नवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) गो फर्स्ट या विमान कंपनीची दिवाळखोरीची याचिका स्विकारली आहे. यामुळे आता विमान कंपनीस वसुलीतून दिलासा मिळाला आहे.
Read More
आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या गो फर्स्ट हा विमान कंपनीने ९ मेपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. डीजीसीएने विमान कंपनीस प्रवाशांचे पैसे परत करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी मे महिन्याचा पहिला आठवडा ‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरीची वाईट बातमी घेऊन आला. आधी ‘गो एअर’ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘गो फर्स्ट’ची सगळी उड्डाणे रद्द झाली आणि विमाने जमिनीवर स्थिरावली. खरंतर अशा प्रकारे विमान कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर करणे, विमान कंपन्याच बंद पडण्याचे प्रकार भारतात यापूर्वीही घडले आहेत. परंतु, त्या प्रत्येक प्रकरणातून खासगी विमान कंपन्या खरंच धडा घेतात का आणि घेतलाच तर मग अशी स्थिती का निर्माण होते, असे प्रश्न उपस्थित होतात. तेव्हा आजच्या या लेखात ‘गो फर्स्ट’ला द
सध्या हवाई प्रवासी चिंतेत आहेत. विमानतळावरील गो फर्स्ट काउंटरवर शांतता आहे. या सगळ्याचे कारण म्हणजे वाडिया समूहाच्या गो फर्स्ट या विमान कंपनीने पुढील काही दिवस आपले विमानसेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मात्र या कंपनीची अवस्था पाहता हे संकट काही दिवसांचे आहे असे वाटत नाही. खरं तर GoFirst दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये ऐच्छिक दिवाळखोरी कार्यवाहीसाठी अर्ज केला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त 'गो फर्स्ट' या खाजगी विमान कंपनीने प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे. 'राईट टू फ्लाय' असे या ऑफरचे नाव असून याअंतर्गत फक्त ९२६ रुपयांमध्ये विमान तिकीट बुक करता येणार आहेत.