भारताच्या निवडणुकांमध्ये सातत्याने परकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा अरोप होत असतो. विरोधी पक्षाचे अनेक मुद्दे हे बाहेरून आलेले असल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे. देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याला मिळणारी रसद अमेरिकेच्या ‘युएसएड’ कडून मिळत असल्याचे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने जाहीर केल्याने, अनेकांचे बुरखे फाटले आहेत...
Read More
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यातून विस्तवही जात नाही, हे तसे सर्वश्रूत. यापूर्वीही काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून आला होताच. पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष प. बंगालमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेचा घाट घालणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी विरुद्ध ममता बॅनर्जी या संघर्षाची ठिणगी पडून, प. बंगालमध्ये राजकीय खेला रंगलेला दिसेल.
काँग्रेसी युवराज राहुल गांधी, ठाकरे आणि पवार कंपनीने एकत्र येत, पुन्हा एकदा ‘ईव्हीएम’ तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निकालावर शंका उपस्थित केली. यापूर्वी या तिघांनी वैयक्तिकपणे हेच आरोप वारंवार केले होते आणि कोणीही दखल न घेतल्याने, एकत्र येत त्यांनी ते पुन्हा एकदा त्याच आरोपांचा पाढा वाचला. पण, म्हणतात ना तेरड्याचा रंग तीन दिवस, त्याप्रमाणे मविआच्या असल्या उथळ आरोपांनाही आता जनता गांभीर्याने घेणे नाहीच!
दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सगळ्याच पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात कंबर कसल्याचे बघायाला मिळतं आहे. अशातच आता निवडणुकीच्या प्रचारामुळे एकतेचा बनाव करणाऱ्या इंडी आघाडीची बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासहीत विविध पक्षांनी काँग्रेसने आघाडीचे नेतृत्व सोडावे असा प्रस्ताव घटक पक्षातील नेत्यांच्या समोर ठेवला आहे. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी एका प्रचारसभेत असे म्हटले की राहुल गांधी हे काँग्रेस वाचवण्यासाठी लढत आहेत, पण मी दिल्ली वाचवण्यासाठी लढतो
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडी आघाडी मधील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेत काँग्रेसनेते अजय मकेन यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास काँग्रेस पक्षाला इंडी आघाडीतून काढून टाकण्याचा प्रस्ताव इंडी आघाडीच्या घटक पक्षांकडे करण्यात येईल असे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी एक देश एक निवडणूक या विधेयकाला विरोध दर्शवत, सदर विधेयकाचा निषेध केला आहे. त्याच बरोबर काँग्रेस, त्रुणामूल काँग्रेस, समाजवादी पक्षातील नेत्यांनी सुद्धा या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी एक देश एक विधेयक लोकसभेत सादर केले. सदर विधेयक संसदेसमोर आणल्या नंतर त्यावरील घटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे.
(One Nation One Election Bill) केंद्रातील मोदी सरकारने 'एक देश, एक निवडणूक' या विधेयकाला गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. त्यानंतर मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'एक देश एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर केले आहे. या विधेयकाला लोकसभेत काँग्रेस सहीत इंडी आघाडीनेही विरोध दर्शवल्याचे समोर आले आहे. अशातच एक देश, एक निवडणूक विधेयकाला अखेर 'जेपीसी'कडे (संसदेची संयुक्त समिती) पाठवले जाणार आहे.
मुंबई : संजय राऊत ताठ मानेने सांगायचे, उद्धव ठाकरे ( Uddhav Thacheray ) 'इंडी' आघाडीचे नेतृत्व करतील. पण, विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर 'इंडी' आघाडीची उद्धव ठाकरेंवरील 'ममता' आटली आटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच की काय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनी या आघाडीची कमान हाती घेण्याची भाषा करीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वगुणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
(Indi Alliance) संसदेत सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आता उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांच्याविरोधात काँग्रेसप्रणित इंडी आघाडीने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. अविश्वास प्रस्ताव राज्यसभेच्या महासचिवांकडे मंगळवारी दुपारी सादर करण्यात आला असून त्यावर ६० सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(Maharashtra-Karnataka Border Dispute) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. सध्या बेळगावात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केलेले असताना कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत संबंधित परिसरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची ही गळचेपी असल्याचा आरोप मराठी एकीकरण
(Jharkhand) झारखंडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मिळालेल्या विजयानंतर भाजप समर्थकांना धमक्या येत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच झारखंडमधील साहिबगंज मोहम्मदपुर गावातील भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम तरुणाला त्याच्याच समाजातील लोकांकडून गावातून हाकलून देण्याची आणि जीवेमारण्याची धमकी दिली आहे.
देशातील ७ राज्यांमधील १३ विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून इंडी आघाडीतील घटकपक्षांना १०, भाजपला २ तर एका जागी अपक्ष उमेदवारास विजय मिळाला आहे. बिहारमधील रुपौली मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेण्यावरुन राजकीय वर्तुळात टिका-टिप्पणी होत आहे. या जागेवरून काँग्रेसने प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपने काँग्रेसच्या या निर्णयावर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की हा पक्ष घराणेशाहीला प्रोत्साहन देत आहे.
आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी काँग्रेसप्रणित इंडी आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार याने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे.
लोकसभा निवडणूक निकालानंतर इंडी आघाडीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता पुन्हा एकदा इंडी आघाडी फुटण्याची शक्यता असून काँग्रेसने आघाडी करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, दिल्लीनंतर आता हरियाणामध्ये आप आणि काँग्रेसमधील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत काँग्रेस-आप या आघाडीला सपशेल अपयश आल्याचे दिसून आले आहे.
राजकीय अस्पृश्यतेमुळे ज्या भाजपबरोबर आघाडी करण्यासाठी, सहयोगी मिळत नव्हते, त्याच भाजपने आघाडींची सरकारे देखील आपला कार्यकाळ यशस्वी करतात, हा विश्वास देशाला दिला. गेले दशक बहुमताला कौल दिल्यानंतर, जनतेने पुन्हा एकदा आघाडीला कौल दिला आहे. आज याच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा शपथविधी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर रालोआच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा मांडलेला हा लेखाजोखा...
देशातील जनतेने भाजप सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात कौल दिला असून फॅसिस्ट शक्तीविरोधातील लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडी आघाडीच्या बैठकीनंतर बुधवारी रात्री केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसप्रणित इंडी आघाडीस अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त झाल्याने त्यांचा हुरूप वाढला आहे.
काँग्रेस पक्षाने यंदाच्या निवडणुकीमध्ये देशाला नवी दृष्टी दिली आहे. त्याचप्रमाणे पुढील वाटचाल काय असेल, याचा निर्णय इंडी आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा करून घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ०४ जूनला जाहीर होणार असून तत्पूर्वी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार एनडीएला देशात तिसऱ्यांदा बहुमत मिळणार आहे. याच एक्झिट पोल अंदाजावर उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राऊत म्हणाले, इंडिया आघाडीला २९५ ते ३१० जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) जवळपास ३६० हून अधिक जागांसह पुन्हा सत्तेत येत असून काँग्रेसप्रणित इंडी आघाडीस सुमारे १५० जागा मिळतील, असे अंदाज लोकसभा निवडणुकीनंतरच्या मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) दिसून आले आहेत.
काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीस २९५ हून अधिक जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान शनिवारी संपले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी ‘इंडी’ आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.
‘अबकी बार ४०० पार’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका घोषणेभोवती यंदाची लोकसभा निवडणूक केंद्रित दिसली. या घोषणेमुळे भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हत्तीचे बळ संचारले, तर दुसरीकडे विरोधकांची अवस्था आणखीन केविलवाणी झाली. सातही टप्प्यातील मतदान पार पडले असून, ‘एक्झिट पोल’चाही कल रालोआकडेच झुकलेला दिसतो. त्यानिमित्ताने २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील ठळक प्रचाराचे मुद्दे, भाजपची सरशी आणि ‘इंडी’ आघाडीची पिछाडी यांचा ऊहापोह करणारा हा लेख...
लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार केंद्रात सत्ता स्थापन करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता यासंदर्भात संकेत दिले आहेत. ते म्हणाले, नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख जवळपास निश्चित करण्यात आली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडी आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. देशभरात काँग्रेस ४० आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला (सपा) ४ जागा मिळणेही अवघड आहे, असे भाकीत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर, सलेमपूर आणि चंदौली येथे प्रचारसभांना संबोधित केले.
“ ‘इंडी’ आघाडी सत्तेत आल्यास, भारत आणि पाकिस्तानची सीमा खुली करण्यात येईल,” असे आश्वासनच पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी पंजाबवासीयांना दिले. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. चरणजीत चन्नी हे जालंधरमधून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
''इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही. अखिलेश यादव आणि काँग्रेस हे शेवटचे मित्रपक्ष राहिले होते, माझ्या माहितीप्रमाणे दोघेही वेगळे झाले आहेत. तसे होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. पण सत्य परिस्थिती हीच आहे'', असे खोचक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांसमोर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी (बसपा) अध्यक्षा मायावतींनी आपली भूमिका जाहीर करत इंडी आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना म्हणाल्या, आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर जाहीर करत आघाडीला जोरदार दणका दिला आहे. त्या पुढे म्हणाल्या, युती केल्याने मतांचे वर्गीकरण होत नाही, त्यामुळे आम्ही कोणाशीही युती करणार नसल्याचे मायावती यांनी यावेळी स्पष्ट केले. आपल्या वाढदिवसाच्या दिनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात भाष्य केले आहे.
बुधवारी होणारी 'इंडी' आघाडीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ही बैठक पुढे ढकलण्याची कारणं सांगितली आहे. काही व्यक्तींच्या व्यक्तीगत समस्यांमुळे बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.