“रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणारच,” असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. राज्याची राजकीय परिस्थिती आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका आदींवर राणे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी ओंकार देशमुख यांच्याशी आपल्या खास शैलीत साधलेला हा विशेष संवाद...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु येथे प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे. नाणार येथे होणाऱ्या या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारने २०१९ मध्ये हा प्रकल्प नाणारमधून हलवला होता. त्यानंतर राज्यात आलेल्या ठाकरे सरकारने हा प्रकल्प बारसू येथे करण्यासाठी अनुकूलता दर्शवित प्रकल्प पूर्ण करून दाखवण्याचे मनसुबे देखील बोलून दाखवले होते.
रत्नागिरीतील रिफायनरी प्रकरणी लेख लिहीणार्या पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विधानसभेत उपस्थित झालेल्या मुद्द्यावर फडणवीस यांनी हे विधान केले आहे. वारिसे यांच्या अपघाती मृत्यू संदर्भात जे काही दावे केले जात आहेत ते चुकीचे असून सरकार या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होऊ घातलेला बहुचर्चित हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प (ग्रीन रिफायनरी) अखेर रद्द करण्यात आला आहे.