(IMEC SUMMIT 2025) "एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था हे लक्ष्य ठेवून महाराष्ट्र प्रगती करत आहे. भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी (आयमॅक) महाराष्ट्र पूर्णपणे सुसज्ज आहे. शिवाय पायाभूत सुविधांची कामे ही प्रामुख्याने प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आयमॅक केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर यात सहभागी सर्वच राष्ट्रांसाठी गेमचेंजर ठरेल", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत सुरू असलेल्या दोन दिवसीय 'आयमॅक समीट २०२५'च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
Read More
सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी Mumbai Police सज्ज!
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्यावर जाणार असून, ट्रम्प यांच्या दुसर्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. या दौर्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय भागीदारीची सखोल चर्चा होऊ शकते. तसेच भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोर’वरही मुक्त चर्चाही या दौर्यात अपेक्षित आहे.
सध्या चित्रपट असो किंवा वेबसीरीज भयपट आणि हॉरर कॉमेडी कलाकृतींना प्रेक्षक विशेष पसंती देताना दिसत आहेत. अशातच आता 'पौर्णिमेचा फेरा’ ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत 'पौर्णिमेचा फेरा' ही हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर ही वेबसिरीज झळकली आहे.
भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (आयएमईसी) भारताच्या सागरी सुरक्षेत आणि युरोप आणि आशियामधील मालाची जलद वाहतूक करण्यास हातभार लावू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी केले. भारतीय उद्योग परिसंघाच्या (सीआयआय) भारत-भूमध्य व्यापार परिषदेत ते बोलत होते.
भारताला थेट युरोपपर्यंत जोडणारा प्रकल्प म्हणून ‘आयएमईसी’कडे पाहावे लागेल. भारतीय मालाच्या निर्यातीला चालना देणारा, लाखो रोजगाराच्या संधी प्रदान करणारा; तसेच प्रदेशातील भारताचे महत्त्व वाढवणारा हा प्रकल्प आहे. विस्तारवादी चीनच्या ‘बीआरआय’ प्रकल्पाला समर्थ पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. अमेरिका, ‘युरोपीय महासंघ’ यात भारताचे भागीदार असणार आहेत.