"मंदिरातील पूजा-पाठ ही परमेश्वराची सेवा आहेच, परंतु समाजात उतरून जी व्यक्ती निःस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करते तिच खऱ्याअर्थाने परमेश्वराची सेवा आहे.", असे प्रतिपादन अयोध्येतील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेव गिरिजी महाराज यांनी केले. 'हिंदू अध्यात्मिक आणि सेवा संस्थान'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदू अध्यात्मिक सेवा मेळाव्या'त ते बोलत होते.
Read More
"अटकेपार झेंडा फडकावणाऱ्या मराठ्यांचे आपण वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन एकदिशेने निघालेले आपण लोक आहोत. त्यामुळे आता थांबणे नाही. अयोध्या केवल झांकी है, पीओके अभी बाकी है!", असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.(Govinddev Giri Maharaj on POK)
"धर्म म्हणजे रिलिजन नाही. रिलिजन ही उपासना पद्धती आहे आणि धर्म ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे, हे आपल्या लक्षात येणे गरजेचे आहे."असे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोंविददेवगिरी महाराज यांनी प्रतिपादन केले. आपल्या एका धर्मात कितीतरी उपासना पद्धती आहेत. हिंदू हा जीवनमूल्यात्मक धर्म आहे, असेही ते म्हणाले.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची माहिती