अक्षय्य तृतीयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ मे रोजी सोन्याच्या दरात मोठा फरक निर्माण झाला आहे. ३० एप्रिलच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात २,३०० रूपयांचा फरक पडला आहे. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,७०० रूपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७०० रूपये प्रति तोळा इतका नोंदवण्यात आला आहे.
Read More
दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने दरात वाढ दिसून आली आहे. सोन्याचा भाव एमसीएक्सवर ७६,०१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका राहिला आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव १,२०० रुपयांनी वधारला असून ७६ हजार रुपये प्रति तोळा पुढे गेला आहे. विशेष म्हणजे काल मंगळवारी सोन्याचा दर ७४,८५२ रुपये प्रति तोळा इतका कमी झाला होता.
सोन्याच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ दिसून आली आहे. सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती वाढीने सुरू झाल्या असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स)वर सोन्याचा ऑक्टोबरचा बेंचमार्क करार १६५ रुपयांच्या वाढीसह ७४,२०५ रुपयांवर उघडला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.
मागील दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सराफा बाजारात किमतीत मोठी घट होत मुंबई शहरात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७३,३४१ रुपये इतका आहे. तर चांदी प्रति किलो ९०,०८० रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रूड तेलाच्या भावात वाढ झाली असली तरी सोने ग्राहकांसाठीआज चांगली बातमी आहे.सोने प्रति ग्रॅम १० रूपयांच्या आसपास व प्रति १० ग्रॅम (१ तोळा) सोने १००० रूपयांनी स्वस्त झाले आहे. भारतातील एकूण बाजारात सरासरी सोनाच्या भावात घसरण झाली आहे.
आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याच्या निर्णयावर उद्योगाशी निगडीत लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वैश्विक अडचणींचा सामना करतानाच महागलेले तेल,पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती यानंतर पेटीएम फिनटेकवरील वाढलेल्या अडचणीत मात्र बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीचे भाव मात्र वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरचे विनिमय मूल्यात कपात झाल्याने त्याचा परिणाम कमोडिटी एक्सचेंज मध्ये दिसून आला आहे.