श्रीकृष्णाविषयी अश्लील मजकूर असलेल्या फेसबुक पोस्टविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी निष्काळजीपणे बंद केल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना तीव्र शब्दांत फटकारले आहे. न्यायमूर्ती के. मुरली शंकर यांनी धार्मिक व्यक्तिमत्त्वांचे चित्रण संवेदनशीलतेने करण्याची गरज अधोरेखित करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत असा इशारा दिला.
Read More
झारखंडचे माजी मुख्यमंत्री यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. शिबू सोरेन यांनी झारखंडच्या राजकारणात जवळपास पाच दशके समर्पित भावनेने कार्य केले, अशा शब्दात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शोक व्यक्त केला.
आदीवासी आणि ग्रामीण भागात व्यसनधीनतेचे प्रमाण वाढत आहे. तरूण पिढीमध्ये देखील व्यसनधीनतेचे प्रमाण अधिक आहे असे दिसून येत आहे. तरूण पिढीला व्यसन लागूच नये याकरिता शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात जनजागृती केली पाहिजे. तरूण या व्यसनधीनतेकडे वळले आहेत. त्यांचा आजार समजून घेऊन त्यांना त्यातून बाहेर काढले पाहिजे, असे मत डॉ. कृष्णा भावले यांनी व्यक्त केले.
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सोमवार, दि. २८ जूलै रोजी, सकाळी ११:३० वाजता राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत महायुतीतील मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भातील मागण्या घेऊन ठाकरे गटाचे नेते राजभवनावर दाखल झाले होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह सुषमा अंधारेही उपस्थित होत्या.
मागील लेखात बिहारमधील मुजफ्फरपूरच्या वृद्धाच्या मृत्यूचे कारण आपण पाहिले. अनेकांनी अशी उदाहरणे ऐकली असतील वा प्रत्यक्ष पाहिली असतील. वर्तमानपत्रांतून येणार्या गोष्टीच सत्य मानल्याने, वर्तमानपत्रांतून न येणार्या गोष्टींमधील ज्ञानाच्या महान कक्षांकडे आम्ही तोंड फिरवून बसतो.
'सध्याचे युग राष्ट्र आणि धर्माचे आहे. हे सनातनचे युग आहे. जर कोणी सनातनचा नाश करण्याबद्दल बोलत असेल आणि देशात सत्ता मिळवण्याबद्दलही बोलत असेल, तर तसे चालणार नाही.' असे म्हणत कल्कीधामचे मुख्य पुजारी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसतेय. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते.
‘संगीत सौभद्र’ या नाटकामधील ‘कोण तुजसम सांग या मज गुरुराया’ या नाट्यपदामध्ये, गुरू शिष्याची कशी तयारी करून घेतो आणि त्यावर पूर्ण कृपाही कशी करतो, याचे यथार्थ वर्णन आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीही शिष्य तयार झाला की गुरू पूर्ण कृपा करतात, असेच म्हटले. गुरू शिष्याच्या नात्याचा नुकत्याच संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आढावा...
मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार आता मराठीतून पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार आहे. संसदीय राजभाषा समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या भेटीत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
यापुढे १० लाख किमतीपर्यंतच्या विकासाच्या कामांचे महिला सहकारी संस्थांना वाटप करण्याचा शासनाचा विचार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ८ जुलै रोजी विधानसभेत सांगितले.
'अनेक विनाषकारी शक्ती गजवा-ए-हिंद करू पाहतायत, परंतु आपले स्वप्न एकच आहे, भगवा-ए-हिंद!', अशी कडक घोषणा बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी रविवारी केली. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर 'सनातन महाकुंभ'चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्रासाठी आवाज उठवल्याचे दिसून आले.
विठ्ठल रूपाने गोवर्धन पर्वताहून आलेला पांडुरंग कृष्ण आणि उद्धवाने सुरू केलेला नामसंकीर्तन रम्य प्रसंग समस्त वारकर्यांच्या रूपाने डोळ्यासमोर उभा राहतो; त्याचे बीज पांडुरंग विठ्ठल आहे आणि हेच ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन तत्त्वनिष्ठ संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र शासनाचा संतसाहित्यातील सर्वोच्च पुरस्कार ‘ज्ञानोबा तुकोबा पुरस्कारा’ने सन्मानित डॉ. मधुकर रामदास जोशी यांचे आहे. दिल्लीच्या ‘भारतीय इतिहास अनुसंधान परिषद’ (आयसीएचआर) या संस्थेने परवानगी आणि आर्थिक साहाय्य केल्याने त्यांनी हा शोध प्रकल्प पूर्ण
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा ११० वा वर्धापन दिन समारोह शनिवार, ५ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या चर्चगेट प्रांगणातील सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर सभागृहात सकाळी ११.०० हा कार्यक्रम पार पडणार आहे.
बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय मोटार वाहन कायदा, १९८८ (एमव्ही कायदा) अंतर्गत भरपाईसाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने, बुधवार दि.२ जुलै रोजी दिला आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाने याआधी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कलम १६६ अंतर्गत केलेली भरपाईची मागणी फेटाळून लावली होती.
भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा विचार आपल्याला पदोपदी आढळून येतो. याच पारंपरिक विचारांचा, आधुनिक शिक्षण व्यवस्थेसोबत मेळ साधत, भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी भारतातील ४ विद्यापीठांनी एकत्र येऊन, सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्याच्या अंतर्गत भारतीय शिक्षणव्यवस्था, आयुर्वेद, योगा या गोष्टींचा समावेश आहे. या कराराच्या माध्यमातून पतंजली विद्यापीठ, राजा शंकर शाह विद्यापीठ, हेमचंद यादव विद्यापीठ, आणि महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय ही चार विद्यापीठं एकत्र आलेली आहेत. पतंजली विद्यापीठाचे
कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत, समाजाचे आपण देणे लागतो, या निस्वार्थ भावनेने समाजसेवेसाठी कायम धडपडणार्या मंगला बाळकृष्ण काकड यांच्याविषयी...
पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि तिचे संस्थापक बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला फौजदारी खटला उत्तराखंड उच्च न्यायालयाने, शनिवार, दि.१५ जून रोजी रद्द केला आहे. औषध आणि जादूई उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) प्रतिबंधक कायदा, १९५४ च्या कलम ३, ४ आणि ७ अंतर्गत या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
अवघ्या नवव्या वर्षी छत्रपती शिवरायांचा रोमांचक इतिहास, ‘पोवाडा’ सादरीकरणातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यां पोहोचविणार्या शिवकन्या कृष्णाई फोंडकेविषयी...
(Chinmoy Krishna Das Arrested) बांगलादेशमधील चितगाव न्यायालयाने इस्कॉन प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. सहाय्यक सरकारी वकील सैफुल इस्लाम उर्फ अलिफ यांच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाच्या आवाराबाहेर अलिफ यांची हत्या करण्यात आली होती.
दहशतवादी तहव्वूर राणाच्या ‘एनआयए’ कोठडीत वाढ
(Governor inaugurates refurbished Aditya Jyot Eye Hospital) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी वडाळा, मुंबई येथील नव्याने अद्ययावत करण्यात आलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यावेळी आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. एस. नटराजन, डॉ. अग्रवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अग्रवाल, मुख्य धोरण अधिकारी डॉ. वंदना जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे डॉ
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एप्रिल १९६५ मध्ये प्रथमच रुईया महाविद्यालय परिसरात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. जी भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशा देणारी होती. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने त्याच ऐतिहासिक स्थळी, त्याच दिवशी, साठ वर्षांनी, २२ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव’ आयोजन करण्यात आले होते.
भारतीय राष्ट्रदर्शन विकसित होण्यासाठी किमान १५ ते २० हजार वर्षे लागली. त्यामुळे आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. पाश्चात्य देशांच्या ’नेशन’ या संकल्पनेशी भारताच्या ’राष्ट्र’ या संकल्पनेची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, आपल्याकडे बहुराष्ट्रवाद नाही. आपल्या संस्कृतीत एकतेचा संदेश आहे. आपण भूमीला ’माता’ मानतो. त्यामुळे ’नेशन’ आणि ’राष्ट्र’ या भिन्न संकल्पना आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केले. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल रोजीदरम्यान आयोजित
प्रामाणिकपणे कर भरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य असून कर भरणे ही समाजसेवा आहे, त्यामुळे सर्वांनी अवश्य कर भरायला हवा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवार, १० एप्रिल रोजी केले.
MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले आहे
Kapil Krishna Mandal arrested बांगलादेशात हिंदूंवर अन्याय अत्याचार सुरूच आहेत. बांगलादेशात विश्व हिंदू परिषदेचे महासचिव कपिल कृष्ण मंडल यांना पोलिसांनी शनिवारी १५ मार्च २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास अटक केली. त्यांच्यावर राजद्रोह आणि देशद्रोहाविरोधात गंभीर आरोप लावण्यात आला आहे.
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. नाशिकमधील स्थानिक नागरिकांनी कृष्णा आंधळेला पाहिल्याचा दावा केला आहे.
मनसेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, राज ठाकरेंनी मार्गदर्शन कमी आणि कुंभमेळ्याची टिंगलटवाळीच जास्त केली. “बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून गंगेचे पाणी कमंडलूमधून आणले, तेव्हा मी हड ते पाणी कोण पिणार म्हणून नाकारले,” असे ठाकरे म्हणाले. “तिथे स्नान करताना अनेक जण अंग खाजवतात,” असेही राज म्हणाले. थोडक्यात, गंगेचे पाणी अशुद्ध असून ते पाणी कोण पिणार, असा त्यांचा आक्षेप होता. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान’च्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधनही केले आहे ते जरी वाचले असते, तरी राज यांना
महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंतीचे राज्य असून सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित राज्य घडवण्यासाठी राज्य शासन काम करत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आपल्या अभिभाषणात केले.
गीता केवळ श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले शाब्दिक तत्त्वज्ञान नसून, जीवनातील अनंत गूढ तत्त्वांचे ज्ञान प्राप्त करून, प्रत्यक्ष जीवन जगण्याचे एक महान दिव्य शास्त्र आहे. यादृष्टीने हे महनीय शास्त्र जगासमोर आल्यास, सर्व जगच या महान ग्रंथाकडे मानवी जीवनाकरिता एक आवश्यक संहिता म्हणून बघेल. यामुळे भगवद्गीता केवळ हिंदूंचा धार्मिक ग्रंथ न राहता, अखिल विश्वाचा जीवन ग्रंथ बनेल.
वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस? असा सवाल करत बीडमधील एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून पीडित तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राणी एलिझाबेथ द्वितीय आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात धाकटे सुपुत्र तसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिन्स एडवर्ड यांनी राजभवनातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा वास्तूंना भेट दिली.
तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे यांनी मंगळवार, २२ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे झालेल्या शपथविधी समारंभात न्या. आलोक आराधे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
वरिष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवार, १८ जानेवारी रोजी केले.
Dwarka गुजरातमधील देवभूमी द्वारकामध्ये राज्य सरकारने पुन्हा एकदा बुलडोझरची कारवाई केली आहे. किनारपट्टी भागातील शेकडो एकर जमीन ही सरकारी मालमत्तेची आहे. एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत असणारी घरे व इतर धार्मिक आणि व्यावसायिक वास्तू उभारण्यात आल्या आहेत. आता ही बांधकामे हटवण्यात आली असून पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
(Krishna Andhale) बीड मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. याचदरम्यान संतोष देशमुखांच्या भावाकडून लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Shri Dasganu Maharaj भारतीय (हिंदु) संस्कृती व इतिहास परंपरेत कीर्तन परंपरेचे अनन्यसाधरण महत्त्व होते, आहे व राहणार आहे. या किर्तन परंपरेचे महत्व भारतीय जनमानसाच्या मुळाशी रुजलेले आहे. परंपरेनुसार कीर्तनाचे आद्य प्रवर्तक हे देवऋषी श्री नारदमहर्षि यांना मानले जाते. कीर्तनाचा उल्लेख श्रीमद्भागवतात भक्त प्रल्हादाच्या चरित्रात येतो तो ही हिरण्यकश्यपू प्रल्हादास विचारतो की, तू गुरुकडुन काय शिकलास तेंव्हा भक्त प्रल्हाद सांगतात नऊ प्रकारची भक्ती शिकली असे सांगताना भागवतातील हा श्लोक
Chinmay Krishna Das Prabhu बांगलादेशात सत्तापालटानंतर हिंदूंवरील अन्याय अत्याचार थांबायचे नाव घेत नाहीत. बांगलादेशात सध्या मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आहे. काही दिवसांआधी बांगलादेशातील सरकारने इस्कॉन टेंपलचे साधू चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना चितगाव येथील न्यायालयाने जामीन नाकारला. चिन्मय कृष्ण दास प्रभू हे चितगाव येथील पुंडरिक धामचे प्रमुख आहेत.
मुंबई : जे आमचे आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे, अशी भावना मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी व्यक्त केली. रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर वरळी येथे आयोजित आरंभ गर्जना सोहळा धार्मिक विधीला ते उपस्थित होते.
Devendra Fadnavis राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे होते. जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दि. डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम कृष्णा ( S. M. Krishna ) यांचे मंगळवारी (१० डिसेंबर) रोजी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ९२व्या वर्षी बंगळुरू येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. एस. एम. कृष्णा हे कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रमंत्रीदेखील होते.
आज गीताजयंती. गीतेतील उपदेश जरी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धाच्या वेळी केलेला असला, तरी आपल्या प्रत्येकाला तो पावलोपावली उपयोगी पडत असतो. आज पाच हजार वर्षे उलटून गेल्यानंतरही भगवद्गीतेचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट ते अधिक वाढतच आहे. गीतेच्या प्रचार-प्रसारार्थ काम करणार्या संस्थांचे या सगळ्यात मोठे योगदान आहे. अशाच संस्थांपैकी एक म्हणजे पुण्यातील ‘गीताधर्म मंडळ.’ गेली 100 वर्षे कार्यरत असणार्या या मंडळाच्या कार्याचा ‘गीताजयंती’च्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.
बांगलादेश मध्ये अल्पसंख्यांक हिंदू समाजावर सुरू असलेले अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. या अत्याचाराच्या विरोधात भारतात जागोजागी निदर्शनं सुरू आहेत. अशातच आता भारताने चर्चेच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजी धाका येथे पोहोचले असून भारत आणि बांगलादेश यांच्या मध्ये द्विपक्षीय बैठक होणार असल्याची चर्चा आहे.
(Ajit Pawar) महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आहे. या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषविण्याचा नवा विक्रम रचला आहे. ते पुन्हा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. त्यांना राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली आहे.
शेख हसीना यांचे सरकार उलथवल्यापासून ते आजतागायत बांगलादेशातील हिंदू जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यात ‘इस्कॉन’च्या चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपांखाली झालेली अटक, त्यांना जामीन मिळू नये म्हणून केलेली कायदेशीर कोंडी, यावरुन बांगलादेशमधील हिंदूंची विदारक परिस्थिती समोर यावी. त्यामुळे अमेरिकी ‘डीप स्टेट’चे हस्तक असलेल्या युनूस राजवटीत बांगलादेशी हिंदूंचे भय संपण्याची चिन्हे नाहीत.
नुकतीच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, लवकरच भाजप-महायुती राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करणार असून गुरूवार, ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल.
(Bangladeshi Hindus) बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने होत असलेले हल्ले तसेच बांगलादेशातील हिंदू धर्मगुरु इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांना झालेली अटक या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेतील राज्य विभागाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांबाबत मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी धार्मिक आणि मूलभूत मानवी हक्कांसह मूलभूत स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन केले.
बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराचे नवे अध्याय दिवसेंदिवस रचले जात आहेत. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेशमध्ये अटक करण्यात आलेले आणि देशद्रोहाचा आरोप असलेले ईसकॉनचे पुजारी चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांच्या जामिनाची सुनावणी पुढीच्या महिन्यावर ढकल्याणात आली आहे. ३ डिसेंबर रोजी, म्हणजेच मंगळवारी झालेल्या सुनावणीसाठी कोर्टात कोणताही वकील हजर न राहिल्याने हा निर्णय घेतल्याची माध्यमांना मिळाली आहे.
पर्यावरण बदल तसेच जैवविविधता व नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासाची झळ विशेषतः लहान मुलांना बसेल, असे युनिसेफच्या अहवालात म्हटले असून या दृष्टीने राज्याने आरोग्य सेवा, शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण, नोकरीच्या समन्यायी संधी निर्माण करणे आणि तंत्रज्ञान उपलब्धतेतील तफावत कमी करणे आदी क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी येथे केले. सोमवार, २ डिसेंबर रोजी राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते युनिसेफच्या 'स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट - २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य
मुंबई : बांगलादेशमधील हिंदू धर्मगुरू इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांचा खटला लढणारे वकील ( Lawyer ) अॅड. रेमण रॉय यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात वकील रेमण रॉयगंभीर जखमी झाले असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी आपल्या सोशल मिडियावरून याबाबत प्राथमिक माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार चिन्मय कृष्ण दास यांना कायदेशीर संरक्षण देणे ही त्यांची एक चूक झाली ज्यामुळे रेमण रॉय यांच्यावर ही वेळ आली.
मुंबई : “आपल्या राज्य स्थापनेपासून नागालँड व आसाम या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती व पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. दोन्ही राज्यांना निसर्ग संपदेचे वरदान लाभले आहे. देशातील राज्ये समजून घेण्यासाठी त्या-त्या राज्यांना प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे. तसेच तेथील संस्कृती लोकांमध्ये राहून समजून घेतली पाहिजे. नागालँड व आसाम राज्यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद वाढवल्यास राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल. यास्तव नागरिकांनी उभय राज्यांना भेट द्यावी,” असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ( Ra