून लवकरच नागरिकांना नवे लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून मंगळवार, १० जून रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला आहे. गावदेवी मैदानापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.
आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या चार जणांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले. दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान झालेल्या या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, दिवा ते छशिमट जलद लोकल सुरू करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवार, दि. 9 जून रोजी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, त्यावेळी ते बोलत होते.
लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी भाडेवाढ न करता एसी ट्रेन आणण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवार, १० जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत असलेले ६ प्रवासी खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेल्या लोकल ट्रेन अपघाताच्या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्घटनेत जवळपास ५ ते ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघाताची घटना दुर्दैवी असून जखमींचा जीव वाचवण्यास आमचे पहिले प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून समोर येईल, असे ते म्हणाले.
मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेतील जखमींना उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी कळवा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
मुंब्रा–दिवा रेल्वे मार्गावरील घटना मन सुन्न करणारी आहे, असे म्हणत मंत्री आशिष शेलार यांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून या घटनेत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शहरांबद्दल बोललेल्या गोष्टींना आपल्याकडे किंमत नाही. आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे हेच या समजेनासे झाले आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंब्रा-दिवा रेल्वे अपघातावर संताप व्यक्त केला. सोमवार, ९ जून रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघातामुळे संपूर्ण राज्य हळहळत असताना आता या अपघातातील मृत आणि जखमी व्यक्तींची नावे पुढे आली आहेत. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत.
मुंबई लोकलच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान सोमवार, ९ जून रोजी सकाळी ८:४५ च्या आसपास ट्रेनचा भीषण अपघात झाला. यामध्ये चालत्या ट्रेनमधून बाहेर पडून चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन ट्रेनमधील प्रवाशांची टक्कर होऊन झाला आहे.
मुंब्रा स्थानकदरम्यान घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर सर्वाच स्तरांतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईकरांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. आपली रोजीरोटी ही महत्त्वाची आहेच. पण, त्याचवेळी आपल्या घरातील मंडळी आपली वाट पाहत असते हेसुद्धा महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.
विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी नवीन आरक्षण आणि अधिवास नियम लागू करून स्थानिक लोकांना एक भेट दिली आहे. आता स्थानिक लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण मिळेल आणि लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदांमध्ये एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
उद्या जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागल्या तरी भाजप आणि महायूती तयार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सोमवार, २ जून रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने काही तास विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून लोकल सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे.
Vibha Guidance Hub तर्फे आयोजित VGH महा एक्झिबिशन 2025 हा बहुआयामी सामाजिक उपक्रम दिनांक 29 मे ते 1 जून 2025 दरम्यान IES अश्लेन शाळा, डी. एस. बाब्रेकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – 400028 (कॅटरिंग कॉलेजच्या मागे, शिवाजी पार्क टेलिफोन एक्सचेंजजवळ) येथे सकाळी 11 ते सायंकाळी 8 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. राज्यातील विविध भागांत गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मुंबईतील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली असून ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे.
सोमवारी सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा मुंबईतील रेल्वे सेवेला जोरदार फटका बसला आहे. विशेषत: मध्य रेल्वेवरील वाहतूक काही काळ खोळंबली असून लोकल रेल्वे गाड्या उशीराने धावत आहेत. पावसामुळे तिन्ही लाईन्सवरील रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायूतीतच लढायच्या ही भाजपची भूमिका आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शनिवार, २४ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
(Jyoti Malhotra) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये ज्योतीने चारवेळा मुंबई दौरा केल्याची खळबळजनक बाब तपासातून समोर आली आहे. याचदरम्यान मुंबईत ज्योती नेमकं कुठे-कुठे फिरली, या दौऱ्यामागे नेमकं काय कारण होतं, याचा तपासयंत्रणाकडून शोध सुरु आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असून या निवडणूका महायूती एकत्रित लढणार की, वेगवेगळ्या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
र्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचा आदेश, मंगळवार दि. ६ मे रोजी दिला आहे. न्यायालयाने इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणासंहित निवडणूका घेण्याचे निर्देश महाराष्ट्र निवडणूक आयोगाला राहुल रमेश वाघ विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्याच्या सुनावणी दरमान्य दिले आहेत.