(Raj Thackeray) राज्यात सुरु असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान पाहायला मिळाले. दरम्यान, गुरुवारी १७ जुलैला विधीमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये 'काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?' असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
Read More
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आता पडळकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दखल झाल्याची माहिती पुढे आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमधील राड्यानंतर विधान भवनातील प्रवेश पासच्या मुद्यावरून विधानपरिषदेत जोरदार खडाजंगी झाली. उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान भवनात प्रवेशासाठी पैसे घेऊन पास दिले जातात, असा आरोप केला. त्यावर आक्षेप घेत मंत्री शंभूराज देसाई यांनी पुरावे सादर करण्यास सांगितले.
विधानभवनात गुरुवारी झालेल्या हाणामारीच्या गंभीर घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर निर्णय घेतला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर विधान भवन परिसरात आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेल्या सर्जेराव टकले यांची चौकशी करून, त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाची (हक्कभंग) कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द केले आहे. तसेच या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नार्वेकर यांनी शुक्रवारी दिली.
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवार, १७ जुलै रोजी विधानभवनात तुफान हाणामारी झाली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे राजकीय पडसाद उमटले.
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात गुरुवार, १७ जुलै रोजी तुफान हाणामारी झाली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू असताना आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राजीनामा पाहिलेला नाही असे त्या म्हणाल्या.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या असताना आता जितेंद्र आव्हाड यांनी त्या फेटाळून लावल्या आहेत. जयंत पाटील हेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव आहे. त्यांनी परराष्ट्र धोरणावर राज्याच्या विधानभवनात नौटंकी करण्याऐवजी लोकसभेच्या अधिवेशनात त्यांच्या खासदारांनी परराष्ट्र मंत्र्यांसमोर बेड्या घालून करावी असा टोला राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लगावला.
ज्या बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते त्यातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नसल्याचा अजब दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Saif Ali Khan बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तपास सुरु असतानाच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या हल्ल्यामध्ये सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा थोरला मुलगा तैमूरचाच बळी जाणार होता, असा खळबळजनक दावा केला आहे. तैमूर नावावरुन त्याला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही आमदार आव्हाड यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपानंतर राजकीय वर्तुळामधून आव्हाडांवर टीका होत असल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई : जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरे ( Rupali Thombre ) यांच्या विरोधात बीडमधील संभाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्यावर तक्रार करण्यात आली आहे. यावर रुपाली ठोंबरे यांनी पलटवार केला आहे. "हे चॅट आव्हाडांचेच आहेत आणि सोशल मीडिया काय न्यायालय नाही. माझ्यावर याआधी ३२ गुन्हे दाखल आहेत आणि आता हा ३३वा.." असे म्हणत ठोंबरेंनी आपले कृत्य योग्य असल्याचे सांगितले.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह शरद पवार ( Sharad Pawar ) गटाचा सुपडासाफ झाला. त्याचे खापर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर फोडले जात असून, त्यांचे पक्षातील महत्त्व कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांची गटनेते पदी झालेली निवड हे त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवार भाकरी फिरवणार, अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
ठाणे : “जितेंद्र आव्हाड ( Jitendra Avhad ) यांना वाटत असेल की, ईव्हीएम मशीन हॅक होते आहे, तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणुकीला सामोरे जावे,” असे खडेबोल राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सुनावले. बॅलेट पेपरवर महाराष्ट्रातील पहिली निवडणूक मुंब्रा-कळवा विधानसभेमध्ये घेऊ. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असा टोलाही त्यांनी आव्हाड यांना लगावला.
( Jitendra Awhad )राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर या आणि यांसारख्या अनेक महान व्यक्तींबद्दल अवमानकारक वक्तव्यं आव्हाडांच्या मुखातून बाहेर पडली आहेत.
( Amol Mitkari on Jitendra Awhad ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यात अजित पवारांवर गरळ ओकत खालच्या भाषेत टीका केली होती. या टीकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
( Jitendra Awhad on Ajit Pawar) ठाण्यातील चंदननगर मुंब्रा येथे आयोजित एका जाहीर सभेला संबोधित करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान बोलत असताना अजित पवार गट हा पाकिटमारांची टोळी आहे, असे आव्हाड म्हणाले. तसेच अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर स्वतःचा वेगळा पक्ष काढून नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी, असे म्हणत अजित पवारांवर हल्लाबोल केला.
( Pravin Darekar on Jitendra Awhad ) राष्ट्रवादी काँग्रसचे शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते यावर प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. अशातच आव्हाडांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी जहरी टीका केली आहे.
( Kalwa Mumbra Assembly Constituency ) कळवा - मुंब्रा विधानसभेमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नजीब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच शनिवारी दि. २६ ऑक्टोबर कळवा येथे महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला बाहेरगावी असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. या निवडणुकीमध्ये नजीब मुल्लाच विजयी होतील आणि निवडणुकीत कळवा मुंब्र्याचा रावण आम्हीच दहन करू असा इशारावजा दावा राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.
(Jitendra awhad) बंगल्यावर अभियंत्याला नेऊन बेदम मारणे, चित्रपटगृहात शो बंद पाडून प्रेक्षकाला बदडणे, महिलेचा विनयभंग करणे, असे नाना कारनामे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 22 जणांवर खोट्या गुन्ह्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी आ. आव्हाडांची अक्षरशः पळापळ सुरू आहे. अटक टाळण्यासाठी आव्हाडांनी ठाणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी न्यायालयात झालेल्या सुनावणीत दि. 3 ऑक्टोबर ही
”हे व्यासपिठ काय राजकीय होत का? मागास समाजाच्या महापुरूषांबद्दल तुम्हाला तिरस्कार वाटतो म्हणूनच मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला आणि आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंती आनंदाच्या दिवशी तुम्ही काळा शर्ट घालून मुद्दाम आलात.
अभियंत्याला बंगल्यावर नेऊन बेदम मारणे, चित्रपटगृहात शो बंद पाडून प्रेक्षकाला बदडणे, महिलेचा विनयभंग करणे, असे नाना कारनामे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांना खोट्या गुन्ह्याचा कट रचणे चांगलेच भोवले आहे.
पब्लिसिटी हेच जितेंद्र आव्हाडांचं अंतिम ध्येय आहे, असा घणाघात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. महाड येथे मनुस्मृतीला विरोध करताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. यावरून आता प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली.
ज्या जागेवर विजय वडेट्टीवार निवडून येतात तिथेसुद्धा आता महायूतीचे लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत. त्यामुळे वडेट्टीवारांनी ४ जूननंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. त्यांनी शुक्रवारी शिर्डीमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या कृत्यानंतर छगन भुजबळांनी जे केलं ते पार दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. या परिस्थितीत भुजबळांनी त्यांना खडेबोल सुनावले पाहिजे होते, असे ते म्हणाले. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडून आ. जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप अनुसूचित जाती मोर्चा, मुंबई आक्रमक झाली आहे. आव्हाड यांच्या विरोधात त्वरीत गुन्हा नोंदविण्याची मागणी पंतनगर पोलीस ठाण्यात भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच, आव्हाड यांना अटक झाली नाही तर भाजप अनुसूचित जाती मोर्चा मुंबई व महाराष्ट्राच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे अपघात प्रकरणी अजितदादांनी पोलीस आयुक्तांना फोन करुन सक्त कायदेशीर कारवाईचे, राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिले असतानाही जितेंद्र आव्हाड यांना स्वप्नात अजितदादाच दिसतात, कायम एका द्वेषाने ते अजितदादांबद्दल बोलत असतात.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा आव्हाडांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधींपेक्षा काँग्रेस नेते राहूल गांधी जास्त चालतात, असे वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या जागांची चर्चा करण्यासाठी नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. शिवसेना-भाजप युती असताना दिल्लीचे मोठे नेते चर्चा करायला येत होते आणि आता पटोले आणि आव्हाडांसारखे राज्यातले नेते जातात. यावरून ठाकरेंनी विचार करावा आपण कुठे आहोत? असा टोला मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
१ जुलै २०२० रोजी आषाढी एकादशीचे निमित्त तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाडांनी लिहले होते की, साहेबांबद्दल समज-गैरसमज खूप पसरवले गेले. स्पेशली कुजबुज मोहीम आणि मीडियाने त्यांना प्रचंड बदनाम केले असल्याचे आव्हाडांनी म्हटले होतं. पुढे आव्हाड म्हणतात की, मागील ५० वर्षांपासून जे काम साहेबांनी या देशासाठी, राज्यासाठी, राज्यातील महिलांसाठी केले आहे, ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते.
प्रभू श्रीरामांविषयी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य मुर्खपणाचे होते, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ५ जानेवारी रोजी व्यक्त केले. ‘बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ...’, अशाप्रकारचा त्यांचा स्वभाव आहे, असेही फडणवीस म्हणाले.
राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता अस वादग्रस्त विधान केल्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठीकठीकाणी आंदोलने केली जात आहेत. यामूळे हिंदूंच्या भावना दूखावल्या गेल्याने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महाराष्ट्रात निदर्शने केली जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट)चे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले होते. या शिबिरात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उद्धाटनावर बोलताना एक वादग्रस्त विधान केले. त्यानंतर देशभरातून साधू-मंहतांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच अयोध्येचे महाराज श्री. आचार्य पुरुषोत्तम दास यांनी आव्हाडांवर टीका केली आहे.
राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. रामाने १४ वर्ष वनवास भोगला, मग शाकाहारी कसा असेल? असा सवाल करत जितेंद्र आव्हाडांनी दि. ३ जानेवारी रोजी वादग्रस्त विधान केले. त्यानंतर देशभरातून साधू-मंहतांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यात आता आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांना नेहमीच शेण खायची सवय आहे.. परंतु त्यांनी शेण खाताना दुसऱ्याच्या कामाची ही माती केली आहे.. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे. आव्हाडांच्या भूमिकेला त्यांचं समर्थन आहे का? असा सव
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट)चे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले होते. या शिबिरात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उद्धाटनावर बोलताना एक वादग्रस्त विधान केले आहे. आव्हाड म्हणाले की, राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. शिकार करून खाणार राम आमचा आहे. आज सगळे आम्हाला शाकाहारी बनवायला जातात पण आम्ही रामाचा आदर्श पाळतोय. त्यामुळे राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. रामाने १४ वर्ष वनवास भोगला, मग शाकाहारी कसा असेल? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर आता सर्वत्र संतप्त प्रतिक्रिय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात ट्विटवॉर पाहायला मिळाले. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला होता. त्यास जितेंद्र आव्हाडांनी Xवर पोस्ट करत माझ्यावर दर वेळेस वयक्तिक टीका कश्यासाठी? अशी विचारणा केली आहे.
ठाण्यातील विकासक सुरज परमार आत्महत्या प्रकरणी कोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात ? अभियंता अनंत करमुसे यांना पोलीस संरक्षणात मारहाण करण्याचा बालिशपणा का केलात ? अंगरक्षक वैभव कदमच्या आत्महत्येस जबाबदार कोण ?...डॉ. जितेंद्र आव्हाड या तीन प्रश्नांची उत्तरे द्या, असे जाहीर आव्हान राष्ट्र्वादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी जाहिर पत्रकार परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांना दिले.
आंदोलने करायला शरद पवार आणि जयंत पाटील यांनी कधी सांगितले नाही. स्वतःच्या हिमतीवर १९८० पासुन आंदोलने करीत असुन तेव्हा मी कुठल्याही राजकिय पक्षात नव्हतो. अशी आत्मप्रौढी आ. जितेंद्र आव्हाड यांनी मिरवली आहे. राष्ट्रवादी कुणाची या सुनावणीवर अजितदादा पवार यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड ठाण्यात बरळले.
जितेंद्र आव्हाडांनी पक्षासाठी काय केले? तुमच्या कार्यशैलीला कंटाळून पालघर आणि ठाण्यातील कार्यकर्ते सोडून गेले. असा पलटवार अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत दिला आहे. "शरद पवारांनी घामाचा एक-एक थेंबच नाही रक्त आटवून पक्ष वाढवला, पक्षाचा विस्तार केला. 2004 मध्ये तोंडातून रक्त वाहत असताना शरद पवार प्रचाराला फिरले. मांडीचे हाड मोडलेले असतानाही त्यांनी पक्षाचे काम थांबवले नाही. याला म्हणतात पक्षासाठी जीव आणि प्राण देणे. अजित पवारांनी आज
आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनाही समाजाच्या रोषाचा फटका सहन करावा लागला आहे. मराठा समाजातर्फे राबविण्यात येत असलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड हे पोलीस ठाण्यातील विश्रामगृहावर पोहोचले होते.
"हिंदू धर्मातले जे अतिरेकी होते ज्यांना वर्ग व्यवस्था, वर्ण व्यवस्था हवी होती, त्यांनीच हे केलं. हिंदू धर्म आम्हाला माहिती नाही. पण सनातन धर्म हा कसा जन्माला आला? सनातनी व्यवस्थेला आमचा विरोधच आहे. हिंदू धर्मातले जे अतिरेकी होते. ज्यांना वर्ग, वर्ण व्यवस्था हवी होती. परत एकदा वर्ग आणि वर्ण व्यवस्था आणण्याचा यांचा विचार आहे." अशी गरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ओकली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते, ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांची, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी व महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नजीब मुल्ला यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.
कळवा पूर्व येथील लोकांकडून स्थानिक लोकप्रतिनिधीचे १६ गुंड दर महिन्याला ३० ते ४० लाखाची खंडणी गोळा करतात, अशी माहिती पोलिसांनीच दिल्याचा भंडाफोड राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच येत्या शुक्रवारी कळवा पूर्वेकडील लोकांसाठी आव्हाडांनी हंडा मोर्चाचा फार्स ठेवला आहे. त्याची चिरफाडच एकप्रकारे मुल्ला यांनी केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद पराजपे, प्रकाश बर्डे, युवक काँग्रेस अध्यक्ष विरु वाघमारे आदी उपस्थित होते.
२०१४ चे विधानसभेचे निकाल येत असताना सिल्व्हर ओकच्या बाहेर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल, तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बिनशर्त पाठिंबा असल्याची घोषणा का केली होती, यामागची कारणे डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला सांगावे, असे उघड आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, पालघर व ठाणे समन्वयक आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिले आहे.
ज्या धर्मामुळे देशात जातीवाद आला. ज्या धर्मामुळे स्त्रीयांना अधिकार मिळाला नाही. तो सनातन धर्म असूच शकत नाही. सनातन हा धर्म नाही, तर हिंदू धर्मातील कट्टरतावादी लोकांचा तो गट आहे. त्यामुळे हा नवा शब्द कुठून आला हे मला समजत नाही. आम्ही २००३ पासून सनातनशी लढाई लढतोय. असं शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना आव्हाडांनी हे बेताल वक्तव्य केलं आहे.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या विरोधात एक ट्विट लिहीले होते. यावरुन आण्णा हजारेंनी आव्हाडांनी केलेल्या ट्विटवरुन कोर्टात जाणार असल्याचा इशाराच दिला आहे. 'ह्या माणसाने या देशाचं वाटोळं केलं.. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही' अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. यासोबत त्यांनी अण्णा हजारे यांचा फोटो देखील पोस्ट केला होता.
जातनिहाय जनगणनेवरून मतमतांतरे उमटत असतानाच आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत बहुजनवाद्यांच्या आडुन जातीपातीचे राजकारण सुरु केली आहे. त्यावर नेटकऱ्यानीही " हिंदुमध्ये फुट पाडण्यासाठीच ही टिवटिव असल्याच्या प्रतिक्रिया नोंदवत आव्हाडांना चांगलेच कोलले आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते, पालघर व ठाणे जिल्हा समन्वयक आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला हे गणेश दर्शनासाठी गेले असता कळवा पूर्व येथील, आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पोंडपाडा, भास्कर नगर झोपडपट्टीतील महिलांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याबद्दल स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन आनंद परांजपे व नजीब मुल्ला यांनी येथील जनतेला दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बीडमध्ये आहेत. बीडमध्ये शरद पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. बीडमध्ये शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बॅनर्सही लावण्यात आले होते. या बॅनर्सवरुन जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे.